शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात २७ वी घटना दुरुस्ती, असीम मुनीर यांनी मिळाली जबरदस्त 'पॉवर'; पाहा किती ताकद वाढली?
2
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
3
Delhi Crime: वर्गमित्राला घरी घेऊन आला, वडिलांचे पिस्तुल घेतले आणि घातल्या गोळ्या; कारण...
4
नोकरी सोडल्यानंतरही तुमचा आरोग्य विमा संपणार नाही; 'ही' घ्या पॉलिसी पोर्ट करण्याची प्रक्रिया
5
वंदे भारत एक्सप्रेसच्या उद्घाटनावेळी विद्यार्थ्यांनी गायलं RSS गीत, राजकारण तापलं; केरळ सरकारचे चौकशीचे आदेश
6
गुंतवणूक दुप्पट करण्यासाठी श्रीमंत वापरतात 'हा' सिक्रेट फॉर्म्युला! काय आहे 'रूल ऑफ ७२'चे अचूक गणित
7
आरएसएसची नोंदणी का केली नाही? भागवतांनी दिले उत्तर; 'हिंदू धर्मही रजिस्टर्ड नाही...'
8
लगाव बत्ती... स्पीडऽऽऽ लीडर! कोल्हापूरचे पाटील, ‘साताऱ्या’चे दोन राजे
9
डिझेल वाहन मालकांसाठी...! इथेनॉलच्या 'आयसोब्युटानॉल' रुपावर टेस्टिंग सुरु; टाटा कंपनीची कार...
10
Solapur Crime: अंकिताने १४ महिन्यांच्या बाळाला पाजलं विष, नंतर स्वतःही संपवलं आयुष्य; बार्शी पुन्हा हादरली 
11
"जर पाकिस्तान परीक्षण करत असेल, तर...!"; पाकच्या अणुचाचणीवरून राजनाथ सिंहांचा थेट इशारा
12
बलात्काराचा आरोपी, आप आमदार हरमीत सिंग पठानमाजरा ऑस्ट्रेलियाला पळाला! आप सरकारवर टीका...
13
आयपीओचे धमाकेदार सबस्क्रिप्शन असूनही लिस्टिंग होतेय फ्लॉप; सेबीने घेतला मोठा निर्णय
14
पोलिसांच्या भीतीने वेगात निघाला, कार बारवर जाऊन धडकली; ४ लोक जागीच ठार, १३ जखमी
15
"प्रत्येक परिस्थितीला तोंड देण्यास सज्ज..."; राजनाथ सिंह यांचा पाकिस्तानला सूचक इशारा
16
"राष्ट्रवादीची औलाद सत्तेशिवाय राहू शकत नाही"; तानाजी सावंतांच्या वादग्रस्त विधानामुळे महायुतीत मोठा भूकंप
17
इराणमध्ये खळबळ! राजधानी तेहरानचे पाणी संपले; अवघ्या दोन आठवड्यांत शहरे रिकामी करावी लागणार...
18
गुंतवणूकदारांसाठी मोठी संधी! आठवडाभरात सोन-चांदीत मोठी घसरण! काय आहेत आजचे दर?
19
'मातोश्री'वर ड्रोनची नजर? टेहळणी होत असल्याचा ठाकरे गटाचा आरोप, मुंबई पोलीस म्हणाले, "परवानगी होती..."
20
मोठी बातमी! भारतात दहशतवादी हल्ल्याचा कट उधळला; गुजरातमधून ३ संशयित दहशतवाद्यांना अटक

आयुर्वेदानुसार शेवग्याच्या शेंगा ठरतात ३०० आजारांवर रामबाण उपाय, जाणून घ्या फायदे

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 13:05 IST

Drumstick Benefits :आयुर्वेदानुसार, शेवग्याच्या शेंगा आणि पाने ३०० पेक्षा जास्त आजारांवर रामबाण उपाय ठरतात. अशात आज आम्ही तुम्हाला शेवग्याच्या शेंगांचे फायदे सांगणार आहोत. 

Drumstick Benefits : शेवग्याच्या शेंगांची भाजी भरपूर लोक आवडीने खातात. या शेंगा वेगवेगळ्या पदार्थांमध्येही वापरल्या जातात. या खायला टेस्टी तर लागतातच सोबतच या शेंगांचे आरोग्यालाही अनेक फायदे होतात. आयुर्वेदात शेवग्याच्या शेंगांना आणि शेवग्याच्या पानांना फार महत्व आहे. आयुर्वेदानुसार, शेवग्याच्या शेंगा आणि पाने ३०० पेक्षा जास्त आजारांवर रामबाण उपाय ठरतात. अशात आज आम्ही तुम्हाला शेवग्याच्या शेंगांचे फायदे सांगणार आहोत. 

