Harvard नुसार 'हे' आहेत जगातील सगळ्यात शक्तीशाली फूड्स, बीपी, कोलेस्ट्रॉल सगळं होईल दूर

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2024 11:45 AM2024-03-18T11:45:05+5:302024-03-18T11:45:56+5:30

Harvard नुसार, काही सुपरफूड्स आहेत ज्यांचं सेवन नियमित सेवन करून तुम्ही हाय ब्लड प्रेशर, हृदयरोग, डायबिटीस काही वेगळ्या प्रकारच्या कॅन्सरचा धोका कमी केला जाऊ शकतो.

According to Harvard eat these superfoods to beat cancer cholesterol diabetes and high bp together | Harvard नुसार 'हे' आहेत जगातील सगळ्यात शक्तीशाली फूड्स, बीपी, कोलेस्ट्रॉल सगळं होईल दूर

Harvard नुसार 'हे' आहेत जगातील सगळ्यात शक्तीशाली फूड्स, बीपी, कोलेस्ट्रॉल सगळं होईल दूर

निरोगी आणि फीट राहण्यासाठी आपल्या आहाराची सगळ्यात मोठी भूमिका असते. जगात अशा अनेक गोष्टी आहेत ज्या खाऊन तुम्ही जास्त काळ निरोगी जगू शकता. निरोगी आणि जास्त जीवन जगण्यासाठी हेल्दी डाएट घेणं फार महत्वाचं आहे. पण जगात सगळ्यात हेल्दी गोष्टी कोणत्या आहेत हे तुम्हाला माहीत आहे का? याचं उत्तर हार्वर्डने दिलं आहे. Harvard नुसार, काही सुपरफूड्स आहेत ज्यांचं सेवन नियमित सेवन करून तुम्ही हाय ब्लड प्रेशर, हृदयरोग, डायबिटीस काही वेगळ्या प्रकारच्या कॅन्सरचा धोका कमी केला जाऊ शकतो.

खासकरून प्लांट बेस्ड खाद्य पदार्थ आरोग्याला फायदे पोहोचवण्यासोबतच गंभीर आजारांचा धोका कमी करण्यास मदत करतात. त्याच सुपरफूड्सबाबत आम्ही आज तुम्हाला सांगणार आहोत.

बेरीज

बेरीजमध्ये फायबर भरपूर असतं. सोबत नॅचरल शुगर असते. यांचा गर्द रंग सांगतो की, यांमध्ये अ‍ॅंटी-ऑक्सिडेंट आणि रोगप्रतिकारक पोषक तत्व भरपूर असतात. जेव्हा यांचा सीझन नसतो तेव्हा हे फ्रोजनही खरेदी करू शकता. 

हिरव्या पालेभाज्या

हिरव्या रंगाच्या पालेभाज्यांमध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि कॅल्शिअम भरपूर असतात. सोबतच यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे फायटोकेमिकल्स (झाडांद्वारे बनवले जाणारे रसायन जे तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात) आढळतात. यात फायबरही भरपूर असतं.

नट्स

हाज़ेलनट्स, अक्रोड, बदाम, पेकान यांच्यात प्रोटीन भरपूर असतं. यांमध्ये मोनोअनसॅचुरेटेड फॅट्सही असतं. ज्यामुळे हृदयरोगांचा धोका कमी होण्यास मदत मिळते. मुठभर ड्राय फ्रुट्स दलिया किंवा दह्यात टाकून खावे किंवा स्नॅक्स म्हऊन खावे. पण यात कॅलरीही जास्त असतात.

ऑलिव्ह ऑइल

ऑलिव्ह ऑइलमध्ये व्हिटॅमिन ई, पॉलीफेनोल्स आणि मोनोअनसॅचुरेटेड फॅटी अ‍ॅसिड्स भरपूर असतं. जे हृदयरोगाचा धोका कमी करण्यास मदत करतात. पास्ता किंवा तांदळाच्या पदार्थांमध्ये बटर किंवा इतर तेलाचा वापर करण्याऐवजी या वापर करा. भाज्यांवर थोडं टाकून खाऊ शकता.

कडधान्य

कडधान्यांमध्ये फायबर भरपूर असतं. तसेच यांमध्ये व्हिटॅमिन बी, मिनरल्स आणि फायटोन्यूट्रिएंट्सही भरपूर असतात. जे कोलेस्ट्रॉल कमी करण्यास व हृदयरोग आणि डायबिटीसपासून बचाव करतात.

या गोष्टीही हेल्दी

तसेच दही, सगळ्या प्रकारच्या डाळी, वेगवेगळ्या कोबी, टोमॅटो आणि शेंगाही सुपरफूड्सच्या कॅटेगरीमध्ये येतात. तुम्हाला नेहमी राहण्यासाठी या गोष्टींचं सेवन नियमित केलं पाहिजे.

Web Title: According to Harvard eat these superfoods to beat cancer cholesterol diabetes and high bp together

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.