बडीशेप, बदामाच्या 'या' आयुर्वेदिक उपायानं कमी होईल चष्म्याचा नंबर, दिसेल आणखी स्पष्ट!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 17, 2025 14:23 IST2025-01-17T14:22:50+5:302025-01-17T14:23:36+5:30
आयुर्वेद डॉक्टर रॉबिन शर्मा यांनी एक सोपा आणि फायदेशीर उपाय सांगितला आहे. ज्याद्वारे तुम्ही डोळे चांगले करू शकता.

बडीशेप, बदामाच्या 'या' आयुर्वेदिक उपायानं कमी होईल चष्म्याचा नंबर, दिसेल आणखी स्पष्ट!
डोळे शरीरातील सगळ्यात महत्वपूर्ण अवयवांपैकी एक आहेत आणि त्यांची काळजी घेणं फार गरजेचं असतं. कारण डोळ्यांनी दिसत असेल तरच आपण जग बघू शकतो आणि आपली कामे करू शकतो. आजकाल मोबाइल, कॉम्प्युटर, टीव्ही, लॅपटॉपच्या जास्त वापरानं आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे डोळे कमजोर होऊ लागलेत आणि दृष्टीही कमी होऊ लागली.
आजकाल कमी वयातच लोकांना चष्मा लागत आहे. कुणाला जवळचं दिसत नाही तर कुणाला दूरचं दिसत नाही. डोळे कमजोर झाल्यानं डोळ्यांमध्ये पाणी येणं, कमी दिसणं, डोकेदुखी, जळजळ आणि खाज अशी लक्षणं दिसू लागतात.
वेळीच काळजी घेतल्यानं आणि काही घरगुती उपाय करून डोळ्यांची दृष्टी वाढवता येऊ शकते. आयुर्वेद डॉक्टर रॉबिन शर्मा यांनी एक सोपा आणि फायदेशीर उपाय सांगितला आहे. ज्याद्वारे तुम्ही डोळे चांगले करू शकता.
साहित्य
१०० ग्रॅम बडीशेप
१०० ग्रॅम बदाम
१०० ग्रॅम खडीसाखर
२० ग्रॅम काळी मिरी
कसं तयार कराल?
बडीशेप, बदाम, खडीसाखर आणि काळी मिरी मिक्सरमध्ये टाकून पावडर तयार करा. हे पावडर तुम्ही काचेच्या किंवा प्लास्टिकच्या डब्यात स्टोर करा. हे पावडर तुम्ही तुमच्या गरजेनुसार कधीही वापरू शकता.
पावडर कधी आणि कसं खावं?
डॉक्टरांनी सांगितलं की, हे पावडर तुम्ही एक-एक चमचा दुधात मिक्स करून दिवसातून दोन ते तीन वेळा पिऊ शकता. हे तुम्ही लहान मुलांनाही देऊ शकता. घरातील सगळे लोक हे खाऊ शकता.
काय होईल फायदा?
डॉक्टरांनी सांगिततलं की, हे मिश्रण नियमितपणे खाल्ल्यास डोळ्यांच्या चष्म्याचा नंबर कमी होईल, इतकंच नाही तर या पावडरमध्ये चष्मा नेहमीसाठी घालवण्याची क्षमताही आहे. डॉक्टरांनी स्वत: अशा अनेक लोकांना पाहिलं आहे, ज्यांचा चष्मा या पावडरचं सेवन करून दूर झाला.
केस आणि त्वचेसाठीही फायदेशीर
डॉक्टरांनी सांगितलं की, हा उपाय केवळ डोळ्यांसाठीच नाही तर केस आणि त्वचेसाठीही फायदेशीर आहे. नियमितपणे याचा वापर केला तर केस तुटणे, त्वचा सैल पडणेसहीत इतरही त्वचेसंबंधी अनेक समस्या दूर होतात.