अनुष्का शर्माचं फिटनेस अन् ब्युटी सिक्रेट अनलॉक, खुद्द अनुष्कानेच शेअर केला नाश्त्याचा फोटो

By ऑनलाइन लोकमत | Published: December 1, 2021 01:49 PM2021-12-01T13:49:12+5:302021-12-01T13:55:39+5:30

अनुष्का सडपातळ कंबर आणि उत्तम फिटनेससाठी नेमकं काय करते, याची सर्वांनाच उत्सुकता आहे. यामागचे रहस्य खुद्द अनुष्कानेच उघड केलं आहे आणि ते रहस्य म्हणजे तिचा स्वादिष्ट आणि आरोग्यदायी ब्रेकफास्ट.

anushka sharma's fitness and beauty secrete revealed actress shares Instagram post about breakfast jar | अनुष्का शर्माचं फिटनेस अन् ब्युटी सिक्रेट अनलॉक, खुद्द अनुष्कानेच शेअर केला नाश्त्याचा फोटो

अनुष्का शर्माचं फिटनेस अन् ब्युटी सिक्रेट अनलॉक, खुद्द अनुष्कानेच शेअर केला नाश्त्याचा फोटो

Next

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आई झाल्यानंतरही तितकीच फीट आणि ब्युटीफुल आहे. मग तिच्या फिटनेसची चर्चा होणारच. अनुष्का शर्माने काही दिवसांतच फॉर्ममध्ये येऊन सर्वांचे लक्ष वेधून घेतलंय. अनुष्का सडपातळ कंबर आणि उत्तम फिटनेससाठी नेमकं काय करते, याची उत्सुकता सर्वांनाच आहे. यामागचे रहस्य खुद्द अनुष्कानेच उघड केलं आहे आणि ते म्हणजे तिचा स्वादिष्ट आणि आरोग्यदायी ब्रेकफास्ट.

या गोष्टी नाश्त्यात खाल्ल्या जातात
अलीकडेच अनुष्का शर्माने (Anushka Sharma) इंस्टाग्रामवर तिच्या ब्रेकफास्टचा फोटोच शेअर केला आहे. हा ब्रेकफास्ट एका काचेच्या बरणीत आहे. हा पदार्थ दिसायला जितका चविष्ट वाटत आहे, तितकाच खायलाही आरोग्यदायी आहे. या बरणीमध्ये फळे, अक्रोड, दूध आणि चिया बियांनी बनवलेली आरोग्यदायी स्मूदी आहे. हा नाश्ता बनवायला सोपा आणि झटपट तयार करता येतो . यामध्ये असलेल्या उच्च प्रथिनांमुळे तुम्हाला लवकर भूकही लागत नाही आणि तुमचे वजनही कंट्रोलमध्ये राहते. यासोबतच शरीरातील रक्तातील साखरेचे प्रमाणही नियंत्रित राहते.

हा नाश्ता बनवणे खूप सोपे आहे
रोल केलेले ओट्स एका मेसन जारमध्ये २/३ इतक्या उंचीपर्यंत भरा आणि नंतर त्यात २ चमचे चिया बिया घाला. आता दूध घाला आणि २ चमचे मध आणि तुमच्या आवडीचा सुका मेवा मिक्स करा. त्यात ताजी फळे टाका आणि मिक्स करून खा. जर तुम्हाला मध खाण्याची इच्छा नसेल तर तुम्ही त्यात एक चमचा व्हॅनिला अर्क देखील टाकू शकता. हा भरपूर फायबरचा नाश्ता केल्यानंतर, तुम्हाला अनेक तास दुसरे काहीही खाण्याची गरज भासणार नाही आणि तुम्ही अनहेल्दी पदार्थांपासून दूर राहाल.

Web Title: anushka sharma's fitness and beauty secrete revealed actress shares Instagram post about breakfast jar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app