बॉलिवूड अभिनेत्री आणि माजी मिस युनिव्हर्स राहिलेली सुष्मिता सेन गेल्या काही वर्षांपासून बॉलिवूडपासून दूर आहे. पण तिच्या चाहत्यांना तिचं बॉलिवूडमध्ये अचानक एक्झिट घेण्याचं कारण माहिती नव्हतं. पहिल्यांदाच सुष्मिता यावर मोकळेपणाने बोलली आहे. सुष्मिताने सांगितले की, कार्टिसोल हार्मोन्सच्या कमतरतेच्या समस्ये ग्रस्त होती. त्यामुळे तिच्यासाठी काम करणं कठीण झालं होतं आणि डॉक्टरांनी सुद्धा तिला काही दिवस कामापासून दूर राहण्याचा सल्ला दिला होता. पण नेमकी ही समस्या काय आहे हे जाणून आपण जाऊन घेऊ.

बेशुद्ध होऊन पडली होती सुष्मिता

(Image Credit : BizAsia)

राजीव मसंद यांना दिलेल्या मुलाखतीत सुष्मिताने सांगितले की, २०१४ मध्ये तिची तब्येत फारच बिघडली होती. ज्यामुळे डॉक्टरांनी तिला काम न करण्याचा सल्ला दिला होता. यादरम्यान तिला अनेक आरोग्यासंबंधी अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. २०१४ मध्ये जेव्हा ती बंगाली सिनेमा 'निरबाक'ची शुटींग करत होती, तेव्हा ती अचानक बेशुद्ध होऊन पडली होती. टेस्ट केल्यावर समोर आलं होतं की, तिच्या शरीरात 'कार्टिसोल हार्मोन' ची कमतरता आहे.

कार्टिसोल हार्मोन महत्त्वाचे का?

(Image Credit : Daily Burn)

कार्टिसोल एक स्टेरॉइड आहे आणि तणावाला हेच हार्मोन कारणीभूत असतात. कार्टिसोल हार्मोन्स अधिवृक्क ग्रंथींच्या माध्यमातून रिलीज होता. या ग्रंथी किडनीजवळ असतात. या हार्मोनला स्ट्रेस हार्मोनही म्हटलं जातं. शरीरात कार्टिसोल हार्मोनचं प्रमाण २४ तासात कमी आणि जास्त होतं.

कमी आणि जास्त दोन्ही घातक

कार्टिसोल हार्मोन एट्रिनल ग्लॅंड तयार करतात. सुष्मिताने सांगितले की, तिच्य एड्रिल ग्लॅंडने कार्टिसोल हार्मोन तयार करणं बंद केलं होतं. कार्टिसोल हार्मोनचं निर्माण पूर्णपणे बंद झाल्यावर शरीराच्या अंग हळूहळू काम करणं बंद करतात. या हार्मोन्सची शरीराच्या वेगवेगळ्या क्रियांमध्ये महत्त्वाची भूमिका असते. कार्टिसोलचं कमी आणि जास्त प्रमाण असणं दोन्हीही घातकच आहे. जास्त काळासाठी शरीरात कार्टिसोलचं जास्त प्रमाण होणं किंवा कमी होणं धोकादायक ठरू शकतं. 

अडचणींचा होता काळ

सुष्मिताने सांगितले की, ती फार गंभीर स्थितीत पोहोचली होती. पण तिने हार मानली नाही. डॉक्टरांनी तिला सांगितलं होतं की, जर जिवंत रहायचं असेल तर दर ८ तासांनी एक खास स्टेरॉइड घ्यावं लागेल. याला हायड्रोकॉर्टिजोन असं म्हणतात. सुष्मिताने डॉक्टरांनी सांगितले उपचार सुरू केले. पण त्यानंतर २ वर्ष तिच्यासाठी फार तणावपूर्ण आणि त्रासदायक होते. तिचं वजन वाढू लागलं होतं आणि हाडे कमजोर होऊ लागली होती. ब्लड प्रेशरही फार वाढलं होतं. सुष्मिता सांगते की, 'मी फार जास्त आजारी होते. मी दोन मुलींची आई आहे. माझ्या मुलींना माझी गरज होती. पण अशात माझ्यासोबत जे होत होतं ते मला घाबरवणारं होतं'.

लंडन, जर्मनी आणि अबूधाबीमध्ये उपचार

२०१४ ते १०१६ दरम्यान सुष्मितावर लंडन आणि जर्मनीमध्ये उपचार झालेत. या दोन्ही ठिकाणी तिची सायनॅक्टेन टेस्ट झाली. टेस्ट केल्यावर दोन्ही ठिकाणी सांगण्यात आलं की, तिला जिवंत राहण्यासाठी सतत स्टेरॉइड्स घ्यावे लागतील. २०१६ च्या शेवटी शेवटी सुष्मिता फार जास्त आजारी होती. अशात ती अबूधाबीच्या क्वीकलॅंड हॉस्पिटलमध्ये गेली.

हार काही मानली नाही...

सुष्मिता सांगितले की, या गंभीर आजाराशी हार मानण्याच्या तिच्या जिद्दीमुळे तिने या आजारालाच हरवलं. अबूधाबीच्या हॉस्पिटलमध्ये तिला स्टेरॉइड्स देण्यात आले आणि पुन्हा टेस्ट केल्या गेल्या. जेव्हा ती हॉस्पिटलमधून परत येत होती, तेव्हा अचानक तिच्या डॉक्टरांचा फोन आला आणि त्यांनी सांगितले की, आता स्टेरॉइड्स घेणे बंद केले पाहिजे. कारण तिचं शरीर आता पुन्हा कार्टिसोल हार्मोन तयार करू लागलं आहे.   


Web Title: Actress Sushmita Sen was suffering from cortisol hormone deficiency, Know what is the disease
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.