हिरव्या मिरच्या तिखट असल्या तरी आहेत फायदेशीर, फायदे वाचून व्हाल अवाक्...
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2024 16:17 IST2024-06-17T16:16:05+5:302024-06-17T16:17:42+5:30
Green Chilli Benefits: हिरव्या मिरच्यांमध्ये कॅप्सायसिन नावाचं तत्व अससतं. जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं. तसेच मिरच्यांमध्ये ल्यूटिन नावाचं तत्व असतं. जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतं.

हिरव्या मिरच्या तिखट असल्या तरी आहेत फायदेशीर, फायदे वाचून व्हाल अवाक्...
Green Chilli Benefits: मिरच्यांचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये टेस्ट वाढवण्यासाठी केला जातो. काही लोक जेवण करताना कच्ची हिरवी मिरची खातात तर काही लोक मिरच्यांचा ठेचा खातात. मिरच्यांनी शरीराला अनेक फायदे मिळतात. मिरच्यांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन ई, आयर्न, पोटॅशिअम आणि मॅग्नेशिअमसारखे पोषक तत्व असतात. इतकंच नाही तर हिरव्या मिरच्यांमध्ये कॅप्सायसिन नावाचं तत्व अससतं. जे हृदयाच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतं. तसेच मिरच्यांमध्ये ल्यूटिन नावाचं तत्व असतं. जे शरीरासाठी खूप फायदेशीर असतं. अशात आज आपण मिरच्या खाण्याचे फायदे जाणून घेणार आहोत.
१) नॅच्युरल अॅंटी-ऑक्सीडेंट
मिरच्यांमध्ये एक पॉवरफुल अॅंटी-ऑक्सिडेंट आहे ज्याने शरीराला फ्री रॅडिकल्समुळे होणाऱ्या समस्या दूर होतात. हे फ्री रॅडिकल्स विरोधात लढतात आणि कोशिकांना नुकसान होण्यापासून वाचवतात.
२) तणाव होईल कमी
मिरचीच्या सेवनामुळे तणाव कमी होतो आणि मानसिक शांतता मिळते. याने तुमचा मूड चांगला होतो.
४) अॅंटी-इंफ्लेमेटरी गुण
ल्यूटिनमध्यें अॅंटी-इफ्लेमेटरी गुण असतात, ज्यामुळे सूज कमी करण्यास मदत मिळते. याने तुमचं आरोग्य चांगलं राहण्यास मदत मिळते. तसेच अनेक आजारांपासूनही बचाव होतो.
५) हृदयाचं आरोग्य
ल्यूटिनच्या माध्यमातून हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवू शकता. याने हार्ट अटॅक, हार्ट फेलिअर, ट्रिपल वेसल डिजीज आणि कोरोनरी आर्टरी डिजीजपासून बचाव होतो.
६) अॅंटी कॅन्सर तत्व
प्लांट बेस्ड फूड्समध्ये आढळणारे ल्यूटिनमध्ये अॅंटी-कॅन्सर गुण असतात. हे कॅन्सर निर्माण करणारे तत्वांविरोधात लढतात आणि याने गंभीर आजारांपासून बचाव होतो.
७) हाडे होतात मजबूत
ल्यूटिन असलेल्या पदार्थांचं सेवन केल्याने हाडांचं आरोग्य चांगलं होतं. याने तुमची हाडे मजबूत होतात आणि हाडांचा आजार ऑस्टियोपोरोसिस चा धोकाही कमी करतात.