जास्तीत जास्त लोक प्रोटीन मिळवण्यासाठी मांस, अंडी आणि दुधाचं सेवन करतात पण तुम्हाला वाचून आश्चर्य वाटेल की, या गोष्टींपेक्षाही जास्त प्रोटीन तुम्हाला या भाजीतून मिळू शकतं. यात भरपूर प्रमाणात प्रोटीन, अमीनो अ‍ॅसिड, बीटा कॅरेटीन, कॅल्शिअम, फायबर, सोडिअम, कार्बोहाइड्रेट, फॉस्‍फोरस, जिंकसारखे मिनरल्स आणि वेगवेगळे फीनॉलिक असतात. तसेच या शेंगांमध्ये व्हिटॅमिन-A, व्हिटॅमिन-B१, व्हिटॅमिन-B२, व्हिटॅमिन-B३, व्हिटॅमिन-B४, व्हिटॅमिन-B६, व्हिटॅमिन-B९ आणि व्हिटॅमिन-C भरपूर असतात. या शेंगांचं सेवन केल्यावर शरीराला काय फायदे मिळतात जे जाणून घेऊ.

हाय ब्लड प्रेशर

आजकाल बऱ्याच लोकांना हाय ब्लड प्रेशरची समस्या असते. अशात ज्यांना हाय ब्लड प्रेशरची समस्या आहे अशा लोकांनी शेवग्याच्या शेंगाची भाजी खाणं फायदेशीर ठरतं.

तरूण दिसाल

शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन ए असतं. ज्याचा वापर पूर्वीपासून सौदर्यासाठी केला जातो. जर तुम्ही या शेवग्याच्या शेंगाचा आहारात नियमित समावेश कराल तर तुमच्यावर वाढत्या वयाची लक्षणे दिसणार नाही.

हाडं आणि दात मजबूत

शेवग्याच्या शेंगांमध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असतात. ज्याने तुम्हाला हाडे मजबूत करण्यास मदत मिळते. तसेच दातही मजबूत होतात. म्हणूनच लहान मुलांना या शेंगांची भाजी देणं फायदेशीर मानलं जातं.

लठ्ठपणा कमी करा

लठ्ठपणा आणि शरीराची वाढलेली चरबी दूर करण्यासाठी शेवग्याच्या शेंगा एक फायदेशीर उपाय मानला जातो. यात फॉस्फोरस भरपूर प्रमाणात आढळतं जे शरीरातील अतिरिक्त कॅलर कमी करतं आणि सोबतच चरबी कमी करून तुमचा लठ्ठपणाही दूर करतं.

रक्त शुद्ध होतं

शेवग्याच्या पानांप्रमाणेच त्यांच्या शेंगामध्ये देखील रक्ताचे शुद्धीकरण करण्याची क्षमता असते. त्यामुळे हे शरीरात अ‍ॅंटी-बायोटीक एजंट म्हणून काम करते. त्यामुळे रक्तातील विषारी पदार्थ वाढल्याने होणारा अ‍ॅक्नेचा त्रास, त्वचाविकार कमी करण्यास शेवग्याच्या शेंगा फायदेशीर ठरतात.

शुगर नियंत्रणात ठेवा

शेवग्याच्या शेंग्यांमुळे रक्तातील साखर नियंत्रणात राहण्यास मदत होते. परिणामी मधूमेह नियंत्रणात राहण्यास मदत होते. तसेच पित्ताशयाचे कार्य सुधारण्यासही शेंग़ा फायदेशीर ठरतात. त्यामुळे शरीराचे कार्य आणि स्वास्थ्यही सुधारतं. 

श्वासासंबंधी समस्या दूर कार

कफ, श्वास घेताना त्रास होणे अशा समस्या असतील तर शेवग्याच्या शेंगांचे कपभर सूप प्यावे. यामधील तत्व श्वसनमार्गातील टॉक्सिक तत्व कमी करण्यास मदत करतात. अस्थमा यासारख्या फुफ्फुसांच्या आजारांमध्येही शेवग्याच्या शेंगा उत्तम नैसर्गिक उपाय म्हणून काम करतात.

इन्फेक्शनपासून बचाव

शेवग्याच्या पाना, फूलांमध्ये अ‍ॅंटी-बॅक्टेरियल तत्व असतात. यामुळे वेगवेगळ्या इन्फेक्शन आणि आजारांपासून तुमचा बचाव होतो. शेवग्याच्या शेंगांमध्ये व्हिटामिन सी भरपूर असतं. ज्यामुळे रोगप्रतिकारशक्ती वाढते.  तसेच शरीरातील फ्री रॅडीकल्सचा धोका कमी करण्यासही शेवग्याच्या शेंग़ा फायदेशीर ठरतात.

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य