हाय बीपीची समस्या झटपट दूर करायचीय? जाणून घ्या खास फंडा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2019 10:02 IST2019-08-24T09:55:20+5:302019-08-24T10:02:02+5:30
हाय ब्लड प्रेशर या समस्येमुळे दरवर्षी अनेकांना आपला जीव गमवाव लागतो. दिवसेंदिवस हा आजार सायलेंट किलर होत चालला आहे.

हाय बीपीची समस्या झटपट दूर करायचीय? जाणून घ्या खास फंडा!
हाय ब्लड प्रेशर या समस्येमुळे दरवर्षी अनेकांना आपला जीव गमवाव लागतो. दिवसेंदिवस हा आजार सायलेंट किलर होत चालला आहे. त्याहून धक्कादायक बाब म्हणजे अनेक लोकांना हे माहितीच नसतं की, ते हाय बीपीचे शिकार झाले आहेत. पण जर या समस्येकडे दुर्लक्ष केलं तर याने हार्ट अटॅक, स्ट्रोक आणि किडनी फेलसारख्या समस्यांचा सामना करावा लागू शकतो. तज्ज्ञ सांगतात की, वजनासोबतच लाइफस्टाईलमध्ये छोटे छोटे बदल करून तुम्ही तुमचं ब्लड प्रेशर कमी करू शकता.
onlymyhealth.com या हेल्थ वेबसाइटने दिलेल्या लेखानुसार, अमेरिकन हार्ट असोसिएशन जर्नलमध्ये प्रकाशित एका रिसर्चमध्ये सांगितले की, रोज केवळ ३० मिनिटांचं वर्कआउट किंवा फिजिकल अॅक्टिविटी तुमचं ब्लड प्रेशर कमी करण्यास फायदेशीर ठरते. या रिसर्चमधून समोर आले आहे की, ज्या महिला दिवसभर ब्रेक घेऊन घेऊन वर्कआउट करतात, त्यांना याचा अधिक फायदा होतो.
वॉक करा
ब्रिस्क वॉकने(वेगाने चालणे) तुमचं ब्लड प्रेशर लो होतं. त्यामुळे हा वर्कआउट चांगला पर्याय आहे. यात हृदय वेगाने ऑक्सिजनचा वापर करतं. आठवड्यातून चार-पाच वेळा कार्डिओ एक्सरसाइज केल्यानेही बराच फरक पडतो. सुरूवात तुम्ही १५ मिनिटांच्या एक्सरसाइजपासून करू शकता. नंतर हळूहळू वेळ वाढवावी.
डीप ब्रीदिंग
काही स्लो ब्रीदिंग आणि मेडिटेशनच्या पद्धती शिकले तर तुम्हाला यांचा फायदा होऊ शकतो. याने तुमचा स्ट्रेस लगेच दूर होईल आणि तुमचं ब्लड प्रेशरही व्यवस्थित राहील. रोज सकाळी आणि सायंकाळी १० मिनिटे हे करा. जर तुम्ही योगा क्लास जॉईन केला तर फारच उत्तम.
पोटॅशिअमयुक्त पदार्थ खावेत
(Image Credit : www.organicfacts.net)
आपल्या आहारात पोटॅशिअमयुक्त पदार्थांचा समावेश करावा. त्यात रताळे, टोमॅटो, संत्र्याचा ज्यूस, बटाटे, केळी, मटार आणि मणूके हे येतात. तसेच मिठाचं सेवन कमी करा.
(टिप : वरील लेखात देण्यात आलेले सल्ले हे केवळ माहिती देण्यासाठी देण्यात आले आहेत. यातील सल्ले फॉलो करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्यावा.)