१० दिवसात पाइल्सची समस्य दूर करेल नारळाच्या शेंड्या, आयुर्वेद डॉक्टरांचा एक नॅचरल उपाय!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 13:33 IST2025-03-07T13:33:04+5:302025-03-07T13:33:48+5:30
Piles Home Remedies : पाइल्स ही डायजेशनसंबंधी एक आजार आहे. ज्यात गुदद्वारात जखम होते आणि टॉयलेटला गेल्यावर असल्यास असह्य वेदना होतात.

१० दिवसात पाइल्सची समस्य दूर करेल नारळाच्या शेंड्या, आयुर्वेद डॉक्टरांचा एक नॅचरल उपाय!
Piles Home Remedies : पाइल्स म्हणजे मूळव्याध ही एक गंभीर आणि वेदनादायी समस्या आहे. या स्थितीत व्यक्तीचं चालणं, फिरणं, उठणं, बसणं सगळंच अवघड होतं. पाइल्स ही डायजेशनसंबंधी एक आजार आहे. ज्यात गुदद्वारात जखम होते आणि टॉयलेटला गेल्यावर असल्यास असह्य वेदना होतात. विष्ठेसोबत गुदद्वारातून रक्त सुद्धा येतं. अशात आयुर्वेदिक डॉक्टर उपासना वोहरा यांनी ही समस्या दूर करणारा एक उपाय सांगितला आहे.
नारळाच्या दशा येतील कामी
डॉक्टर उपासना यांनी एक शॉर्ट व्हिडीओ शेअर करत या उपायाबाबत माहिती दिली आहे. त्यांनी सांगितलं की, ज्यांना पाइल्सची समस्या आहे, त्यांच्यासाठी वाळलेल्या नारळाच्या दशा खूप फायदेशीर ठरू शकतात.
व्हिडीओ बघण्यासाठी इथे क्लिक करा.
कसा कराल वापर?
डॉक्टरांनी सांगितलं की, वाळलेल्या नारळाच्या दशा ताराच्या एखाद्या चाळणीमध्ये टाकून गॅस किंवा चुलीवर जाळा. दशा पूर्ण काळ्या होऊ द्या आणि सॉफ्ट होऊ द्या. नंतर त्या गॅसवरून उतरवा. जाळलेल्या नाराळाच्या या दशा बारीक करून पावडर तयार करा. यासाठी तुम्ही मिक्सरचा वापर करू शकता.
डॉक्टरांनी सांगितलं की, रोज हे एक पावडर एक ग्लास ताकात टाकून प्यायचं आहे. त्या म्हणाल्या की, या ड्रिंकनं १० दिवसांमध्ये तुमची पाइल्सची समस्या दूर होईल.
पाइल्सची कारणं
पाइल्स होण्याची कारणं वेगवेगळी सांगितली जातात. त्यातील काही मुख्य कारणं जाणून घेऊया...पोट व्यवस्थित साफ न होणे किंवा बद्धकोष्ठता हे पाइल्सचं एक मुख्य कारण मानलं जातं. तसेच जास्त तिखट पदार्थ खाणे, जास्त तेलकट खाणे, मांसाहार करणे, मद्यसेवन, सिगारेट, तंबाखू या गोष्टींमुळेही पाइल्सची समस्या होते. सोबतच तासंतास एकाच जागी बसून काम करणे, रात्री उशीरापर्यंत जागे राहणे, जेवणाची फिक्स वेळ न पाळणे, कोरडे आणि शिळे अन्न खाणे ही सुद्धा या समस्येची कारणं असतात.
पाइल्सची लक्षणे
- शौचाच्या ठिकाणी रक्तस्त्राव होणे
- शौचाला आल्यानंतर आग आणि वेदना होणे
- शौचाच्या ठिकाणी खाज येणे
- शौचाच्या वेळेला मांसत भाग बाहेर येणे