शहरं
Join us  
Trending Stories
1
OUT or NOT-OUT? Faf Du Plessis दुर्दैवीरित्या बाद झाला, अम्पायरच्या निर्णयावर विराट खवळला 
2
"मी उद्या भाजपा कार्यालयात येतोय, तुम्हाला...", विभव कुमार यांच्या अटकेनंतर अरविंद केजरीवाल यांचे नरेंद्र मोदींना आव्हान
3
निवडणूक आयोगाकडून आतापर्यंत ८८८९ कोटी रुपये जप्त; ड्रग्ज-रोकडसह 'या' गोष्टींवर कारवाई!
4
विराट कोहलीचा भीमपराक्रम! जमला नाही कोणालाच असा विक्रम, ख्रिस गेल याच्याशीही बरोबरी
5
मोदींना तिसऱ्यांदा पंतप्रधान होऊ द्या, सहा महिन्यांत पाकव्याप्त काश्मीरही भारताचा भाग झाल्याचे दिसेल- योगी आदित्यनाथ
6
विदर्भात विजांच्या कडकडाटासह पाऊस, मुंबईत कशी असणार स्थिती?; असा आहे हवामान अंदाज
7
एक चेंडू छतावर, दुसरा स्टँडवर! Virat Kohli चा नवा विक्रम, पण ज्याची भीती होती तेच झालं
8
विभव कुमार यांच्या अटकपूर्व जामीन याचिकेवर न्यायालयाचा आदेश; म्हणाले...
9
विमान प्रवास करताना कान दुखतो का? 'या' 5 सोप्या टिप्स फॉलो करा, नक्कीच वाटेल 'रिलॅक्स'!
10
धक्कादायक! पुणे-सोलापूर हायवेवर होर्डिंग कोसळून दोन जण जखमी 
11
परळीत लोकशाही नव्हे तर गुंडाराज?; व्हिडीओ पोस्ट करत रोहित पवारांचा सवाल
12
"मुंबई बॉम्बहल्ल्यातील आरोपी प्रचारात पाहून बाळासाहेबांच्या आत्म्यालाही वेदना होत असतील"
13
Rohit Sharma अखेर व्यक्त झाला! मुंबई इंडियन्सच्या अपयशाचं खरं कारण सांगितलं, म्हणाला... 
14
निस्वार्थी सुरेश रैना! विराट कोहलीनं सांगितली जगाला माहीत नसलेली Mr. IPL ची गोष्ट, Video 
15
MS Dhoniची फिल्ड प्लेसमेंट, रोहितचा पूल शॉट अन्....; विराटला हवी आहेत ६ खेळाडूंची कौशल्य
16
32000 रुपयांचा बँक बॅलन्स, 9 लाखांचे शेअर्स... स्वाती मालीवाल यांच्याकडे किती संपत्ती? जाणून घ्या...
17
Ashok Gehlot : "काँग्रेसचं सरकार असतानाही राम मंदिर बांधलं असतं कारण..."; अशोक गेहलोत यांचा मोठा दावा
18
दादा कोंडकेंच्या 'मुका घ्या मुका' चित्रपटाची अलका कुबल यांना होती ऑफर पण...
19
PM नरेंद्र मोदींची आज दिल्लीत सभा, १३ देशांचे राजदूत उपस्थित राहणार!
20
"भारतापेक्षा अधिक तेजस्वी, प्रखर लोकशाही जगात कुठेही नाही"; व्हाईट हाऊसने केली स्तुती

सकाळी उठल्यावर २७ मिनिटे करा हे काम, पूर्ण दिवस जाईल चांगला!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 08, 2018 11:13 AM

दिवसाची सुरुवात कशी होते याचा पूर्ण दिवसावर प्रभाव पडत असतो. काही अभ्यासांनुसार, आपल्या सकाळच्या काही सवयींमध्ये बदल केल्यास आपण आपला मूड रिफ्रेश करुन आपला दिवस चांगला घालवू शकतो. 

अनेकदा तुम्ही ऐकलं असेल की, दिवसाची सुरुवात चांगली झाली तर पूर्ण दिवस चांगला जातो. दिवसाची सुरुवात कशी होते याचा पूर्ण दिवसावर प्रभाव पडत असतो. काही अभ्यासांनुसार, आपल्या सकाळच्या काही सवयींमध्ये बदल केल्यास आपण आपला मूड रिफ्रेश करुन आपला दिवस चांगला घालवू शकतो. 

जर तुम्हाला तुमच्या दिवसाची सुरुवात आत्मविश्वासाने, हसत आणि सकारात्मकपणे करायची असेल तर सकाळी काही गोष्टींचा २७ मिनिटांसाठी तुमच्या रुटीनमध्ये समावेश करा. याने तुमच्या जीवनात नक्कीच बदल दिसेल. चला जाणून घेऊ काय करण्याची गरज आहे. सकाळी उठल्यावर सर्वातआधी स्वत:ला स्ट्रेस फ्रि करा. जास्त स्ट्रेस घेतल्याने शारीरिक आणि मानसिक रोग होण्याची शक्यता असते. जर सकाळी आनंदी रहाल तर दिवसही चांगला जाईल. स्ट्रेस कमी करण्यासाठी रोज ५ मिनिटे ब्रीदिंग एक्सरसाइज करा. 

स्टॅनफोर्ड यूनिव्हर्सिटी सेंटर फॉर कंपॅशन अॅन्ड अल्ट्रयूइज्म रिसर्च अॅन्ड एज्युकेशनच्या प्रोफेसर Emma Seppälä यांनी सांगितले की, केवळ सामान्यपणे श्वास घेऊन तणाव कमी केला जाऊ शकत नाही.

आपल्या ब्लॉगवर Seppälä यांनी श्वास घेण्याची प्रक्रिया आणि सिम्पथेटिक नर्व्हस सिस्टम यांच्यातील संबंध सांगितला आहे. त्यांचं मत आहे की, सकाळी ५ मिनिटे ब्रीदिंग एक्सरसाइज केल्याने शरीरातून स्ट्रेस हार्मोन कोर्टीसोल कमी केला जाऊ शकतो. याने तुमचा मूड चांगला राहिल.

तीन अशा गोष्टी ज्याने तुम्हाला आनंद मिळतो

ब्रीदिंग एक्सरसाइज व्दारे आपला मूड ठिक केल्यानंतर रोज सकाळी २ मिनिटे अशा गोष्टींबाबत लिहा ज्या असल्याने तुम्ही स्वत:ला भाग्यवान समजता. असे केल्याने तुमच्या डोक्यात केवळ सकारात्मक गोष्टींचाच विचार येते. याने तुम्हाला दिवसभर आनंदी राहण्यास मदत मिळेल. अभ्यासकांनुसार, सकारात्मक असल्याने आपला मेंदू आणखी चांगलं काम करतो. याने आपली काम करण्याची क्षमताही वाढते.

काही नवीन शिका

यासोबतच सकाळी उठल्यावर साधारण २० मिनिटे काही नवीन शिकण्याचा प्रयत्न करा. यासाठी तुम्ही कुणाचीही मदत घेऊ शकता. मानसोपचारतज्ज्ञांचं म्हणनं आहे की, काही नवीन शिकल्याने व्यक्ती मानसिक रुपाने फिट राहतो. तसेच याने आपला आत्मविश्वासही वाढतो. 

टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्स