दातांचं दुखणं दूर करण्यासाठी वापरा किचनमधील 'या' दोन गोष्टी, लगेच मिळेल आराम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 15:16 IST2024-12-12T15:15:41+5:302024-12-12T15:16:20+5:30

Toothache Remedies :रात्रीच्या वेळी दातांचं दुखणं आरामात झोपूही देत नाही. अशात जर तुम्हाला सुद्धा दात दुखण्याची समस्या असेल तर किचनमधील काही गोष्टींच्या मदतीने ही समस्या दूर करू शकता.

Applying these 2 things on teeth helps in tooth pain | दातांचं दुखणं दूर करण्यासाठी वापरा किचनमधील 'या' दोन गोष्टी, लगेच मिळेल आराम!

दातांचं दुखणं दूर करण्यासाठी वापरा किचनमधील 'या' दोन गोष्टी, लगेच मिळेल आराम!

Toothache Remedies : तोंडाची चांगल्याप्रकारे स्वच्छता न करणे, दातांवरील पिवळेपणा, दातांची किड आणि हिरड्यांमध्ये सूज या गोष्टी दातांमध्ये वेदना होण्याचं कारण ठरतात. दातांची वेदना एकदा सुरू झाली की स्वस्थ बसू देत नाही. खासकरून रात्रीच्या वेळी दातांचं दुखणं आरामात झोपूही देत नाही. अशात जर तुम्हाला सुद्धा दात दुखण्याची समस्या असेल तर किचनमधील काही गोष्टींच्या मदतीने ही समस्या दूर करू शकता.

दात दुखणं कसं दूर कराल?

दातांचं दुखणं लगेच दूर करण्यासाठी लवंगाचं तेल फायदेशीर ठरतं. लवंगमध्ये अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण भरपूर असतात आणि यात आढळणारं यूजीनोल दातांचं दुखणं दूर करतं. लवंग बारीक करून याचं पावडर रूईच्या मदतीने दुखणाऱ्या दातांवर लावा. याने दातांचं दुखणं कमी होऊ लागतं. त्याशिवाय लवंग तेलाचे काही थेंब रूईवर लावून दुखणाऱ्या दातावर लावू शकता. यानेही वेदना कमी होईल.

दुसरा घरगुती उपाय आहे लसूण. वेदना दूर करण्यासाठी कच्चा लसूण बारीक करून दातावर लावा. लसणाच्या अ‍ॅंटी-मायक्रोबिअल आणि अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल गुणामुळे वेदना कमी करण्यास मदत मिळते. 

हे उपायही करून बघा

- दातांचं दुखणं दूर करायचं असेल तर तुम्ही गरम मिठाच्या पाण्याने गुरळा करा. यासाठी एक ग्लास गरम पाण्यात एक चमचा मीठ टाका. या पाण्याने ४ ते ५ वेळा गुरळा करा. याने दातांची स्वच्छताही होते आणि हिरड्यांवरील सूजही कमी होते. अशात वेदना दूर होते. 

- ज्या दातामध्ये वेदना होत आहे चेहऱ्याच्या त्या भागावर बर्फाने शेकावं. बर्फाने शेकल्याने दाताचं दुखणं कमी होण्यास मदत मिळते. यासाठी बर्फाचा तुकडा कापडात बांधून चेहऱ्यावर फिरवा. 

- कांद्यातील सल्फरनेही दातांची समस्या कमी केली जाऊ शकते. यातील अ‍ॅंटी-बॅक्टेरिअल आणि अ‍ॅंटी-इन्फ्लेमेटरी गुण दातांची समस्या कमी करतात. यासाठी कांदा कापून दुखणाऱ्या दातावर काही वेळ ठेवा.

- हळदीमध्ये औषधी गुणही दातासाठी फायदेशीर असतात. यासाठी हळदीची पेस्ट किंवा मोहरीच्या तेलात मिक्स करून वेदना होत असलेल्या दावावर लावा. याने आराम मिळेल. काही वेळाने गरम पाण्याने गुरळा करा.

Web Title: Applying these 2 things on teeth helps in tooth pain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.