दोन वर्ष, ना जिम ना डॉक्टर, तरी या मुलाने कमी केलं ५२ किलो वजन!
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 20, 2019 16:53 IST2019-05-20T16:47:07+5:302019-05-20T16:53:02+5:30
वजन कमी करायचं म्हटलं की, एक्सरसाइज आणि डायटिशिअनचा सल्ला याशिवाय वजन कमी केलं जाऊ शकत नाही असा एक समज अनेकांमध्ये असतो.

दोन वर्ष, ना जिम ना डॉक्टर, तरी या मुलाने कमी केलं ५२ किलो वजन!
वजन कमी करायचं म्हटलं की, एक्सरसाइज आणि डायटिशिअनचा सल्ला याशिवाय वजन कमी केलं जाऊ शकत नाही असा एक समज अनेकांमध्ये असतो. वजन कमी करण्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट लागते ती म्हणडे डेडिकेशन, सातत्य. अनेकजण वजन कमी करण्यासाठी सुरूवात तर करतात, पण मधेच प्रयत्न सोडून देतात. अशात त्यांचं वजन काही कमी होत नाही. लोक वजन कमी करण्यासाठी नको नको ते करतात. पण अमेरिकेत राहणाऱ्या एका १८ वर्षीय मुलाने 'काही न करता' खूरकाही केलं..
बाबो! १५२ किलो वजन...
मायकल वॉटसन हा अमेरिकेतील ओहियोमध्ये राहतो. दोन वर्षांआधी त्याचं वजन जवळपास १५२ किलो इतकं होतं. ६ फूट ४ इंच उंच मायकलला त्याच्या वजनावरून शाळेत चिडवलं जात होतं. त्याला रोज रोज या गोष्टींचा सामना करावा लागत होता. यामुळे त्याचा आत्मविश्वासही डगमगू लागला होता. पण मायकलने स्वत:च त्याच्यात एक बदल केला. तो ना जिममध्ये गेना ना त्याने डॉक्टरांचा सल्ला घेतला. तरी सुद्धा दोन वर्षात त्याने स्वत:ला पार बदलून टाकलं.
केलं तरी काय?
मायकलने ठरवलं की, दररोज घरापासून शाळेत तो पायी जाणार. घरापासून त्याच्या शाळेला जाण्यासाठी २० मिनिटांचा वेळ लागतो. म्हणजे दररोज तो २० मिनिटे पायी चालत होता. मायकल रस्त्यात कितीही थकवा जाणवला तरी सुद्धा थांबत नव्हता. असं त्याने पूर्ण दोन वर्ष केलं. याचा परिणाम असा झाला की, त्याने ५२ किलो वजन कमी केलंय.
फास्ट फूडला बाय-बाय
मायकल सांगतो की, यादरम्यान त्याने आहाराबाबतही नियम पाळले. त्याने फास्ट फूड खाणे बंद केलं आणि घरच्या जेवणावर फोकस केलं. फळं आणि सलाद खाणे सुरू केलं. आता मायकलमध्ये झालेल्या बदलामुळे प्रत्येकण हैराण झाले आहेत. काही महिन्यांनी तो ग्रॅज्युएट होणार आहे. तो सांगतो की, 'छोटे छोटे प्रयत्न करून आपण काहीही बदलू शकतो, काहीही!'.