भूक लागल्यावर डोकं जास्त दुखत असेल तर असू शकतात 'ही' कारणं....

By ऑनलाइन लोकमत | Published: January 6, 2021 08:27 AM2021-01-06T08:27:10+5:302021-01-06T08:27:53+5:30

डिहायड्रेशन, कमी जेवण आणि कॅफीनच्या कमतरतेमुळे शरीरात ग्लुकोजचं प्रमाण कमी होतं. ज्यामुळे डोकेदुखी होते.

All you need to know about hunger headache included causes symptoms and remedies | भूक लागल्यावर डोकं जास्त दुखत असेल तर असू शकतात 'ही' कारणं....

भूक लागल्यावर डोकं जास्त दुखत असेल तर असू शकतात 'ही' कारणं....

googlenewsNext

डोकेदुखी होणं ही आरोग्याशी संबंधित एक सामान्य समस्या आहे. यामागच्या कारणांबाबत सांगायचं तर मायग्रेनसारखी समस्या असू शकते आणि याचं फार साधं कारण भूकही असू शकते. भूकेमुळे डोकेदुखी मुख्यपणे तेव्हा होते जेव्हा तुम्ही तुमचं जेवण स्कीप करता. खासकरून ब्रेकफास्ट आणि उशीरापर्यंत जेवण न करणे.

नवभारत टाइम्सने एका रिसर्च हवाला देत सांगितलं की, डोकेदुखी होण्याची मुख्य कारणे जसे की, इंटेन्स इमोशन, थकवा, वातावरणात बदल, मासिक पाळी, प्रवास, गोंगाट आणि झोपेच्या तुलनेत भूक ३१.०३ टक्के आणि जेवण स्कीप करणं २९.३१ टक्के जबाबदार आहे. आज आम्ही तुम्हाला भूकेमुळे होणाऱ्या डोकेदुखीबाबत सांगणार आहोत.

डिहायड्रेशन, कमी जेवण आणि कॅफीनच्या कमतरतेमुळे शरीरात ग्लुकोजचं प्रमाण कमी होतं. ज्यामुळे डोकेदुखी होते. हे तेव्हा होतं जेव्हा मेंदूला ग्लुकोज लेव्हलची कमतरता भासते. असात मेंदू हायपोग्लायसीमिया किंवा ग्लूकोन लेव्हलला पाण्यासाठी ग्लूकागोन, कोर्टिसोल आणि एड्रेनालाइनसारख्या काही हार्मोन्स रिलीज करतो. या हार्मोन्सच्या साइड इफेक्ट्सच्या रूपात थकवा, सुस्ती आणि मळमळसोबत डोकेदुखीही होते. त्यासोबतच डिहायड्रेशन, कॅफीनची कमतरता आणि जेवण कमी करणे यामुळे ब्रेन टिश्यूमध्ये तणाव, पेन रिसेप्टर्सना अॅक्टिव करतं ज्यामुळे डोकेदुखी होते.

भूकेमुळे डोकेदुखी होण्याची लक्षणे

भूकेमुळे होणारी डोकेदुखी म्हणजे हंगर हेडॅकच्या लक्षणांबाबत सांगायचं त खांदे, मानेवर तणावासोबत फोरहेड आणि त्याच्या किनाऱ्यावर दबावाची जाणीव होते. त्यासोबतच भूकेमुळे डोकेदुखीची काही कारणे खालीलप्रमाणे आहेत.

- पोट फुगणे किंवा आवाज येणे

-  थकवा

- हात थरथरणे

- चक्कर येणे

- पोट दुखणे

- भ्रम होमे

- घाम येणे

- सर्दी झाल्यासारखं वाटणे

ही डोकेदुखी थांबण्याचे उपाय

- वेळेवर हेल्दी जेवण करणे

- जेवण स्कीप करू नका.

- कामात बिझी राहत असाल तर थोडा वेळ काढून थोड्या थोड्या अंतराने जेवण करा.

- नेहमी सोबत एनर्जी ठेवा.

- हाय शुगर असलेले चॉकलेट किंवा गोड ज्यूस टाळावे, कारण ग्लूकोजची लेव्हल अचानक वाढली तर डायबिटीसचा धोका असू शकतो.

- भूक मेनटेन करण्यासाठी भरपूर पाणी प्यावे.

- नेहमी सोबत एखादं फळ ठेवावं.

Web Title: All you need to know about hunger headache included causes symptoms and remedies

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.