शहरं
Join us  
Trending Stories
1
सामंतांनी मदत केली तर... रत्नागिरी-सिंधुदूर्गात राणे - ठाकरे संघर्षाचा सामना; बालेकिल्ला कोणाचा याचाही फैसला
2
निवडणूक ‘यांची’, प्रतिष्ठा पणाला ‘त्यांची’; मुलगी, मुलगा, बहीण, सुनेसाठी करावी लागतेय अपार मेहनत
3
राज्यावर पाणीटंचाईचे संकट अधिक चिंताजनक; पाणीसाठा २८ टक्क्यांवर; २,३४४ गावांत २,९५२ टँकर्स सुरू
4
अपोफिस लघुग्रहामुळे ‘दुसरे लोणार’ नाही; दा. कृ. सोमण यांची माहिती
5
राधाकृष्ण विखे आणि मल्लिकार्जुन खर्गेंमध्ये झाली गुप्त बैठक, प्रकाश आंबेडकरांचा सनसनाटी दावा
6
पूंछमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला; हवाई दलाचा जवान शहीद, ४ जखमी
7
आजचे राशीभविष्य - ५ मे २०२४, कुटुंबात सुखशांतीचे वातावरण असेल, धनप्राप्ती संभवते
8
कांदा निर्यातबंदी अखेर घेतली मागे, ६४ रुपये प्रतिकिलोने निर्यातीस मान्यता; प्रतिक्विंटल ५०० रुपयांनी वाढले दर
9
सेक्स स्कॅण्डल प्रकरणी एच. डी. रेवण्णा अटकेत; एसआयटीने घेतले ताब्यात
10
सांगली, सातारचे ‘ते’ संजय पाटील ‘नॉट रिचेबल’; एकाच व्हेंडरकडून प्रतिज्ञापत्र अन्...
11
फाेडाफाेडीच्या राजकारणात काेणाची हाेणार सरशी? चार नावे जाहीर करून काँग्रेसने टाकला डाव, भाजपसह ‘आप’चे वाढले टेन्शन 
12
रायबरेलीत राहुल गांधी मोठ्या फरकाने निवडणूक हरतील : अमित शाह यांचा दावा
13
पंतप्रधान मोदी हे ‘शहेनशहा’... काँग्रेस नेत्या प्रियांका गांधी यांची टीका
14
पाकला ‘शहजादा’ हवा पंतप्रधानपदी; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घणाघाती टीका
15
माझ्याकडे पैसे नाहीत, मी निवडणूक लढवू शकत नाही; नाराजी व्यक्त करत काॅंग्रेसच्या उमेदवाराने तिकीट केले परत
16
"आई आणि बायकोच्या राड्यात...", कुशल बद्रिकेची 'ती' पोस्ट चर्चेत
17
इंटरनेटवरून पसरणारा कट्टरतावाद धोकादायक; इंटरपोल परिषदेत भारताची ठाम भूमिका
18
पोलिसांनी मागवले राजभवनचे सीसीटीव्ही फुटेज, चाैकशी सुरू; राज्यपालांवरील लैंगिक शोषणाचे आरोप
19
गैरवापर रोखण्यासाठी ‘४९८ अ’ कायदा बदला; सर्वोच्च न्यायालयाकडून केंद्र सरकारला महत्त्वाची शिफारस 
20
भाजपकडूनच राहुल गांधी यांचा जप! काँग्रेस नेत्या सुप्रिया श्रीनेत यांची टीका

डायबेटिसपेक्षा 'या' आजाराचं प्रमाण जास्त; महिलांना सर्वाधिक धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 24, 2019 11:19 PM

