शहरं
Join us  
Trending Stories
1
राज्यात ३९४ ठिकाणी 'नमो उद्यान' विकसित करणार; नरेंद्र मोदींच्या वाढदिवशी एकनाथ शिंदे यांची घोषणा
2
माँसाहेब मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्यावर रंग फेकला, ठाकरे गट आक्रमक, दादरमध्ये तणाव
3
पंतप्रधान नरेंद्र मोदींवरील बायोपिकची घोषणा, हा अभिनेता साकारणार भूमिका, पोस्टर रिलीज
4
"२४ तासांच्या आत कळलं पाहिजे"; मीनाताईंच्या पुतळ्यावर रंग फेकल्याच्या प्रकरणावरुन राज ठाकरेंचा इशारा
5
जय शाह आणि अनुरग ठाकूर शाहिद आफ्रिदीला भेटले? जाणून घ्या 'त्या' VIDEO चे सत्य...
6
मारुती व्हिक्टोरिससाठी २ लाखांचे डाऊनपेमेंट केले तर किती बसेल EMI? बेस मॉडेलसाठी...
7
लग्नाच्या अवघ्या २०व्या दिवशी नवरी झाली फरार; नवऱ्याला म्हणाली लवकर जाऊन येते अन्...
8
पगारापेक्षा जास्त घरभाडे; SEBI ने आपल्या प्रमुखांसाठी घेतले अपार्टमेंट, मासिक भाडे तब्बल ₹७ लाख
9
एटीएममधून पैसे निघाले नाहीत, तरी अकाउंटमधून कट झाले? फक्त या स्टेप फोलो करा, बँक स्वतः देईल भरपाई
10
"आज आजोबा हयात असते, तर धर्माच्या नावाखाली जे..."; प्रबोधनकारांसोबतचा फोटो, राज ठाकरेंनी कुणाचे टोचले कान?
11
Chota Rajan: गँगस्टर छोटा राजनला सर्वोच्च न्यायालयाचा दणका, जया शेट्टी हत्या प्रकरणात जामीन रद्द!
12
५८ किलो सोने, ८ कोटी रोकड चोरीला; SBI बँकेत दरोडा, महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांकडून चोरांचा शोध
13
"अभिषेकच्या शेजारीच माझ्यावर अंत्यसंस्कार करा"; भावाच्या मृत्युनंतर बहिणीने संपवलं आयुष्य, हातावरच लिहिली शेवटची इच्छा
14
अपघाताने आयुष्य उद्ध्वस्त! स्ट्रेचरवर जखमी पत्नी अन् शेजारी पतीचा मृतदेह; डोळे पाणावणारा फोटो
15
चिंताजनक! मेंदू खाणाऱ्या अमिबाने घेतला १८ जणांचा जीव, तापासह 'ही' लक्षणं दिसताच व्हा सावध
16
PM Modi Birthday: ७५ वर्षांचे झाले नरेंद्र मोदी! ११ वर्षांच्या कार्यकाळात शेअर बाजार सुस्साट, २४०% ची वाढ, काय आहेत कारणं?
17
अदलाबदली! २ मुलांचा बाप 'मेहुणी'सोबत पळाला; भाऊ चिडला, भावोजीच्या 'बहिणी'सोबत छूमंतर
18
जखमी नवजोत सिंह आणि त्यांच्या पत्नीला २२ किलोमीटर दूर असलेल्या हॉस्पिटलमध्ये का घेऊन गेली गगनप्रीत? झाला खुलासा!
19
PM Modi Turns 75: वयाची ७५ वी अमृत महोत्सव म्हणून का साजरी केली जाते? सनातन धर्मात सापडते उत्तर 

सकाळी रिकाम्या पोटी कोणत्या गोष्टींचं करावं सेवन? डायटिशिअनने दिला खास सल्ला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 14, 2024 11:35 IST

डायटिशिअन किरण कुकरेजा यांनी सकाळी रिकाम्या पोटी काय खाणं फायदेशीर ठरेल याबाबत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

Healthy Foods: रात्री जेवण केल्यानंतर सकाळपर्यंत अन्न पचतं आणि सकाळी पोटही साफ होतं. अशात सकाळी रिकाम्या पोटात काय जातं हेही फार महत्वाचं आहे. जर सकाळी काही अ‍ॅसिडिक पदार्थ पोटात गेले तर अ‍ॅसिडिटीची समस्या होते, काही चटपटीत खाल्लं तर पोटदुखीची समस्या होते किंवा जुलाब लागू शकतात. अशात सकाळी पोट रिकामं असताना काय खायला हवं याची काळजी घेतली पाहिजे. डायटिशिअन किरण कुकरेजा यांनी सकाळी रिकाम्या पोटी काय खाणं फायदेशीर ठरेल याबाबत एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. या पदार्थांचं सेवन करून तुम्ही पचन तंत्र चांगलं ठेवू शकता, त्वचा चांगली ठेवू शकता आणि केसही मजबूत करू शकता.रिकाम्या पोटी काय खावं?

ताजं खोबरं

डायटिशिअननुसार, नारळामध्ये आढळणारे हेल्दी फॅट्स स्किन बॅरिअरला रिपेअर करण्यास मदत करतात. तसेच याने शरीरातील इन्फ्लेमेशनही कमी होतं. रोज सकाळी ओल्या नारळाचा एक किंवा दोन तुकडे खाल्ल्याने तुम्हाला खूपसारे फायदे मिळतील.

ताज्या भाज्यांचा ज्यूस

ताज्या भाज्या आपण नेहमीच खातो. पण अनेकांना हे माहीत नसतं की, ताज्या भाज्यांच ज्यूस प्यायल्यानेही शरीराला अनेक पोषक तत्व मिळतात. ताज्या भाज्यांच्या ज्यूसमध्ये फायबर भरपूर असतं. जे आपल्या आतड्यांच्या आरोग्यासाठी फार फायदेशीर असतं. तसेच शरीरातील अनेक विषारी पदार्थ बाहेर काढण्यास याने मदत मिळते. रोज एक ग्लास, काकडीचा ज्यूस, दुधी भोपळ्याचा ज्यूस, कोथिंबिरीचा ज्यूस रिकाम्या पोटी सेवन करू शकता.

सफरचंद

रोज सकाळी एक सफरचंद खाल्ल्याने शरीराला अनेक फायदे मिळतात. याच भरपूर फायबर, मायक्रोन्यूट्रिएंट्स आणि हेल्दी फॅट असतं. जे शरीर निरोगी ठेवण्यासाठी फायदेशीर ठरतं. रोज सफरचंद खाल्ल्याने हृदयाचं आरोग्य चांगलं ठेवण्यास मदत मिळते.

रिकाम्या पोटी काय खाऊ नये?

एक्सपर्ट नेहमीच रिकाम्या पोटी काही गोष्टींचं सेवन न करण्याचा सल्ला देतात. कारण याने आरोग्याचं नुकसान होऊ शकतं. यात कॉफी, चहा यांचाही समावेश आहे. तसेच सकाळी काही चटपटीत खाल्लं तर अ‍ॅसिडिटीची समस्या होऊ शकते. आंबट फळं, कार्बोनेटेड ड्रिंक्स, गोड पदार्थ आणि प्रोसेस्ड फूड्सचं देखील रिकाम्या पोटी सेवन करू नये.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य