...अन्यथा डोळे लाल होतील; इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी 'हा' करा उपाय

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2020 01:27 PM2020-07-13T13:27:35+5:302020-07-13T13:33:55+5:30

फक्त डोळे लाल झाले असतील आणि इतर कोणत्याही प्रकारच्या शारीरिक समस्या उद्भवत नसतील तर डोळे येणं हे कारण  असू शकतं.

Agra city conjunctivitis cases increased in the month of july need to take precautions jagran special | ...अन्यथा डोळे लाल होतील; इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी 'हा' करा उपाय

...अन्यथा डोळे लाल होतील; इन्फेक्शनपासून वाचण्यासाठी 'हा' करा उपाय

googlenewsNext

दरवर्षी पावसाळ्यात वातावरणातील बदलांमुळे किंवा पावसाळ्या सुरू झाल्याच्या मधल्या टप्प्यात कंजेक्टिवायटीस या आजाराची समस्या उद्वभवते. तुम्ही या आजाराचे नाव ऐकले नसेल तरी डोळे येणं हा प्रकार तुम्हाला माहीत असेल. अनेकांना या कालावधीत डोळे येण्याची समस्या उद्भवते. सध्या कोरोना व्हायरसच्या लक्षणांमध्ये डोळे येण्याच्या लक्षणांचा समावेश असल्यामुळे भीतीचं वातावरण पसरलं आहे. कारण वातावरणातील बदलांमुळे डोळे येणं आणि कोरोनाचाच्या संक्रमणामुळे डोळे येणं यात फरक आहे. आज आम्ही तुम्हाला डोळे येऊ नयेत म्हणून काळजी कशी घ्यायची याबाबत सांगणार आहोत. 

कंजेक्टिवायटीस या आजारात डोळ्याच्या बुबुळांचा भाग सोडून आजूबाजूच्या भागात एक थर तयार होतो. त्याला कंजेक्टिवा असं म्हणतात.  हा आजार बॅक्टेरिअल, व्हायरल संक्रमण किंवा एलर्जीमुळे उद्भवतो. अनेकदा डोळ्यांना सूज येते. उन्हाळा ते हिवाळा या दरम्यान वातावरणात निष्क्रीय झालेले व्हायरस सक्रिय होतात. त्यामुळे ही समस्या उद्भवते. हे इन्फेक्शन फारसं घातक समजले जात नाही. धूळ, घाण, किटाणू यांमुळे हा आजार उद्भवतो. पण वेळेवर डॉक्टरांचा सल्ला घेतला नाही तर समस्या वाढण्याची शक्यता असते. 

लक्षणं

डोळे लाल होणं

डोळयांमध्ये जळजळ होणं

सूज येणे

खाज येऊन डोळ्यातून पाणी बाहेर येणे

बचावाचे उपाय

डोळ्यांची काळजी घेण्यासाठी हात नेहमी स्वच्छ ठेवा, अस्वच्छ हातांनी डोळ्यांना स्पर्श करणं टाळा, रुमालाने आपले डोळे पूसत राहा, पाण्याने स्वच्छ धुवा, आजारी व्यक्तीच्या कपड्यांचा वापर करू नका, घरातून बाहेर पडताना चष्म्याचा वापर करा.

एसएन मेडिकल कॉलेजचे रोग विशेषज्ञ डॉ. हिमांशु कुमार यादव यांनी दिलेल्या माहितीनुसार सध्याच्या स्थितीत कंजेक्टिवायटीस या आजारासाठी रुग्णांचे फोन आम्हाला येत आहेत. सध्याचा काळ  संवेदनशील आहे. म्हणून कोरोनाच्या संक्रमणापासून वाचण्यासाठी घरातून बाहेर पडणं टाळायला हवं. कोरोनापासून बचावासाठी शासनाने आणि जागितक आरोग्य संघटनेने दिलेल्या गाईडलाईन्सचं पालन करायला हवं. 

फक्त डोळे लाल झाले असतील आणि इतर कोणत्याही प्रकारच्या शारीरिक समस्या उद्भवत नसतील तर डोळे येणं हे कारण  असू शकतं. पण अंगदुखी, ताप, खोकला, सर्दी यांसह श्वास घ्यायला त्रास होणं आणि डोळे आले असतील तर कोरोनाचं संक्रमण असू शकतं. म्हणून डॉक्टराशी संपर्क साधून तपासणी करून घ्या

श्वास सोडल्यानंतर १ तास हवेत जिवंत राहतो कोरोना विषाणू? तज्ज्ञांनी सांगितलं की...

'या' देशात लसीच्या मानवी चाचणीला सप्टेंबरमध्ये सुरुवात होणार; जाणून घ्या लस बाजारात कधी येणार

Web Title: Agra city conjunctivitis cases increased in the month of july need to take precautions jagran special

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.