नेहमी तरूण आणि फ्रेश दिसण्यासाठी मदत करतात हे ज्यूस!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2023 16:36 IST2023-07-07T16:35:26+5:302023-07-07T16:36:02+5:30

Health Tips : चार असे ज्यूस सांगणार आहोत ज्यांच्या सेवनाने तुमच्या शरीरातील मेटाबॉलिज्म वाढतं आणि याने तुम्ही नेहमी तरुण दिसाल. 

Add these four juices in diet to always stay young | नेहमी तरूण आणि फ्रेश दिसण्यासाठी मदत करतात हे ज्यूस!

नेहमी तरूण आणि फ्रेश दिसण्यासाठी मदत करतात हे ज्यूस!

Health Tips :  माणसं वाढतं वय हे त्याच्या शरीर आणि त्वचेवर दिसायला लागतं. त्यामुळे हेल्दी डाएट फार गरजेचं आहे. आज आम्ही तुम्हाला चार असे ज्यूस सांगणार आहोत ज्यांच्या सेवनाने तुमच्या शरीरातील मेटाबॉलिज्म वाढतं आणि याने तुम्ही नेहमी तरुण दिसाल. 

1) बीटाचा ज्यूस

आयर्नसाठी बीट हे फार चांगले फळ आहे. त्यासोबतच यात अधिक प्रमाणात पोटॅशिअम सुद्धा असतं. शरीरात आवश्यक रक्त निर्मिती करणे, त्वचा तजेलदार ठेवणे यासाठी या बीटाचा ज्यूस फार उपयोगी आहे. 

2) मोसंबीचा ज्यूस 

मोसंबीचा ज्यूस बाराही महिने मिळू शकतो. यात अधिक प्रमाणात व्हिटॅमिन सी आणि अॅंटी ऑक्सीडेंट आढळतात. या तत्वांमुळे शरीराला होणाऱ्या वेगवेगळ्या इन्फेक्शनपासून सुरक्षा होते. मोसंबीचा ज्यूस रक्तीसाठीही चांगला असतो. 

3) संत्र्याचा ज्यूस

संत्र्यामध्ये असलेलं सिट्रीक अॅसिड स्कीनला हायड्रेट ठेवण्यासोबतच सूर्याच्या घातक किरणांपासूनही सुरक्षा देतं. त्यामुळे रोज आपल्या डाएटमध्ये संत्र्याचा ज्यूस सामिल करा. या ज्यूसमुळे पचनक्रियाही चांगली होते. 

4) डाळिंबाचा ज्यूस

डाळिंबाच्या फायद्यांबाबत सर्वांनाच माहिती आहे. नेहमी आजारी पडल्यावर डाळिंब खाण्याचा सल्ला दिला जातो. डाळिंबाच्या ज्यूसमध्ये फायबर अधिक प्रमाणात असतं त्यामुळे याचा फायदा त्वचेला होतो. त्यासोबत याने रक्तही शुद्ध राहतं. 

Web Title: Add these four juices in diet to always stay young

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.