कोरोनामुळे घरातच असाल तर ही आहे वजन कमी करण्याची मोठी संधी, फक्त करा 'या' 5 सोप्या एक्सरसाइज!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 21, 2020 11:38 IST2020-03-21T11:38:18+5:302020-03-21T11:38:52+5:30
मुळात तुम्ही घरी बसून कमी काम करत असाल आणि आराम जास्त करत असाल तर तुम्हाला लठ्ठपणा, अपचन, पोटदुखी अशा समस्या होऊ शकतात.

कोरोनामुळे घरातच असाल तर ही आहे वजन कमी करण्याची मोठी संधी, फक्त करा 'या' 5 सोप्या एक्सरसाइज!
जर तुम्ही कोरोना व्हायरसपासून बचाव करण्यासाठी स्वत:ला आयसोलेट केलं असेल तर ही तुमच्यासाठी वजन कमी करण्याची एक चांगली संधी म्हणता येईल. इतक्या कमी दिवसात फार जास्त तर नाही, पण थोडं वजन नक्कीच कमी होईल आणि तुमचा वेळही चांगला जाईल. घरातल्या घरात करता येतील अशा काही एक्सरसाइज आम्ही तुम्हाला सांगत आहोत.
मुळात तुम्ही घरी बसून कमी काम करत असाल आणि आराम जास्त करत असाल तर तुम्हाला लठ्ठपणा, अपचन, पोटदुखी अशा समस्या होऊ शकतात. जर रोज वर्क फ्रॉम होम करत असाल तर तुम्हाला आळश, झोप येण्याचीही समस्या होऊ शकते. एक्सरसाइज या सर्व समस्यांवर रामबाण उपाय ठरू शकते. चला जाणून घेऊ घरी कोणत्या एक्सरसाइज करू शकाल.
थोडं स्ट्रेचिंग, थोडी गंमत
तुमचं घर कितीही लहान असू द्या, पण कमीत कमी इतकी जागा नक्कीच असेल की, तुम्ही हात-पाय चारही बाजूने स्ट्रेच करू शकाल. तशी तर स्ट्रेचिंग कोणतीही एक्सरसाइज करण्याआधी केली जाते. पण घरी राहत असाल तर तुम्ही ही एक्सरसाइज करू शकता. जर घरात लहान मुले असतील तर त्यांच्यासोबत स्ट्रेचिंग करण्यात तुम्हाला जास्त आनंद येईल. जमिनीवर चटई किंवा मॅट टाका. स्ट्रेचिंगचा अर्थ आहे की, तणाव. ही एक्सरसाइज करून तुमचा आळस लगेच दूर होईल आणि तुम्हाला फ्रेश वाटेल.
डान्स करा
जर तुम्हाला एक्सरसाइज करण्याचा कंटाळा येत असेल किंवा एक्सरसाइज करायचीच नसेल तर तुम्ही घरातील लहान मुलांसोबत दिवसातून 20 ते 30 मिनिटे आवडत्या गाण्यावर डान्स करू शकता. डान्स करणं ही सर्वात बेस्ट एक्सरसाइज मानली जाते. कारण इतर एक्सरसाइजमध्ये तुम्ही ठराविक अवयवांची हालचाल करता, पण डान्सिंगने तुमच्या संपूर्ण शरीराची एक्सरसाइझ होते.
स्पॉट रनिंग
धावणं आरोग्यसाठी किती फायदेशीर आहे हे तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तुम्हाला बाहेर रनिंगला जायला मिळत नसेल तर घरीही तुम्ही रनिंग करू शकता. तुम्ही घरात स्पॉट रनिंग करू शकता. स्पॉट रनिंग म्हणजे एकाच जागेवर रनिंग करणे. स्पॉट रनिंगचा फायदा हा आहे की, याने ब्लड सर्कुलेशन वाढतं आणि ऑक्सिजनचं प्रमाण वाढतं. तसेच स्पॉट रनिंगने मांड्या, पोट आणि कंबरेवरची चरबी कमी होते.
स्व्कॉट्स
स्व्कॉट्स सुद्धा तुम्ही घरीच छोट्याशा जागेत करू शकता. ही घरी करण्यासाठीची सर्वात चांगली एक्सरसाइज मानली जाते. याने तुम्हाला मांड्या आणि गुडघ्यांना फायदा मिळतो. त्यासोबत पोटावरील चरबी कमी करण्यासही ही एक्सरसाइज मदत करते. या एक्सरसाइजचे तुम्ही 15 चे 3 सेट मारू शकता. याने पोटाचा घेर कमी होईल.
इतरही सोप्या गोष्टी
एक्सरसाइजसोबतच तुम्ही घरातील काही गोष्टींची काळजी घेऊन स्वत:ला मेन्टेन ठेवू शकता. जसे की, घरात झाडू मारा, लादी पुसा कारण या गोष्टी एक्सरसाइजच्या खास पद्धती आहेत. तसेच पायऱ्या चढा. जर एक्सरसाइज करायची नसेल तर पायऱ्या चढून तुम्ही फिट राहू शकता.