शहरं
Join us  
Trending Stories
1
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
2
डोनाल्ड ट्रम्प अन् इलॉन मस्कची 'दिलजमाई' झाली? चार्ली किर्कच्या शोकसभेत दिसले एकत्र! ‘तो’ एक फोटो चर्चेत
3
FD-RD विसरुन जाल, LIC ची ही स्कीम आहे जबरदस्त, मुलीच्या लग्नासाठी मिळेल २७ लाखांची रक्कम
4
आम्ही गरिबीत, तुमची मौज का? आणखी एका देशात लोक रस्त्यावर; जनतेच्या पैशाची लूट, पसरला असंतोष
5
बगराम तळावरून सुरु झाला नवा संघर्ष? डोनाल्ड ट्रम्प यांच्या धमकीवर तालिबानचे प्रत्युत्तर
6
शेअर बाजारात मोठी घसरण, Sensex ४७५ अंकानी आपटला; Nifty मध्येही घसरण, IT शेअर्समध्ये जोरदार विक्री
7
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींवर नवदुर्गा कृपा, पद-पैसा-लाभ; अकल्पनीय यश, अनपेक्षित भरभराट!
8
"आता जे गरजेचं ते करावंच लागेल"; सरसंघचालक भागवत अमेरिकेच्या टॅरिफ आणि 'एच१ बी'बद्दल स्पष्टच बोलले 
9
Mumbai: गावी जाण्यासाठी पैसे देण्यास नकार दिल्यानं पत्नीची हत्या; कांदिवली येथील घटना!
10
देवोलिना भट्टाचार्जी पुन्हा प्रेग्नंट? फोटोशूटवरुन चर्चांना उधाण; ९ महिन्यांपूर्वीच दिला मुलाला जन्म
11
नौशादनं 'आकाश' बनून फसवलं, एका मुलाच्या आईसोबत लग्न केलं अन् ४ मित्रांसोबत मिळून...; घटना ऐकून येईल चीड!
12
आजपासून 'GST' उत्सव! मध्यम वर्गाला होणार मोठा फायदा; खरेदी वाढणार, अर्थव्यवस्थेला बूस्टर मिळणार
13
पाकिस्तानच्या नाकी नऊ आणणाऱ्या अभिषेक शर्माचा नावावर विश्वविक्रमाची नोंद, युवराजलाही टाकले मागे
14
GST कपातीनंतर आता कोणत्या वस्तूंवर सर्वाधिक टॅक्स?; यादी वाचा, अन्यथा खिशाला बसेल झळ
15
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्या हस्ते 'मिशन शक्ती ५.०'चा शुभारंभ; महिला सुरक्षेवर भर, पोलिसांत महिलांचा सहभाग वाढला!
16
युक्रेनचा रशियावर ड्रोन हल्ला! क्रिमिया रिसॉर्टवरील हल्ल्यात २ जणांचा मृत्यू, १५ जण गंभीर जखमी
17
Eknath Shinde: जीएसटी सुधारणांमुळे उत्पादन आणि रोजगार वाढेल- एकनाथ शिंदे
18
'दशावतार'चे १० दिवस, कमावले 'इतके' कोटी, एकूण कमाईचा आकडा वाचून वाटेल अभिमान
19
H-1B व्हिसाने हैराण झालेल्यांना चीनची ऑफर; भारतीयांसाठीही मोठी संधी! काय आहे नवा ‘के- व्हिसा’?
20
भारत-पाकिस्तान युद्ध मीच थांबवले; ४० पेक्षा अधिक वेळा ट्रम्प यांचा दावा, आता तरी नोबेल द्या

छातीत जळजळीच्या या ८ लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष, कॅन्सर-हार्ट अटॅकचा असू शकतो संकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2021 15:51 IST

नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये दावा करण्यात आल आहे की, हार्टबर्नची समस्या कॅन्सर आणि हार्ट अटॅकचा धोका वाढण्यासंबंधितही असू शकतो.

हार्टबर्नची समस्येने रोज कुणीना कुणी हैराण झालेलं असतं. हार्टबर्न व्यक्तीला छातीच्या बरोबर मधे जळजळ जाणवू लागते. ही समस्या काही मिनिटांपासून ते  काही तासांपर्यंतची असू शकते. अनेकदा प्रेग्नेन्सी, गेस्ट्रोइसोफेगल फिफ्लक्स डिजीज किंवा अॅंटी-इनफ्लेमेटरी ड्रग्स घेतल्याने ही समस्या होते. पण छातीत होणारी ही जळजळ काही बाबतीत गंभीरही ठरू शकते.

