आता आवाजावरून कळेल भविष्यात मानसिक रोग होणार की नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 19, 2019 10:50 IST2019-06-19T10:50:05+5:302019-06-19T10:50:36+5:30

वैज्ञानिकांनी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स वापरून एक सिस्टीम तयार केली आहे. जी आवाजाचं विश्लेषण करते.

AI tool can predict psychosis risk from your speech | आता आवाजावरून कळेल भविष्यात मानसिक रोग होणार की नाही!

आता आवाजावरून कळेल भविष्यात मानसिक रोग होणार की नाही!

जगभरात आरोग्यासंबंधी काहीना काही रिसर्च सुरू असतात. रूग्णांवरील उपचार आणखी कसे सोप्या पद्धतीने करता येतील किंवा रोगांचं निदान कसं पटकन करता येईल यावरही रिसर्च सुरू असतात. असाच एक रिसर्च मानसिक आरोग्यासंबंधी करण्यात आला. आता एखाद्या व्यक्तीच्या आवाजावरून हे कळेल की, त्या व्यक्तीला भविष्यात मानसिक आजार होईल की नाही. 

वैज्ञानिकांनी आर्टिफिशिअल इंटेलिजन्स वापरून एक सिस्टीम तयार केली आहे. जी आवाजाचं विश्लेषण करते. ही सिस्टीम भाषेत लपलेल्या संकेतांना ओळखते, ज्याच्या आधारावर भविष्यात होणाऱ्या आजाराबाबत माहिती मिळेल. ही सिस्टीम अमेरिकेतील एमोरी विश्वविद्यालयाने विकसित केली आहे. 

एआय मोठा आवाज आणि अस्पष्ट शब्दांचं विश्लेषण करतं

एनपीजे सिजोफ्रेनिया जर्नलमध्ये प्रकाशित रिसर्चनुसार, आर्टिफिशिअल इंटेलिजन्सने तयार केलेली सिस्टीम भाषेतील दोन प्रकारच्या शब्दांचं खासकरून विश्लेषण करते. पहिला असा शब्द ज्यांचा मनुष्य सर्वात जास्त आणि मोठ्याने वापर करतात. दुसरा तो ज्यात मनुष्य स्पष्टपणे बोलू शकत नाही. याच्या आधारावर भविष्यात होणाऱ्या मानसिक आजाराची ९३ टक्क्यांपर्यंत तंतोतंत माहिती दिली जाऊ शकते.

मायक्रोस्कोपसारखी नवी टेक्नीक

एमोरी विश्वविद्यालयाचे अभ्यासक नेगुइन रेजाई यांचं म्हणणं आहे की, नवीन टेक्नीक फार संवेदनशील आहे आणि ज्या गोष्टींची सहज माहिती मिळवता येत नाही, त्याची माहिती मिळवता येते. हे एकप्रकारे मायक्रोस्कोपसारखं आहे. जे आधीच आजाराबाबत अलर्ट करतं. भाषेत अशा शब्दांची ओळख करणं हे ठीक तसंच आहे जसं डोळ्यात सूक्ष्म बॅक्टेरिया बघणं.

वेळेआधीच मानसिक रोगांची माहिती मिळणार

रिसर्चच्या निष्कर्षानुसार, मशीनीच्या माध्यमातून भाषेशी संबंधित असे विकार ओळखते, जे मानसिक विकाराशी जुळलेले असतात. अभ्यासकांचं म्हणणं आहे की, सिजोफ्रेनियासारखा मानसिक विकार सामान्यपणे २० व्या वर्षात बघायला मिळतो. अशात २५ ते ३० टक्के केसेसमध्ये काउन्सिलिंगच्या मदतीने ८० टक्क्यांपर्यंत वेळीच ओळखला जाऊ शकतो. पण नव्या टेक्नीकमुळे आजाराची माहिती अधिक लवकर मिळवता येऊ शकते. 

Web Title: AI tool can predict psychosis risk from your speech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.