आरोग्य आणि सौंदर्यासाठी कोरफडीचा ज्यूस ठरतो फायदेशीर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 10, 2019 05:30 PM2019-10-10T17:30:51+5:302019-10-10T17:31:17+5:30

कोरफड आपल्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. आयुर्वेदातही कोरफडीच्या अनेक फायद्यांबाबत सांगण्यात आलं आहे.

Aloe vera juice benefits for health and beauty | आरोग्य आणि सौंदर्यासाठी कोरफडीचा ज्यूस ठरतो फायदेशीर

आरोग्य आणि सौंदर्यासाठी कोरफडीचा ज्यूस ठरतो फायदेशीर

googlenewsNext

कोरफड आपल्या आरोग्यासाठी आणि सौंदर्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरते. आयुर्वेदातही कोरफडीच्या अनेक फायद्यांबाबत सांगण्यात आलं आहे. कोरफडीमध्ये अनेक पोषक तत्व असतात जी आपल्या आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर ठरतात. यामध्ये व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अ‍ॅन्टीऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात. जाणून घेऊया कोरफडीचा ज्यूस प्याल्याने होणाऱ्या फायद्यांबाबत... 

कोरफडीच्या ज्यूसमुळे होणारे आरोग्यदायी फायदे... 

- अनेक संशोधनांमधून सिद्ध झालं आहे की, कोरफड आपल्या शरीरातील साखरेचे प्रमाण नियंत्रणात ठेवण्यासाठी मदत करते. त्यामुळे डायबिटीस रूग्णांनी कोरफडीचं सेवन करणं अत्यंत फायदेशीर ठरतं. 

- लिव्हर डिसऑर्डर, एनिमिया, कावीळ यांसारख्या रोगांमध्ये कोरफडीचा ज्यूस अत्यंत फायदेशीर ठरतं. पँक्रिज आमि स्प्लीन संबंधातील समस्यांमध्येही कोरफडीचा ज्यूस फायदेशीर ठरतो. तसे शरीरामधील समस्या दूर करण्यासाठीही मदत करतो. 

- भूक वाढविण्यासाठीही कोरफडीचा ज्यूस मदत करतो. यामध्ये शरीरातील विषारी तत्व बाहेर टाकण्यासाठी आवश्यक असणारे गुणधर्म अतात. याव्यतिरिक्त याच्या सेवनाने पोटाच्या समस्या दूर होतात.
 
- कोरफड आपल्या शरीरातील आवश्यक व्हिटॅमिन्स, मिनरल्स आणि अॅन्टी-ऑक्सिडंट मुबलक प्रमाणात असतात. कोरफडीच्या ज्यूसचं नियमित सेवन केल्याने पचनक्रिया सुरळीत होण्यास मदत होते. 

सौंदर्य वाढविण्यासाठी... 

- चमकदार त्वचेसाठी कोरफड वरदान ठरते. त्वचा मॉयश्चराइज करण्यासोबतच त्वचेच्या समस्या दूर होण्यास मदत होते. 

- कोरफडीचा ज्यूस तुम्ही केसांचं सौंदर्य वाढविण्यासाठी फायदेशीर ठरतो. याचा वापर केल्याने केस दाट, काळे आणि मजबुत होतात. त्याचबरोबर केसांतील कोंड्याची समस्या आणि स्किन इन्फेक्शन दूर होतं. 

या गोष्टी ठेवा लक्षात... 

- कोरफडीचा ज्यूस घेतल्याने डॉक्टरांचा सल्ला घेणं अत्यंत आवश्यक आहे. कारण प्रत्येकाची शारीरिक क्षमता वेगवेगळी असते. तसेच अनेकदा एखाद्या पदार्थाची अॅलर्जी होण्याची शक्यता असते. 

- गरोदर महिलांनी आणि स्तनपान करणाऱ्या महिलांनी कोरफडीचा ज्यूस घेणं शक्यतो टाळावं किंवा डॉक्टरांच्या सल्ल्याने घ्यावं. 

(टिप : वरील सर्व समस्या आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.)

Web Title: Aloe vera juice benefits for health and beauty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.