शरीरासाठी विष आहेत या 3 पांढऱ्या गोष्टी, डॉक्टर म्हणाले - नसांमध्ये जमा होईल Cholesterol
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 27, 2023 13:22 IST2023-05-27T13:22:20+5:302023-05-27T13:22:57+5:30
Cholesterol Foods To Avoid: मैदा, मॅयोनीज आणि लोणी या तीन गोष्टींचं अलिकडे अधिक सेवन केलं जात आहे. अर्थातच या पांढऱ्या गोष्टींना टेस्ट असते, पण हे तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक आहेत.

शरीरासाठी विष आहेत या 3 पांढऱ्या गोष्टी, डॉक्टर म्हणाले - नसांमध्ये जमा होईल Cholesterol
Cholesterol Foods To Avoid: कोलेस्ट्रॉल एका वेगाने वाढणारी आरोग्य समस्या आहे. फॅट जास्त असलेल्या पदार्थांच सेवन अधिक केल्याने आणि एक्सरसाइज ने केल्याने ही समस्या होते. कोलेस्ट्रॉल एक चिकट पदार्थ असतो जो नसांमध्ये जमा होतो आणि यामुळे नसा ब्लॉक होतात. अशात रक्तप्रवाह नीट होत नाही आणि हार्ट अटॅक, स्ट्रोक यांचा धोका वाढतो.
मैदा, मॅयोनीज आणि लोणी या तीन गोष्टींचं अलिकडे अधिक सेवन केलं जात आहे. अर्थातच या पांढऱ्या गोष्टींना टेस्ट असते, पण हे तुमच्या आरोग्यासाठी नुकसानकारक आहेत. याचं जास्त सेवन केलं तर शरीरात कोलेस्ट्रॉल लेव्हल वाढते. याने तुमच्या नसा ब्लॉक होऊ शकतात.
डॉक्टरांनी सांगितलं की, या तिन्ही गोष्टींमध्ये फॅट जास्त असतं आणि ते जर हृदयाच्या नसांमध्ये जमा झालं तर हार्ट अटॅक येऊ शकतो. जर मेंदुच्या नसांमध्ये जमा झालं तर ब्रेन अटॅक म्हणजे स्ट्रोक येऊ शकतो. जर पायांच्या नसांमध्ये जमा झालं तर चालणं अवघड होतं. कोलेस्ट्रॉल आणि त्यामुळे होणाऱ्या समस्यांपासून बचाव करायचा असेल तर पांढऱ्या गोष्टींचं सेवन अजिबात करू नका.
मैदा
मैदा हा रिफाइंड करून तयार केला जातो. ज्यामुळे याच्यातील सगळे पोषक तत्व नष्ट झालेले असतात. मैदा किंवा मैद्याचे पदार्थ खाल्ल्याने बॅड कोलेस्ट्रॉल वाढतं. लठ्ठपणा वाढतो आणि धमण्या बंद होतात. तसेच ब्लड प्रेशर आणि ब्लड शुगरही वाढते.
लोणी
यात काहीच दुमत नाही की, लोणी किंवा बटरने तुमच्या पदार्थांची टेस्ट दुप्पट होते. पण यात सॅच्युरेटेड फॅट आणि ट्रान्स फॅट अधिक असतं. हे दोन्ही कोणत्याही व्यक्तीच्या रक्तात बॅड कोलेस्ट्रॉल वाढवू शकतात.
मेयोनीज
आजकाल लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच मेयोनीजचं अधिक सेवन करतात. याचा वापर पिझ्झा, बर्गर, मोमोज इत्यादींमध्ये केला जातो. इतरही फास्ट फूडमध्ये याचा वापर होतो. यात भरपूर फॅट असतं आणि अशात जर तुम्ही याचं जास्त सेवन करत असाल तर याने कोलेस्ट्रॉल वाढतं.
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी काय खावं
कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी तुम्ही हेल्दी आणि कमी फॅट असलेले पदार्थ खावेत. तुम्ही तुमच्या आहारात ओट्स, कडधान्य, बीन्स, भेंडी, वांगी, फळं, नट्स, सोया आणि फॅटी फिश व फायबरचा समावेश करा.
नसांमधील फॅट कमी करण्यासाठी
आपल्या नियमित आहारात कडधान्य, डाळी, बीन्स, फळं, नट्स आणि बीयांचा समावेश करा. त्यासोबतच रोज हिरव्या पालेभाज्यांचं सेवन करा. इतकंच नाही तर रोज अर्धा एक्सरसाइज करा. स्मोकिंग आणि मद्यसेवन टाळा.