दातांवरील पिवळेपणा घालवण्यासाठी खास नॅच्युरल उपाय, तोंडाचा येणार नाही वास!
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 6, 2023 13:09 IST2023-10-06T13:08:31+5:302023-10-06T13:09:15+5:30
पाण्यातील केमिकल्स, तंबाखू आणि कलर्ड पदार्थ खाल्ल्यानेही दातांवर पिवळेपणा येतो. आम्ही तुम्हाला दात चमकदार करण्यासाठी काही नैसर्गिक उपाय सांगणार आहोत.

दातांवरील पिवळेपणा घालवण्यासाठी खास नॅच्युरल उपाय, तोंडाचा येणार नाही वास!
दात पिवळे किंवा काळे असतील तर अनेकद इतरांसमोर आपल्याला मोकळेपणाने हसताही येत नाही. लोकांचे दात वेगवेगळ्या कारणांनी पिवळे होत असताता. ते सतत अशा काही चुका करतात ज्या त्यांनी टाळायला पाहिजे. चुकीच्या खाणं-पिणं आणि काही चुकीच्या सवयींमुळे दात पिवळे होतात.
पाण्यातील केमिकल्स, तंबाखू आणि कलर्ड पदार्थ खाल्ल्यानेही दातांवर पिवळेपणा येतो. दात चमकवण्यासाठी मार्केटमध्ये शेकडो प्रोडक्ट मिळतील, पण त्यातील केमिकलमुळे हिरड्या आणि दातांचं नुकसान होऊ शकतं. अशात आम्ही तुम्हाला दात चमकदार करण्यासाठी काही नैसर्गिक उपाय सांगणार आहोत.
बेकींग सोडा - लिंबू
बेकींग सोडा थोडा जाडसर असतो. त्याने दातांवर स्क्रब करता येईल. त्यात थोडा लिंबाचा रस टाकावा. लिंबाच्या रसामध्ये सायट्रिक अॅसिड असतं, जे ब्लीचिंगसारखं काम करतं. त्यामुळे या दोन्हींचा वापर एकत्र केल्यास दात चांगले चमकदार होतील. एक चमचा बेकींग सोडा घ्या आणि पेस्ट करण्यासाठी यात लिंबाचा रस टाका. ही पेस्ट ब्रशने दातांवर लावा आणि एक मिनिटांसाठी तशीच ठेवा. त्यानंतर चांगल्याप्रकारे तोंड धुवा.
स्ट्रॉबेरी
स्ट्रॉबेरीचे काही तुकडे बारीक करुन ती पेस्ट दातांवर लावून मसाज करा. दिवसातून दोनदा असे केल्यास दातांचा पिवळेपणा जातो.
संत्र्याची साल
संत्र्याच्या सालीने दात साफ केल्यास काही दिवसातच पिवळेपणा जाऊन दात चमकायला लागतात. यासाठी रोज रात्री झोपताना संत्र्याची साल दातांवर घासा. संत्र्याच्या सालमध्ये व्हिटॅमिन सी आणि कॅल्शिअम असतं. जे दातांची चमक आणि मजबूती कायम ठेवतं.
लिंबू - मीठ
लिंबूचे नैसर्गिक ब्लीचींग गुणधर्म दातांवरही उपायकारक ठरतात. दातांचा पिवळेपणा घालवण्यासाठी लिंबाची साल दातांवर घासावी. लिंबू आणि मिठ एकत्र करुन दातांची मसाज करा. असे दोन आठवडे केल्यास दातांचा पिवळेपणा जाणार.
खोबऱ्याचं तेल
खोबऱ्याचं तेल किंवा तिळाच्या तेलाने दात साफ करणे ही एक आयुर्वेदिक पद्धत आहे. एक चमचा खोबऱ्याचं तेल दातांवर लावा. आठवड्यातून दोनदा असे केल्यास फायदा होईल.
लाकडाचा कोळसा
लाकडाच्या कोळश्याचं पावडर तयार करा. हे पावडर टूथब्रशच्या माध्यमातून दातांवर घासा. दिवसातून दोनवेळा हे करा. काही दिवसात तुमचे दात पांढरे दिसू लागतील.