शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

बर्थडे गर्ल तापसी पन्नूचं फिटनेस सीक्रेट; जाणून घ्या वर्कआउट आणि डाएट प्लॅन

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2019 14:25 IST

जेव्हा गोष्ट बॉलिवूडच्या फिटनेस फ्रिक अभिनेत्रींची असते, त्यावेळी तापसी पन्नूचं नाव सर्वात अग्रेसर असतं. तापसी जेवढी मेहनत आपल्या अभिनयासाठी घेते, तेवढीच लक्ष ती आपल्या फिटनेसकडेही देत असते.

जेव्हा गोष्ट बॉलिवूडच्या फिटनेस फ्रिक अभिनेत्रींची असते, त्यावेळी तापसी पन्नूचं नाव सर्वात अग्रेसर असतं. तापसी जेवढी मेहनत आपल्या अभिनयासाठी घेते, तेवढीच लक्ष ती आपल्या फिटनेसकडेही देत असते. कदाचित यामुळेच तिच्या चित्रपटांमध्ये ती अ‍ॅक्शन सीन्स आणि स्टंट्स अगदी सहजपणे करते. तुम्हालाही अनेकदा तापसीचे स्टंट पाहून मनात येत असेल की, नक्की हिचं फिटनेस रूटिन आहे तरी काय? 

बिनधास्त तापसी आपल्या फिटनेस रूटिनबाबत फार कॉन्शिअस असते. आपल्या एक्सरसाइज रूटिनसोबतच ती आपलं डाएटही कटाक्षाने फॉलो करते. 

1. साधारणतः अनेक लोक फिट राहण्यासाठी जिमचा आधार घेताना दिसतात. पण तापसी फिट बॉडीसाठी जिमव्यतिरिक्त स्क्वॉशला पसंती देते. ती दररोज अर्धा तास तरी स्क्वॉश खेळते. त्यामुळे तिला शारीरिक आणि मानसिक रित्या फिट राहण्यास मदत होते. 

2. याव्यतिरिक्त ती नियमितपणे योगाही करते. तिच्या इन्स्टाग्रामवर काही फोटोज आहेत. ज्यावरून तिच्या फिटनेस रूटिनबाबत समजण्यास मदत होते. 

3. तापसी दररोज सकाळी उठल्यानंतर एक लीटर गरम पाणी पिते आणि नट्स खाते. त्यानंतर ती ग्रीन टी आणि काकडी खाते किंवा सेवरीचा ज्यूस घेते. 

4. तापसी कोणताही डाएट प्लॅन फॉलो करत नाही. असं असलं तरिही ती ग्लूटेन आणि लेक्टोस फ्री डाएट घेते. ती तांदूळ आणि ब्रेडचाही आहारात समावेश करते. एका इंटरव्यूमध्ये बोलताना तापसीने सांगितलं होतं की, तिला तांदूळ खायला फार आवडतात. 

5. तापसी बदामाचं दूध पिणं पसंत करते. तिचं असं म्हणणं असतं की, त्यामध्ये फुल क्रिम आणि टोन्ड मिल्कऐवजी कमी कॅलरी आणि जास्त प्रोटीन, आवश्क पोषक तत्व असतात. दिवसभरात ती भरपूर पाणी पिते. त्यामुळे तिच्या शरीरासोबतच त्वचाही हायड्रेट राहण्यास मदत होते. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. त्यामुळे कोणातीह उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं. 

टॅग्स :Taapsee Pannuतापसी पन्नूFitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सbollywoodबॉलिवूडCelebrityसेलिब्रिटीHealthy Diet Planपौष्टिक आहार