जेवण केल्यावर लगेच लघवी करण्याचे काय होतात फायदे? आयुर्वेद डॉक्टरांनी दिला खास सल्ला...
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 12, 2024 15:10 IST2024-08-12T15:09:52+5:302024-08-12T15:10:29+5:30
Urinating After Meal : डॉक्टरांनी सांगितलं की, जेवण केल्यावर लघवी केल्याने आणि डाव्या कडावर झोपल्याने खूप फायदा मिळतो.

जेवण केल्यावर लगेच लघवी करण्याचे काय होतात फायदे? आयुर्वेद डॉक्टरांनी दिला खास सल्ला...
Urinating After Meal : काही लोकांना जेवण केल्यावर लगेच मलत्याग करण्याची सवय असते. पण ही सवय त्यांचं पचन तंत्र खराब असण्याचं लक्षण आहे. मात्र, जेवण केल्यावर लघवी करणं ही एक चांगली सवय असल्याचं एक्सपर्ट सांगतात. आयुर्वेदिक डॉक्टर मिहिर खत्री यांनी याबाबतचा एक व्हिडीओ इन्स्टावर पोस्ट केला आहे.
डॉक्टरांनी सांगितलं की, जेवण केल्यावर लघवी केल्याने आणि डाव्या कडावर झोपल्याने खूप फायदा मिळतो. डॉक्टरांनी सांगितलं की, जेवण केल्यावर ही दोन कामे केल्याने शरीर जास्त काळ हेल्दी राहू शकतं.
जेवण केल्यावर लघवी करण्याचे फायदे
आयुर्वेदिक डॉक्टरांनी सांगितलं की, जेव्हाही तुम्ही जेवण कराल त्यानंतर लगेच लघवी करा. असं केल्याने किडनीचं आरोग्य चांगलं राहतं आणि किडनीसंबंधी अनेक आजारांचा धोका कमी होतो. ही सवय तुमच्या हृदयाच्या आरोग्यासाठीही फायदेशीर ठरू शकते.
डाव्या कडावर झोपा
डाव्या कडावर झोपण्याला वाम कुक्षी म्हटलं जातं. आयुर्वेदात जेवण केल्यावर डाव्या कडावर झोपण्याचा सल्ला दिला आहे. असं केल्याने अन्न चांगल्या पद्धतीने पचन होतं आणि पोटासंबंधी समस्या होत नाही.
आयुर्वेद चिकित्सेसोबतच अनेक शोधांमधून ,समोर आलं आहे की, डाव्या कडावर झोपल्याने हार्टबर्नची समस्या कमी होते. या पोजिशनमध्ये अन्न सहजपणे आतड्यांमधून जातं. तसेच डायजेस्टिव डिसऑर्डरपासूनही बचाव होतो.
जेवणानंतर करू नका या चुका
- जेवण केल्यावर लगेच एक्सरसाईज करू नये.
- जेवण केल्यावर लगेच कॅफीन म्हणजे चहा किंवा कॉफीचं सेवन करू नये.
- जेवण केल्यावर लगेच खूप जास्त पाणी पिऊ नये.
- जेवण केल्यावर लगेच आंघोळ करू नये.