कोलेस्ट्रॉल कमी करण्यासोबतच अनेक फायदे देतं हे फळ, रोज सेवन करून मिळवा आराम
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2024 13:42 IST2024-03-01T13:41:28+5:302024-03-01T13:42:09+5:30
सगळ्यात मोठा फायदा म्हणजे याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत मिळते. चला जाणून घेऊ खजूराचे गुण आणि त्याचे फायदे...

कोलेस्ट्रॉल कमी करण्यासोबतच अनेक फायदे देतं हे फळ, रोज सेवन करून मिळवा आराम
Date Fruit Benefits In Cholestrol : एक्सपर्ट नुसार, खजूरामध्ये अनेक औषधी गुण आढळतात. त्यामुळे खजूर नियमित खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे होतात. यात मिनरल्स, व्हिटॅमिन्स, प्रोटीन आणि फायबर असे गुण असतात. खजूर खाल्ल्याने अनेक समस्यांपासून सुटका मिळते. सगळ्यात मोठा फायदा म्हणजे याच्या सेवनाने कोलेस्ट्रॉल कमी करण्यासही मदत मिळते. चला जाणून घेऊ खजूराचे गुण आणि त्याचे फायदे...
न्यूट्रिएंट्स भरपूर असतात
खजूरात भरपूर सारे न्यूट्रिएंट्स असतात जे आरोग्यासाठी फायदेशीर असतात. खजूरात आयर्न, फायबर आणि हीमोग्लोबिनसारखे पोषक तत्व भरपूर असतात. यात कॅल्शिअम, फॉस्फोरस, आयर्न, पोटॅशिअम, कॉपर आणि मॅग्नेशिअमसारखे मिनरल्स आढळतात. या तत्वांमुळे अनेक आजार दूर होतात.
मेंदुची शक्ती वाढते
खजूरात अॅंटी इंफ्लामेंटरी गुण असतात, जे मेंदूसाठी फायदेशीर असतात. खजूरातील हे गुण स्मरणशक्ती वाढवण्यास मदत करतात. याच्या सेवनाने अल्झायमरसारख्या आजाराचा धोका कमी राहतो.
पाइल्स आणि पचन
तुम्हाला पाइल्सची समस्या असेल तर खजूर खाणं फायदेशीर ठरतं. खजूरात असलेल्या फायबरमुळे पाइल्सची समस्या दूर करण्यास मदत मिळते. हे खाल्ल्याने वेदना आणि ब्लीडिंगपासून सुटका मिळते. खजूरात असलेल्या फायबरमुळे पचनतंत्र मजबूत होतं. बद्धकोष्ठता आणि अपचन अशा समस्याही होतात दूर.
हृदय राहतं हेल्दी
खजूर हृदयासाठी फार फायदेशीर मानलं जातं. खजूर खाल्ल्याने शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉल कमी होतं. खजूरातील तत्वांमुळे हार्ट अटॅकचा धोकाही कमी होतो. थंडीच्या दिवसात हृदय हेल्दी ठेवण्यासाठी खजूराचं सेवन करा.
हाडे होतात मजबूत
खजूरामध्ये कॅल्शिअम, फॉस्फोरस, आयर्न, पोटॅशिअम, कॉपर आणि मॅग्नेशिअमसारखे पोषक तत्व खूप असतात. हे खाल्ल्याने हाडेही मजबूत होतात आणि मसल्सही चांगलं काम करतात. खजूर दुधात उकडून खावं. लहान मुलांना तर खजूर नियमित द्यावे.