खराब होत असलेलं लिव्हरही मजबूत करेल हे उपाय, रिकाम्या पोटी प्या यातील कोणतंही एक ड्रिंक
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 2, 2023 17:48 IST2023-08-02T17:47:36+5:302023-08-02T17:48:11+5:30
Liver Cleaning: रक्त शुद्ध करण्याची मोठी जबाबदारी लिव्हरवर असते. लिव्हरच सगळे विषारी पदार्थ बाहेर काढतं. पण या कामात लिव्हरवर खूप जास्त दबाव तयार होतो आणि हळूहळू त्याचं काम कमजोर होतं.

खराब होत असलेलं लिव्हरही मजबूत करेल हे उपाय, रिकाम्या पोटी प्या यातील कोणतंही एक ड्रिंक
Liver Cleaning: आजकाल लोकांचं आरोग्य खूप जास्त बिघडत आहे. कारण सतत मद्यसेवन, स्मोकिंग, तळलेले पदार्थ, प्रोसेस्ड फूड यांचं सेवन वाढलं. या पदार्थांमुळे शऱीरात विषारी पदार्थ तयार होतात. जे रक्तात मिक्स होतात. मग हे अशुद्ध रक्त शरीराच्या आतील कोपरांकोपरा खराब करतं.
रक्त शुद्ध करण्याची मोठी जबाबदारी लिव्हरवर असते. लिव्हरच सगळे विषारी पदार्थ बाहेर काढतं. पण या कामात लिव्हरवर खूप जास्त दबाव तयार होतो आणि हळूहळू त्याचं काम कमजोर होतं. यामुळे फॅटी लिव्हर, फेलिअर आणि कॅन्सरही होऊ शकतो. अशात रिकाम्या पोटी काही ड्रिंक्स पिऊन तुम्ही लिव्हर स्वच्छ करू शकता. ज्याला लिव्हर डिटॉक्स म्हणतात
मिल्क थिस्ल
मिल्क थिस्ल एक झाड असतं. ज्याला दूध पत्रही म्हटलं जातं. Johns Hopkins नुसार (ref.), याचा आयुर्वेदिक चहा प्यायल्याने लिव्हरवरील सूज कमी होऊ शकते आणि लिव्हर मजबूत केलं जाऊ शकतं. तुम्ही याची पाने उकडून चहा बनवू शकता.
हळद
सूज कमी करणारी हळद लिव्हरमधील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. यात अॅंटी-इन्फ्लामेटरी गुण असतात, जे लिव्हर फेलिअर किंवा कॅन्सरपासून वाचवू शकतात. तुम्ही रोज हळद आणि आल्यापासून तयार पाण्याचं सेवन करू शकता.
बिटाचा रस
बीट हे लिव्हर डिटॉक्स करण्याच्या कामात येतं. हे शरीरातील सगळे विषारी पदार्थ एका झटक्यात बाहेर काढतं. रोज बिटाचा रस तुम्ही रिकाम्या पोटी प्यावा. याने फॅटी लिव्हर डिजीजपासूनही बचाव होतो.
आवळ्याचा रस
तुम्ही जर रिकाम्या पोटी आवळ्याचा रस प्याल तर याने खूप फायदे होतात. बॉडी डिटॉक्ससाठी आवळ्यात रस फार फायदेशीर असतो. तसेच याने त्वचा आणि केसांनाही अनेक फायदे होतात. लिव्हरच्या आजारांपासूनही बचाव होतो.
आलं आणि लिंबाचा चहा
लिंबामध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट असतात आणि आल्यामध्ये अॅंटी-इन्फ्लामेटरी गुण. या दोन्ही गोष्टी लिव्हरमधील विषारी पदार्थ बाहेर काढतात. तसेच लिव्हरवरील सूजही कमी केली जाते.