केवळ मूगच नाही तर मोड आलेल्या मेथीनेही मिळतात जबरदस्त फायदे, वाचाल तर रोज खाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 12, 2024 11:18 IST2024-12-12T11:18:15+5:302024-12-12T11:18:56+5:30

Methi Sprouts : मोड आलेल्या मेथीचं सेवन केल्याने आणखी जास्त फायदे मिळतात. अशात मोड आलेल्या मेथीचे आरोग्याला काय फायदे होतात हे जाणून घेऊ.

Amazing health benefits of eating Methi sprouts | केवळ मूगच नाही तर मोड आलेल्या मेथीनेही मिळतात जबरदस्त फायदे, वाचाल तर रोज खाल!

केवळ मूगच नाही तर मोड आलेल्या मेथीनेही मिळतात जबरदस्त फायदे, वाचाल तर रोज खाल!

Methi Sprouts : मेथीच्या पिवळ्या दाण्यांमध्ये भरपूर पोषक तत्व असतात. मेथीचा वापर वेगवेगळ्या पदार्थांमध्ये आवर्जून केला जातो. या दाण्यांपासून शरीराला फायबर, प्रोटीन, आयर्न, व्हिटॅमिन, मॅग्नेशिअम आणि पोटॅशिअम भरपूर प्रमाणात मिळतं. तसेच या दाण्यांमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्सही भरपूर असतात. ज्यामुळे शरीराला फ्री रॅडिकल्सपासून होणारं नुकसान टाळलं जातं. मोड आलेल्या मूगाप्रमाणे मेथीच्या दाण्यांनाही मोड आणता येते. मोड आलेल्या मेथीचं सेवन केल्याने आणखी जास्त फायदे मिळतात. अशात मोड आलेल्या मेथीचे आरोग्याला काय फायदे होतात हे जाणून घेऊ.

मोड आलेली मेथी खाण्याचे फायदे

पचन सुधारतं

मोड आलेल्या मेथीच्या मदतीने पचनक्रियेला खूप फायदा मिळतो. या बियांमध्ये डायटरी फायबर भरपूर प्रमाणात असतं. ज्यामुळे पचनाची समस्या दूर होण्यास मदत मिळते. बद्धकोष्ठतेची समस्या दूर होते आणि आतड्यांचं आरोग्यही चांगलं राहतं.

वजन कमी होतं

वेट लॉस डाएटमध्ये मोड आलेल्या मेथीचा समावेश करू शकता. या मेथीमध्ये फायबर आणि प्रोटीन भरपूर असतं. त्यामुळे या दाण्यांच्या सेवनाने पोट जास्त वेळ भरलेलं राहतं आणि एक्सेस फूड इंटेक कमी केलं जाऊ शकतं. याने कॅलरी इंटेकही कमी होतं.

ब्लड शुगर कंट्रोल

सोल्यूबल फायबर असल्याने मोड आलेल्या मेथीमुळे ब्लड शुगल लेव्हल कंट्रोल करण्यास मदत होते. डायबिटीसचे रूग्ण तज्ज्ञांच्या सल्ल्याने याचा समावेश आहारात करू शकतात. 

हृदयासाठी फायदेशीर

मोड आलेल्या मेथीने शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल दूर करण्यासही मदत मिळते. बॅड कोलेस्ट्रॉल कमी झाल्यावर वेगवेगळ्या हृदयरोगांचा धोकाही कमी होतो. 

त्वचा होईल चमकदार

मोड आलेल्या मेथीमध्ये व्हिटॅमिन आणि अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट्स भरपूर असतात. जे त्वचेसाठी फायदेशीर असतात. याने त्वचा उजळण्यासोबतच त्वचेची ड्रायनेस आणि सुरकुत्याही कमी होतात.

अ‍ॅंटी-इंफ्लेमेटरी गुण

अ‍ॅंटी-इंफ्लेमेटरी गुणांमुळे मोड आलेल्या मेथीचं सेवन करून शरीरात इन्फ्लेमेशन होत नाही. इन्फ्लेमेशन होत नसल्याने किंवा कमी झाल्याने क्रोनिक आजारांचा धोकाही कमी होतो. 

Web Title: Amazing health benefits of eating Methi sprouts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.