शहरं
Join us  
Trending Stories
1
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
2
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
3
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
4
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
5
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
6
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
7
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
8
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
9
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
10
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
11
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
12
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
13
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
14
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
15
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
16
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
17
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
18
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
19
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
20
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
Daily Top 2Weekly Top 5

इच्छा असूनही आपल्या गोंडस बाळाला जवळ घेऊन शकत नाही 'हे' कपल, कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 1, 2019 13:44 IST

हे कपल त्यांच्या बाळाला ५ महिन्यांनंतरही जवळही घेऊ शकत नाही आणि त्याला मिठीही मारू शकत नाही.

(All Pictures Credit : metro.co.uk)

३५ वर्षीय विक्टर आणि त्याची ३६ वर्षीय पत्नी एड्रियाना यांच्या घरी नुकताच एका गोंडस बाळाने जन्म घेतला. अर्थातच हा त्यांच्यासाठी जगातला सर्वात मोठा आनंदाचा क्षण आहे. पण दु:खद बाब ही आहे की, हे कपल त्यांच्या बाळाला ५ महिन्यांनंतरही जवळही घेऊ शकत नाही आणि त्याला मिठीही मारू शकत नाही. ते त्याला जवळ घेऊन त्याचा लाडही करू शकत नाही. कारण त्याला एक गंभीर आजार झालाय. ज्यामुळे त्याच्या काही अवयवांवर त्वचाच आली नाही.

कॅलिफोर्नियातील सेंट जोसेफ हॉस्पिटलमध्ये एड्रियानाने या बाळाला जन्म दिला. एड्रियाना यावर सांगते की, 'आम्ही फार प्रेमाने त्याचं नाव एड्रीन ठेवलं. त्याच्या जन्मावेळीच आम्हाला लक्षात आलं होतं की, काहीतरी गडबड आहे. तो जास्त रडत होता, थरथरत होता. त्याला फार वेदना होत होत्या'. जन्मानंतर त्याला लगेच दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आलं. तिथे समजलं की, या बाळाला Epidermolysis Bullosa हा आजार आहे. या आजारात शरीराच्या त्वचेवर जखमा असतात. जळल्यावर ज्याप्रमाणे जखमा किंवा घाव होतात तसेच.

मेट्रो यूकेने दिलेल्या वृत्तानुसार, हा जीवघेणा आजार आहे. सामान्यपणे जन्मानंतर पहिल्या वर्षातच बाळाचं जगणं कठीण असतं. मृत्यू दर ८७ टक्के आहे. एड्रियाना सांगते की, 'एड्रीनसोबत घालवत असलेला आमचा प्रत्येक दिवस, प्रत्येक महिना अमूल्य आहे'. बाळाचे वडील विक्टर म्हणाला की, 'जेव्हा एड्रीनचा जन्म झाला तेव्हा आम्ही फार आनंदी होतो. पण त्याची संवेदनशील त्वचा पाहून आम्ही सगळे हैराण होतो. त्याची त्वचा एखाद्या फुलापाखरासारखी आहे. स्पर्श करताच त्वचा निघते. हे पाहून मी कित्येक तास शून्यात गेलो होता. काहीच कळत नव्हतं'.

एड्रीनला डॉक्टर अ‍ॅंटी-बायोटिक देत आहेत. तो सामान्य मुलांप्रमाणे खळखळून हसतो, रडतोही. त्याला भूकही लागते. पण त्याचे आई-वडील त्याला स्पर्शही करू शकत नाहीत. एका महिन्यानंतर एड्रीनला हॉस्पिटलमधून घरी आणण्यात आलं आहे. विक्टरने सांगतो की, 'एखाद्या दिवशी तो आम्हाला ठीक होताना दिसतो, तर दुसऱ्याच दिवशी त्याची स्थिती वाईट होते. देवाने या मुलासोबत असं का केलं असावं?'.

या आजाराने पीडित इतर लोकांशी भेटून विक्टर आणि एड्रियाना दोघांनाही फार काही दिलासा मिळाला नाही. कारण त्यांनी हेच सांगितले की, हा आयुष्यभराचा संघर्ष आहे. आता या कपलने बाळाच्या उपचारासाठी क्राउड फंडिंग सुरू केलं आहे. दर महिन्याला एड्रीनच्या उपचारासाठी १५ हजार ते १६ हजार डॉलर इतका खर्च येतो.

टॅग्स :Healthआरोग्यCaliforniaकॅलिफोर्निया