बॉडी डिटॉक्स ते वजन कमी करणं अनेक गोष्टींसाठी फायदेशीर पपई बीया, वाचा कशा खाल!
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2024 16:16 IST2024-06-10T15:55:58+5:302024-06-10T16:16:40+5:30
Papaya Seeds : पिकलेल्या पपईच्या बीया खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. पचनक्रिया चांगली राहते.

बॉडी डिटॉक्स ते वजन कमी करणं अनेक गोष्टींसाठी फायदेशीर पपई बीया, वाचा कशा खाल!
Papaya Seeds : वेगवेगळ्या कारणांनी आजकाल लोकांचं वजन वाढत आहे. जे लोक नेहमीच फास्ड फूड किंवा जंक फूड खातात. शारीरिक हालचाल करत नाहीत. त्यांचं वजन वेगाने वाढतं. लठ्ठपणामुळे त्यांना वेगवेगळ्या आजारांचा सामना करावा लागतो. बरेच लोक वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करत असतात. पण सगळ्यांनाच फायदा होतो असं नाही. आज आम्ही तुम्हाला वजन कमी करण्यासाठी एक खास उपाय सांगत आहोत. हा उपाय म्हणजे पपईच्या बीया. पपईच्या बियांचं सेवन करून तुम्ही वजन कमी करू शकता.
पिकलेल्या पपईच्या बीया खाल्ल्याने शरीरातील विषारी पदार्थ बाहेर पडतात. पचनक्रिया चांगली राहते. तसेच पोट फुगण्याची समस्याही दूर होते. शरीरात जमा झालेली चरबी दूर करण्यासही या बियांची मदत मिळते. त्यामुळे एक्सपर्ट सांगतात की, पपईच्या बीया खाल्ल्याने वजन लवकर कमी होतं.
मेटाबॉलिज्म वाढवणारी फळं किंवा पदार्थ वजन कमी करण्यास मदत करतात. पाण्यामुळे आपलं मेटाबॉलिज्म मजबूत होतं. पपईमध्ये इतर फळांच्या तुलनेत कॅलरी कमी असतात आणि त्यामुळे हे फळ वजन कमी करण्यास मदत करतं.
कशा खाल या बीया
पपईच्या बीया तुम्ही अशाच चाऊन खाऊ शकता किंवा या बियांची पेस्ट तयार करून पाण्यासोबत याचं सेवन करू शकता.
पपईच्या बियांचे फायदे
- पपईच्या बियांमुळे शरीरातील सूज कमी होण्यास मदत मिळते. तसेच याने अल्ट्रावायलेट किरणांपासून त्वचेचा बचाव होतो. तसेच सुरकुत्याही याने दूर होतात.
- पपईच्या बियांमध्ये असलेल्या कारपॅन तत्वामुळे डायजेशन चांगलं राहतं. याने पोटासंबंधी अनेक समस्या दूर होतात. तसेच या बियांमुळे रक्तही शुद्ध होतं. इतकंच नाही तर इम्यून सिस्टीमही मजबूत होते.