चिमूटभर बेकिंग सोड्यानं दूर होतील अनेक समस्या, जाणून घ्या कसा कराल वापर!
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2025 16:01 IST2025-01-23T16:00:58+5:302025-01-23T16:01:26+5:30
Baking soda health benefits :सामान्य वाटणारा बेकिंग सोडा देखील तुमच्या अनेक समस्या दूर करू शकतो. बेकिंग सोड्यानं आरोग्यासंबंधी अनेक समस्याही दूर करता येतात.

चिमूटभर बेकिंग सोड्यानं दूर होतील अनेक समस्या, जाणून घ्या कसा कराल वापर!
Baking soda health benefits : आपल्या किचनमध्ये वेगवेगळ्या गोष्टी ठेवलेल्या असतात. ज्यांचा संबंध केवळ खाण्यासोबत नाही तर आरोग्याशी देखील असतो. जसे की, हळदीचा वापर जखम भरण्यासाठी, काळी -मिरी, आल्याचा वापर सर्दी दूर करण्यासाठी, मोहरीचं तेल मालिश करण्यासाठी केला जातो. अशात सामान्य वाटणारा बेकिंग सोडा देखील तुमच्या अनेक समस्या दूर करू शकतो. बेकिंग सोड्यानं आरोग्यासंबंधी अनेक समस्याही दूर करता येतात.
बेकिंग सोड्याचे फायदे
- जर तुमच्या पोटात जळजळ होत असेल किंवा गॅस बनत असेल तर तुम्ही एक ग्लास पाण्यात चिमूटभर सोडा मिक्स करून पिऊ शकता. हा उपाय केल्यास काही मिनिटांमध्ये तुम्हाला आराम मिळेल.
- पिवळे दात चमकवण्यासाठीही तुम्ही बेकिंग सोड्याचा वापर करू शकता. यानं तुमच्या दातांवरील पिवळा थर दूर होईल आणि दात मोत्यांसारखे चमकू लागतील. यासाठी चिमूटभर बेकिंग सोडा दातांवर घासा आणि काही मिनिटांसाठी तसाच ठेवा. नंतर गुरळा करा.
- बेकिंग सोडा थोड्या पाण्यात मिक्स करून स्क्रबही तयार करू शकता. यानं त्वचा साफ होते आणि डेड सेल्सही दूर होतात. ज्यामुळे त्वचा चमकदार दिसते.
- बेकिंग सोडा फ्रिज, शूज किंवा कोणत्याही ठिकाणी ठेवला तर त्यातून येणारी दुर्गंधी दूर होते. तसेच बेकिंग सोडा एक ग्लास पाण्यात मिक्स करून प्यायल्यास डोकेदुखीपासूनही आराम मिळतो.
- बेकिंग सोडा काही ठिकाणांवर शिंपडल्यास त्या जागांवर कीटक येत नाही. बेकिंग सोड्याच्या पाण्यानं चामड्याच्या वस्तूंची सफाई केली तर त्या चमकदार होतील.
आवश्यक - आरोग्यासंबंधी कोणत्याही समस्या दूर करण्यासाठी बेकिंग सोड्याचा वापर करण्याआधी एकदा डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.