गर्भधारणेच्या काळात त्रास होत असल्यानं महिलांनी तपासणी करुन घेणं गरजेचं

मुंबई: डायबेटिसपेक्षा थायरॉईडच्या विकाराचं प्रमाण जास्त असून महिलांना त्याचा सर्वाधिक धोका आहे. विशेष म्हणजे गर्भधारणेच्या काळात महिलांना हायपो-थायरॉइडिझचा त्रास होतो. याचा थेट परिणाम गर्भवतीच्या आणि बाळाच्या आरोग्यावर होतो. त्यामुळे या समस्येची तीव्रता जास्त आहे आणि त्याकडे गांभीर्यानं लक्ष देण्याची आवश्यकता आहे. याचसाठी अ‍ॅबॉट, आयटीएस आणि एफओजीएसआय यांनी मिटा (मेक इंडिया थायरॉईड अवेअर) अभियानाची सुरुवात केली आहे. थायरॉईडबद्दल जनजागृती व्हावी, अधिकाधिक लोकांनी याबद्दलची आवश्यक चाचणी करावी आणि गरज असल्यास योग्य ते उपचार घ्यावेत, असं आवाहन यावेळी अ‍ॅबॉट, आयटीएस आणि एफओजीएसआयच्या डॉक्टरांनी केलं. यावेळी इंडियन थायरॉईड सोसायटीचे सचिव डॉ. शशांक जोशी यांनी थायरॉईडची समस्या सोप्या शब्दांत समजावून सांगितली. 'घशाजवळ असलेलं थायरॉईड आपल्या शरीरातील पेशींना ऊर्जा पुरवतं. त्यावर परिणाम झाल्यास वारंवार थकवा जाणवतो. यावरील उपचार आता कमी दरात उपलब्ध आहेत. साध्या टॅबलेटनं ही समस्या दूर होऊ शकते. मात्र योग्य वेळी याबद्दलची चाचणी करून घेणं आवश्यक आहे, ' असं जोशी यांनी म्हटलं. यावेळी पत्रकार परिषदेला संबोधित करण्यासाठी उपस्थित असलेल्या फेडरेशन ऑफ ओबस्टेट्रिक अँड गायनॅकॉलिजिस्ट सोसायटीज ऑफ इंडियाच्या (फॉग्सी) अध्यक्षा डॉ. नंदिता पालशेतकर यांनी या आजाराचा महिलांना असणारा धोका अधोरेखित केला. 'दर तीनपैकी एका महिलेला हा त्रास जाणवतो. गर्भवतींना ही समस्या जाणवत असल्यानं त्याचा परिणाम बाळावर होतो. बाळाच्या नैसर्गिक वाढीवर, बुद्धीवर थेट परिणाम होत असल्यानं याचं गांभीर्य जास्त आहे. कारण यामुळे भविष्यात त्या मुलामुळे संबंधित कुटुंबावर आर्थिक भार पडू शकतो. म्हणून गर्भवती महिलांवर केलेले उपचार म्हणजेच देशाच्या पुढील पिढीवर केलेले उपचार असल्याचं आम्ही समजतो', अशा शब्दांमध्ये डॉ. पालशेतकर यांनी हायपो-थायरॉइडिझमची व्यापकता समजावून सांगितली. 

आयटीएस, फॉग्सी या दोन संस्था अ‍ॅबॉटच्या सहकार्यानं थायरॉईडबद्दलची जनजागृती करत आहेत. या तिन्ही संस्थांनी सुरू केलेल्या मिटा अभियानातील अ‍ॅबॉट इंडिया लिमिटेडची भूमिका मेडिकल डायरेक्टर डॉ. श्रीरुपा दास यांनी स्पष्ट केली. 'मिटा अभियानात अ‍ॅबॉट अंमलबजावणीचं काम करेल. यासाठी ८५०० डॉक्टरांनी शपथ घेतली आहे. देशात दरवर्षी २.६ कोटी बालकं जन्म घेतात. हा आकडा लक्षात घेतल्यास समस्येची व्यापकता लक्षात येऊ शकेल. थायरॉईडची समस्या अतिशय सोप्या पद्धतीनं दूर होते. त्यासाठीचे उपचार फारसे खर्चिक नाहीत. मात्र त्यासाठी वेळीच चाचणी करण्याची आवश्यकता आहे,' असं दास म्हणाल्या.

टॅग्स :Healthआरोग्यpregnant womanगर्भवती महिलाPregnancyप्रेग्नंसी