शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
3
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
4
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
5
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
6
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
7
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
8
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
9
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
10
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
11
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
12
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
13
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
14
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
15
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
16
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
17
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
18
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
19
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
20
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार

जेवणानंतर 'या' चुका करणं पडू शकतं महागात, तुम्हीही करत असाल तर वेळीच व्हा सावध!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 16, 2024 14:17 IST

Mistakes After Meal : डायटिशिअन मानसी यांनी याबाबत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी सांगितलं की, जेवण केल्यावर काही चुका अजिबात करू नये.

Mistakes After Meal : जेवण आपल्या शरीरासाठी किती महत्वाचं आहे हे सगळ्यांनाच माहीत आहे. जेवणातून शरीराला वेगवेगळे पोषक तत्व मिळतात. यातून शरीराला प्रोटीन, कॅल्शियम, व्हिटॅमिन बी12, फायबर असे पोषक तत्व मिळतात. मात्र, जेवण केल्यावर काही लोक अशा चुका करतात ज्यामुळे त्यांना पोषक तत्व मिळत नाहीत.  

डायटिशिअन मानसी यांनी याबाबत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात त्यांनी सांगितलं की, जेवण केल्यावर काही चुका अजिबात करू नये. या काही चुकीच्या सवयी आहेत ज्या लगेच बदलायला हव्यात. यातील काही सवयी हेल्दीही वाटू शकतात, पण त्या शरीराला नुकसान पोहोचवतात.

मिठाई किंवा चॉकलेट

जेवण केल्यावर काहीतरी गोड खाण्याची वेगळीच मजा असते. पण यामुळे तुमचं ब्लड ग्लूकोज वेगाने वाढू शकतं. याजागी ब्लड शुगर कंट्रोल करण्यासाठी आणि क्रेविंग बंद करण्यासाठी डार्क चॉकलेटचा एक तुकडा खा किंवा नॅचरल स्वीटनर निवडा.

चहा-कॉफी

जेवणानंतर चहा किंवा कॉफीचा एक कप अनेक लोकांना सवयीसारखा असतो. पण चहा किंवा कॉफीमधील टॅनिन अन्नातील पोषक तत्व अ‍ॅब्जॉर्ब होण्यात अडथळा निर्माण करतं. याजागी हर्बल टी ची निवड करा.

फळं किंवा ज्यूस

फळं खाणं हेल्दी असतं, पण जेवणानंतर लगेच यांचं सेवन केल्याने डायजेस्टिव सिस्टमवर लोड येऊ शकतो. यामुळे अन्नाचा ग्लायसेमिक लोड वाढतो आणि जेवणानंतर लगेच शुगर वाढते. न्यूट्रिएंट्सचा पूर्ण फायदा उठवण्यासाठी जेवणाच्या आधी किंवा नंतर स्नॅक म्हणून फळं खावेत.

जास्त पाणी पिणं

शरीर हायड्रेट ठेवणं गरजेचं असतं. पण जेवणानंतर लगेच जास्त पाणी प्यायल्याने डायजेस्टिव एंजाइम कमजोर होऊ शकतात. याने पोषक तत्वांचं अवशोषण कमी होतं. हायड्रेट राहण्यासाठी दिवसभर पाणी पित राहिलं पाहिजे.

झोपणे

जेवण केल्यानंतर लगेच काही लोकांना झोप येते. पण जेवल्यावर लगेच झोपल्याने अ‍ॅसिड रिफ्लक्स आणि अपचन होऊ शकतं. डायजेशन वाढवण्यासाठी जेवण केल्यावर थोडं चालण्याची सवय लावा.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य