शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
3
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
4
IPL 2026 : अभिषेक-हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
5
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
6
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
7
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
8
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
9
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
10
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
11
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
12
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
13
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
14
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
15
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
16
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
17
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
18
विधानपरिषदेसाठी काँग्रेसही उमेदवार देणार? उद्धव ठाकरेंऐवजी अंबादास दानवेंच्या उमेदवारीमुळे चर्चांना उधाण
19
Top Marathi News LIVE Updates: नांदेडमध्ये तापमान ४४ अंशांवर; उष्णतेची तीव्र लाट
20
महाराष्ट्र माझा, मराठी माझी बोली भाषा! अमराठी चालकांसाठी परिवहन विभागाचा पुढाकार, पुस्तिकेचे प्रकाशन
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा परिषद शाळेचा केला कायापालट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 31, 2020 05:00 IST

२२ मार्चपासून शाळा बंद झाल्या व तेव्हापासून शाळेत स्वच्छता नव्हती, परसबाग पाण्याअभावी कोमेजली होती. अशात शाळेत क्वारंटाईन असताना काहीच काम नसल्याने या चौघांनी शाळेला स्वच्छ करण्यास सुरूवात केली. तसेच शाळेतील झाडांची कटाई, सर्व वर्गखोल्या, मैदान, शौचालय या सर्वांची स्वच्छता करून शाळेचा कायापालट करून टाकला.

ठळक मुद्देक्वारंटाईन कालावधीचा सदुपयोग, माजी विद्यार्थ्यांनी ऋण फेडले

लोकमत न्यूज नेटवर्कइंदोरा बुजरुक : परराज्य व जिल्ह्यातून आल्याने जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत क्वारंटाईन करण्यात आलेल्या चार तरूणांनी शाळेचा कायापालट करून टाकला. माजी विद्यार्थी असलेल्या चार जणांनी आपल्या क्वारंटाईन कालावधीचा सदुपयोग केला असून या कार्यातून त्यांनी आपल्या गाव व शाळेचे ऋण फेडले.शनिवारी (दि.२३) पुणे, रायगढ व बंगलोर येथून चार तरूण गावात दाखल झाले. खबरदारीचा इशारा म्हणून त्यांना गावातील जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळेत विलगीकरण करण्यात आले. २२ मार्चपासून शाळा बंद झाल्या व तेव्हापासून शाळेत स्वच्छता नव्हती, परसबाग पाण्याअभावी कोमेजली होती. अशात शाळेत क्वारंटाईन असताना काहीच काम नसल्याने या चौघांनी शाळेला स्वच्छ करण्यास सुरूवात केली. तसेच शाळेतील झाडांची कटाई, सर्व वर्गखोल्या, मैदान, शौचालय या सर्वांची स्वच्छता करून शाळेचा कायापालट करून टाकला. ‘लोकमत’ प्रतिनिधी ने आज शाळेला भेट दिली व त्यांच्याशी संवाद साधला. याप्रसंगी त्यांनी आम्ही या शाळेत शिकत असताना झाडे लावून स्वच्छता करीत होतो. परंतु आम्ही शाळा सोडून गेलो तेव्हापासून आमचे लक्ष या शाळेकडे नव्हते. परंतु कोरोनामुळे आम्हाला ही संधी लाभली. मिळालेल्या संधीचा योग्य उपयोग करण्याची हीच योग्य वेळ होती.शाळेत यावे शिक्षणासाठी व निघावे सेवेसाठी ही म्हण आम्हाला आठवली व त्यातूनच आम्हाला शाळेसाठी काही तरी करता आले याचा आम्हाला अभिमान असल्याचे सांगीतले. मुख्याध्यापक के.जे. शरणागत, सरपंच प्रभा अंबुले, उपसरपंच दिनेश पटले, माजी उपसरपंच मुरलीदास गोंडाने, पोलीस पाटील हितेश सोनेवाने, आशा सेविका, अंगणवाडी सेविका, शिक्षकांनी या माजी विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

टॅग्स :zp schoolजिल्हा परिषद शाळा