नसांमध्ये ब्लॉकेज झाल्यावर दिसतात 'हे' ५ संकेत, वेळीच घ्या डॉक्टरांचा सल्ला! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2024 15:23 IST2024-12-26T15:03:22+5:302024-12-26T15:23:01+5:30

Symptoms Of Veins Blockage: नसांमध्ये ब्लॉकेज म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा. यामुळे शरीरात ब्लड सर्कुलेशन योग्यपणे होत नाही.

5 signs seen in the body indicate blockage in vein | नसांमध्ये ब्लॉकेज झाल्यावर दिसतात 'हे' ५ संकेत, वेळीच घ्या डॉक्टरांचा सल्ला! 

नसांमध्ये ब्लॉकेज झाल्यावर दिसतात 'हे' ५ संकेत, वेळीच घ्या डॉक्टरांचा सल्ला! 

Symptoms Of Veins Blockage: आपल्या शरीरात हजारो नसा असतात. नसांचं काम शरीरातील सगळ्या अवयवांपर्यंत रक्त आणि आवश्यक पोषक तत्व पोहोचवणं असतं. अशात निरोगी राहण्यासाठी नसा चांगल्या आणि मोकळ्या राहणं गरजेचं असतं. जर नसांमध्ये काही समस्या झाली तर शरीरातील अनेक महत्वाचे अवयव प्रभावित होऊ शकतात. आजकाल खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि चुकीच्या लाइफस्टाईलमुळे नसांसंबंधी अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. नसांमध्ये ब्लॉकेज ही त्यातील एक कॉमन समस्या आहे. 

नसांमध्ये ब्लॉकेज म्हणजे रक्तवाहिन्यांमध्ये अडथळा. यामुळे शरीरात ब्लड सर्कुलेशन योग्यपणे होत नाही. नसांमध्ये ब्लॉकेज होण्याची कारणं वेगवेगळी असतात, जसे की, चुकीचं खाणं-पिणं, लठ्ठपणा, कमी शारीरिक हालचाल, हाय कोलेस्टेरॉल आणि धुम्रपान इत्यादी.

नसांमध्ये ब्लॉकेज झाल्यानं हार्ट अटॅक आणि स्ट्रोकसारख्या गंभीर आजारांचा धोका वाढतो. नसांमध्ये ब्लॉकेज झाल्यानं शरीरात काही लक्षण दिसू लागतात. जर वेळीच ही लक्षणं ओळखली गेली तर गंभीर धोका टाळला जाऊ शकतो. अशात जाणून घेऊ नसांमध्ये ब्लॉकेज झाल्यावर दिसणाऱ्या काही लक्षणांबाबत...

छातीत वेदना

नसांमध्ये ब्लॉकेजेस झाल्यावर व्यक्तीच्या छातीत वेदना किंवा जडपणा जाणवू शकतो. नसांमध्ये ब्लॉकेजमुळे ऑक्सिजनयुक्त रक्त हृदयापर्यंत योग्य प्रमाणात पोहोचत नाही. ज्यामुळे छातीत वेदना होतात. या वेदना हलक्या ते गंभीर असू शकतात. सामान्यपणे छातीच्या मधोमध वेदना होते. जर तुम्हाला असं लक्षण दिसत असेल तर वेळीच डॉक्टरांना संपर्क करा.

श्वास घेण्यास अडचण

नसांमध्ये ब्लॉकेज झाल्यावर श्वास घेण्यास समस्या होऊ शकते. ब्लॉकेजमुळे शरीरात पुरेसं ऑक्सिजन पोहचत नाही. याच कारणानं श्वास घेण्यास समस्या होते. ही समस्या शारिरिक हालचाली दरम्यान अधिक जाणवते. थोडी मेहनत केल्यावरही श्वास भरून येत असेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

थकवा आणि कमजोरी

जास्त थकवा आणि कमजोरी जाणवणं हा सुद्धा नसांमध्ये ब्लॉकेजचा संकेत असू शकतो. नसा ब्लॉक झाल्यामुळे हृदयाला रक्त पंप करण्यासाठी अधिक मेहनत करावी लागते. यामुळेच व्यक्तीला पुन्हा पुन्हा थकवा आणि कमजोरी जाणवते. जर तुम्हालाही असं काही लक्षण दिसत असेल तर वेळीच डॉक्टरांना भेटा.

चक्कर येणे

नसांमध्ये ब्लॉकेज झाल्यावर चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे असं लक्षण दिसू शकतं. नसा ब्लॉक झाल्यामुळे मेंदुपर्यंत योग्य प्रमाणात ऑक्सीजन पोहोचत नाही. ज्यामुळे चक्कर येणे किंवा बेशुद्ध पडणे अशा समस्या होतात. असं लक्षण दिसलं तर वेळीच सावध व्हा.

हात-पाय थंड पडणे

जर तुमचे हात-पाय नेहमीच थंड राहत असतील तर नसांमध्ये ब्लॉकेज असण्याचं संकेत असू शकतो. ब्लॉकेज झाल्यावर रक्त पुरवठा योग्य पद्धतीने होत नाही. ज्यामुळे हात-पाय थंड जाणवू शकतात. त्याशिवाय अनेक लोकांना हात-पायांमध्ये वेदना किंवा सूज जाणवू शकते. जर तुम्हाला असं लक्षण दिसलं तर डॉक्टरांना दाखवा.

Web Title: 5 signs seen in the body indicate blockage in vein

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.