नुकत्याच करण्यात आलेल्या एका रिसर्चमध्ये दावा करण्यात आल आहे की, हार्टबर्नची समस्या कॅन्सर आणि हार्ट अटॅकचा धोका वाढण्यासंबंधितही असू शकतो. त्यामुळे शरीराच याची काही लक्षणे दिसली तर वेळीच डॉक्टरांशी संपर्क साधा.

- काही तासांपासून सतत छातीत दुखत असेल तर...

- छातीत जळजळीची लक्षणे गंभीर होणे किंवा असं सतत होणं

- गिळताना त्रास होणे किंवा वेदना होणे

- छातीत जळजळ होत असल्याने उलटी येणे

- शरीराचं वजन अचानक कमी होणे

- २ आठवड्यांपर्यंत हार्टबर्न किंवा इनडायजेशनची औषधे घेणे आणि नंतर लक्षणे जाणवणे

- गंभीरपणे घसा बसणे किंवा अस्वस्थता जाणवणे

कॅन्सर - हार्टबर्नशी संबंधित समस्या अनेक घशाच्या किंवा पोटातील आतड्यांच्या कॅन्सरचंही कारण असू शकते. आतड्यांमध्ये वाहणारं अॅसिड अनेकदा टिशू डॅमेज करतं आणि याने एसोफॅगस एडिनोकार्सिनोमा विकसित होतो. एका प्रसिद्ध बेरियाट्रिक सर्जन लिनास वेनक्लॉसकास यांच्यानुसार, हार्टबर्नची कारण लगेच जाणून घेऊन उपचार घेतले गेले नाही तर एसोफॅगसला ट्रिगर करू शकतं. जो डायजेशन सिस्टीममध्ये होणारा एक प्री-कॅन्सर डिजीज आहे. 

हायटस हर्निया - जेव्हा पोटाचा भाग डायफ्राममध्ये कमजोरीमुळे छातीचा खालचा भाग वरच्या दिशेने ढकलतो तेव्हा याला हायटस हर्निया म्हटलं जातं.  ही समस्या छातीत वेदना किंवा जळजळ होतेवेळी चेक केल्यावरही पकडली जाऊ शकते.  सामान्यपणे ही समस्या ५० पेक्षा जास्त वयाच्या लोकांमध्ये बघितली जाऊ शकते. जोपर्यंत लक्षण गंभीर होत नाही तोपर्यंत यावर उपचार करण्याचीही गरज पडत नाही. पण छातीत सतत जळजळ होत असेल तर यावर वेळीच उपचार करा.

पेप्टिक अल्सर डिजीज - पेप्टिक अल्सर डिजीजने ग्रस्त लोक नेहमीच याला छातीतील जळजळ समजून दुर्लक्ष करतात. हार्टबर्न आणि पेप्टिक अल्सर डिजीजची लक्षणे पूर्णपणे एकसारखी असतात. त्यामुळे मळमळ, उलटी, वेदना आणि ब्लीडिंगमुळे विष्ठेचा रंग बदलणे यासारख्या लक्षणांवरही लक्ष देणं गरजेचं आहे. असं झाल्यावर लगेच डॉक्टरांना संपर्क साधा.

हार्ट अटॅक - हार्ट अटॅकच्या प्रकरणातही लोक अनेकदा याला हार्टबर्न समजून दुर्लक्ष करतात. यातील फरक जाणून घेण्यासाठी काही लक्षणांवर लक्ष ठेवणं गरजेचं आहे. छातीत वेदना, छातीत जोरात जळजळ, चिकट त्वचा, इनडायजेशन आणि मळमळ यांसारखी लक्षणं हार्ट अटॅकचा वॉर्निंग साइन असू शकतो. छातीत जळजळसोबत वेदना, तोंड कडू पडणे, झोपल्यावर वेदना वाढणे, चटपटीत खाल्ल्यावर गळ्यापर्यंत जळजळ होणेही हार्टबर्नची प्रमुख लक्षणे आहेत. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य