शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

​ALERT : आपण धुम्रपान करताय! तर आपल्यासाठी या आठ गोष्टी आहेत महत्त्वाच्या !

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2017 17:23 IST

सिगारेट जळाल्यानंतर त्यातून ७ हजारापेक्षा जास्त रसायने निघतात. त्यापैकी ६९ तर एवढे हानिकारक रसायने असतात जे कॅन्सरची शक्यता वाढवितात.

-Ravindra Moreअमेरिकन लंग असोसिएशनतर्फे नुकताच करण्यात आलेल्या संशोधनानुसार सिगारेट जळाल्यानंतर त्यातून ७ हजारापेक्षा जास्त रसायने निघतात. त्यापैकी ६९ तर एवढे हानिकारक रसायने असतात जे कॅन्सरची शक्यता वाढवितात. ही रसायने शरीराच्या वेगवेगळ्या भागांवर परिणाम करुन आरोग्याला हानी पोहोचवतात. छातीच्या आजारांच्या तज्ज्ञांनुसार धुम्रपानामुळे शरीरावर आठ प्रकारे नुकसान होत असते. १. रक्ताभिसरण प्रक्रिया- सिगारेटच्या धुराचा शरीरातील रक्ताभिसरण प्रक्रियेवर प्रतिकूल परिणाम होऊन ही प्रक्रिया मंदावते. त्यामुळे कॅन्सर होण्याची शक्यता सुमारे ५१ टक्के वाढते. २. मेंदू- संशोधनानुसार सिगारेट ओढल्याने मेंदुतील कॉर्टेक्सचा भाग पातळ होतो. यामुळे मेंदूची क्षमता कमी होऊ लागते. ३. ह्रदय- नियमित सिगरेट ओढल्याने उच्च रक्तदाब वाढतो, ज्यामुळे स्ट्रोक आणि ह्रदय विकाराचा धोका निर्माण होतो.४. यकृत- नियमित सिगरेट ओढल्याने यकृत मध्ये टार जमा होतो, त्यामुळे यकृतचा कॅन्सर वाढण्याची ९० टक्के शक्यता वाढते. ५. तोंड - धुरात असलेल्या रसायनांमुळे तोंडातील लाळ कोरडी होते शिवाय दातांसंबंधी समस्या निर्माण होतात. यामुळे तोंडाचा कॅन्सर होण्याची शक्यता बळावते. ६. डोळे- सिगरेटमधील तंबाखूत कित्येक आॅक्सिडेंट्स असतात ज्याचा डोळ्यांवर विपरित परिणाम होतो. यामुळे डोळ्यांचे तेज कमी होणे, मोतीबिंदू, मॅक्युलर डिजनरेशन आणि आॅप्टिक न्युरोपॅथी सारख्या समस्या निर्माण होतात.  ७. हाडे- यातील निकोटीन शरीरातील अ‍ॅस्ट्रोजन हार्मोन्सचा परिणाम कमी करतात. त्यामुळे हाडे ठिसूळ होऊन हाडांंच्या समस्या निर्माण होतात. ८. डी.एन.ए.- सिगारेटमध्ये फेनानथरेन नावाचा घटक असतो जो रक्तात मिसळतो आणि डी.एन.ए.ला हानी पोहोचवतो. ज्यामुळे कॅन्सरची शक्यता बळावते. Also Read : धुम्रपानामुळे मी वडिलांना गमावले !* काय उपाय कराल-* पालक - आपल्या नियमित आहारात पालकचा समावेश करा. यातील फॉलिक अ‍ॅसिड आणि विटॅमिन बी ९ शरीरील टॉक्सिन्स बाहेर टाकण्यात मदत करतात.* संत्री- दिवसभरातून नियमित एक किंवा दोन संत्री खा किंवा एक ग्लास संत्रीचा ज्यूस प्या. यातील विटॅमिन ‘सी’ शरीरातील निकोटिन बाहेर काढते. * निंबू- निंबूमध्ये पुरेशा प्रमाणात विटॅमिन ‘सी’ असते जे निकोटिन बाहेर काढण्यास मदत करते. यासाठी रोज सकाळी नियमित अनाशापोटी एका निंबूचा रस प्या. * गाजराचा रस - नियमित गाजराचा रस प्या. यातील अ‍ॅन्टिआॅक्सिडेंट्स शरीरातील निकोटिन बाहेर काढण्यास मदत करते.* ब्रोकोली (फुलभाजी)- आहारात ब्रोकोलीचा समावेश करावा, यातील विटॅमिन ‘बी’, ‘बी५’ आणि ‘सी’ शरीरातील निकोटिन बाहेर काढण्यास मदत करते. * काकडी- आहारात नियमित काकडीचा समावेश असावा. यामुळे शरीर हायड्रेट राहते आणि निकोटिन बाहेर पडण्यास मदत होते. * आले- नियमित एक कप पाण्यात आल्याचा तुकडा गरम करुन प्या. यातील अ‍ॅन्टिआॅक्सिडेंट्स निकोटिन बाहेर काढण्यास मदत करते. * कोशिंबीर - आहारात नियमित कोशिंबिरीचा समावेश करावा. यात फायबर भरपूर प्रमाणात असते ज्यामुळे निकोटिन बाहेर टाकण्यास मदत होते. * पाणी- दिवसभरातून किमान १० ते १२ ग्लास पाणी प्या. यामुळे शरीरातील विषारी द्रव्ये बाहेर पडण्यास मदत होते. * अंकुरित कडधान्य (स्प्राउट्स)-  रोजच्या ब्रेकफास्टमध्ये अंकुरीत कडधान्याचा समावेश करावा. यात समावेश असलेल्या फायबरमुळे शरीरातील निकोटिन बाहेर पडण्यास मदत होते.