7 things to keep in mind before buying a health insurance | हेल्थ इन्शुरन्स घेताना कोणत्या ७ गोष्टी ठेवाव्या लक्षात!
हेल्थ इन्शुरन्स घेताना कोणत्या ७ गोष्टी ठेवाव्या लक्षात!

(Image Credit : acko.com)

परिवाराचं भविष्य सुरक्षित करण्यासाठी आपण वेगवेगळं प्लॅनिंग करत असतो. आर्थिक नुकसान होऊ नये म्हणून आपण वेगवेगळे प्रयत्न करत असतो. अशात तुम्हाला इन्शुरन्स पॉलिसी विकणाऱ्या अनेक कंपन्याही भेटतील. पण इन्सुरन्स पॉलिसी घेतल्याने भविष्य तर आनंदी होतं, पण हेल्थ इन्सुरन्स खरेदी करताना काही गोष्टींची खास काळजी घ्यावी लागते. काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर तुम्हाला मोठं नुकसान झेलावं लागू शकतं. त्यामुळे चला जाणून घेऊ हेल्थ पॉलिसी घेताना कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी.

पैसे अजिबात वाया जात नाही

अनेक लोक असा विचार करतात की, हेल्थ इन्शुरन्स घेणं म्हणजे पैशांची बरबादी आहे. तुम्हाला जर याचा क्लेम घेण्याची गरज पडली नाही तर चांगलीच बाब आहे. पण निरोगी राहणं आणि सांभाळून राहणं याला काहीही पर्याय नाही. पण जर तुम्हाला गरज पडलीच तर तुमच्यावर एकदम भार पडू नये म्हणून हेल्थ पॉलिसी काढणं गरजेचं आहे. 

पॉलिसीच्या सब-लिमिट 

हेल्थ पॉलिसी घेताना पॉलिसीच्या सब-लिमिटकडे अधिक लक्ष दिलं गेलं पाहिजे. पॉलिसीमध्ये काही सबलिमिट असतात. म्हणजे रूमचं भाडं, उपचाराचा खर्च, डॉक्टरांची फी इत्यादी. अशात तुम्ही जर इमरजन्सीत एखाद्या महागड्या हॉस्पिटलमध्ये रूग्णाला अडमिट केलं तर सबलिमिटमुळे तुम्हाला अडचण निर्माण होऊ शकते. त्यामुळे पॉलिसी घेताना सबलिमिट असलेला पर्याय निवडू नका.

योग्य कंपनी निवडा

हेल्थ इन्सुरन्स पॉलिसी घेताना ती कोणत्या कंपनीकडून घेताय, त्या कंपनीची पूर्ण माहिती घ्यावी. त्यांनी आतापर्यंत किती लोकांना क्लेम सेटल केले याची सरासरी काढायला हवी. त्या कंपनीची आर्थिक क्षमता बघायला पाहिजे. या गोष्टी बघणं फार महत्वाचं आहे.

कॅशलेस नेटवर्क

कॅशलेस देवाण-घेवाण ही हेल्थ पॉलिसी घेताना सर्वात फायदेशीर ठरते. वेगवेगळ्या कारणाने हा पर्याय चांगला ठरतो. एकतर प्रोसेस लगेच होते आणि तुम्हाला फार जास्त कागदपत्रे जमा करत बसण्याची गरज पडणार नाही. याने तुमचा भरपूर वेळही वाचतो आणि रिम्बर्समेंट लवकर मिळतं. त्यामुळे पॉलिसी देणाऱ्या कंपनीच्या लिस्टमध्ये अशा हॉस्पिटला शोध घ्या जे कॅशलेस क्लेम सेटलमेंट करतात.

तरूण असताना पॉलिसी घेत असाल तर

अनेक इन्शुरन्स पॉलिसीमध्ये वयाची अट हा मुख्य मुद्दा असतो. पॉलिसीसाठी वय ६५ च्या खाली लागतं. या वयानंतर तुम्ही पॉलिसी काढू शकत नाहीत. त्यामुळे तरूण असतानाच पॉलिसी काढाल तर तुम्हाला त्याचा म्हातारपणी अधिक जास्त फायदा होऊ शकतो. कारण त्याच वयात मेडिकलचा जास्त खर्च करावा लागतो. कमी वयात हेल्थ पॉलिसी काढाल तर तुम्हाला प्रिमिअमही कमी भरावा लागेल.

संपूर्ण कव्हरेज

जास्तीत जास्त पॉलिसींमध्ये ट्रिटमेंटची काही टक्के रक्कम तुम्हालाही भरावी लागते. कंपनी पूर्ण ट्रिटमेंट कव्हरेजची गॅरंटी देत नाही. आता वेळेवर इमरजन्सीमध्ये तुम्ही पैसे कुठून आणणार? अशात संपूर्ण कव्हरेज असलेली पॉलिसीच निवडा.  अनेक कंपन्या त्यांच्या हिशेबाने पॉलिसी डिझाइन करत असतात. 

संपूर्ण परिवाराचाही समावेश

अनेक लोक जास्त प्रिमिअम भरावा लागतो म्हणून पालकांना पॉलिसीमध्ये घेण्यास टाळतात. पण हेल्थ इन्शुरन्समध्ये तुमच्या संपूर्ण कुटूंबाला घेणं गरजेचं आहे. त्यांचं आरोग्य आता कसं आहे, हे बघून त्यांनाही पॉलिसीमध्ये सामावून घ्या. 


Web Title: 7 things to keep in mind before buying a health insurance
Get Latest Marathi News & Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and local news from all cities of Maharashtra.