'या' पदार्थांसोबत लौकी खाणं पडू शकतं महागात, कसं ते वाचा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 24, 2024 14:51 IST2024-04-24T14:50:44+5:302024-04-24T14:51:17+5:30
आम्ही दुधी भोपळ्याच्या काही नुकसानांबाबत सांगणार आहोत. या भाजीसोबत काय खाऊ नये याबाबत सांगणार आहोत.

'या' पदार्थांसोबत लौकी खाणं पडू शकतं महागात, कसं ते वाचा!
Bottle guard side effects : लौकी म्हणजेच दुधी भोपळ्याची भाजी सगळेच खातात, पण आरोग्याला याचे किती फायदे होतात हे अनेकांना माहीत नसतं. आयुर्वेदानुसार, दुधी भोपळा अनेक पोषक तत्वाने भरपूर असतो. ज्यामुळे त्वचा, डायबिटीस, हाय ब्लड प्रेशर, लिव्हरसंबंधी आजार, सूज आणि काविळसारख्या आजारात अनेक दृष्टीने फायदा होतो.
तसेच याने वजन कमी करण्यासही मदत मिळते. यात फायबर भरपूर असतं आणि पाणीही भरपूर असतं. ज्यामुळे पोटासंबंधी समस्याही दूर होण्यास मदत मिळते. अशात आम्ही दुधी भोपळ्याच्या काही नुकसानांबाबत सांगणार आहोत. या भाजीसोबत काय खाऊ नये याबाबत सांगणार आहोत.
1) दुधी भोपळ्यासोबत फूलकोबीची भाजी कधीच खाऊ नका. याने तुम्हाला गॅसची समस्या होऊ शकते. ज्या लोकांना नेहमीच पोटाची समस्या असते त्यांनी यापासून दूर राहिलं पाहिजे. ब्रोकली किंवा पत्ताकोबीचं ही सेवन करू नये.
2) कारलंही दुधी भोपळ्यासोबत खाणं नुकसानकारक ठरू शकतं. यात व्यक्तीला उलट्या, नाकातून रक्त येणं आणि चक्कर येणं अशा समस्या होऊ शकतात.
3) दुधी भोपळ्यासोबत आंबट फळांचं सेवन करणंही चुकीचं आहे. आंबट फळांमुळे पोटात वेदना आणि गडबड होण्याची शक्यता असते. तुमचा पोट बिघडू शकतं.
4) दुधी भोपळ्यासोबत रताळ्याचं सेवन करणंही टाळलं पाहिजे. यामुळे तुम्हाला एलर्जी होऊ शकते.