तरूणाने केला शेतीतून विकास
By Admin | Updated: June 4, 2014 00:10 IST2014-06-04T00:10:37+5:302014-06-04T00:10:37+5:30
वडिलोपाजिर्त शेतीत निघणारे उत्पन्न कमी असल्याने शेतीतून वडिलाला आर्थिक विकास करता आला नाही. परंतु वडिलोपाजिर्त शेतीतून आपण आर्थिक विकास करण्याची दुर्दम्य इच्छा ठेवणार्या

तरूणाने केला शेतीतून विकास
आधुनिक शेती : शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानित
आमगाव : वडिलोपाजिर्त शेतीत निघणारे उत्पन्न कमी असल्याने शेतीतून वडिलाला आर्थिक विकास करता आला नाही. परंतु वडिलोपाजिर्त शेतीतून आपण आर्थिक विकास करण्याची दुर्दम्य इच्छा ठेवणार्या तरूणाचे स्वप्न साकार होऊ लागले. पारंपरिक शेतीला त्यागून आधुनिक शेतीची कास धरणार्या तरूणाने शेतीत उत्तम प्रगती केल्यामुळे त्याला शेतीनिष्ठ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
आमगाव तालुक्याच्या शिवणी येथील आदर्श व तरूण शेतकरी अशोक बालाराम गायधने यांना गोंदिया जिल्ह्याचा शेतीनिष्ठ पुरस्कार राज्य शासनाने दिला आहे. आमगाव तालुक्यातील ते एकमेव पुरस्कार प्राप्त शेतकरी आहेत. त्यांनी आपल्या शिक्षणाचा उपयोग शेतीच्या कामासाठी करीत शेतीतून विकास करण्याचा चंग बांधला. परिणामी त्यांना शेतीत विकास केल्याची पावती महाराष्ट्र शासनाने दिली.
रत्नागिरी येथे झालेल्या कृषी विकास कार्यक्रमात राज्य सरकारने त्यांना शेतीनिष्ठ पुरस्कराने सपत्नीक सत्कार केला. अशोक गायधने यांना ११ हजार रूपये रोख, स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र तर त्यांची पत्नी ममता गायधने यांना साळीचोळी देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राज्यपाल के. शंकरनारायणन, कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील, नारायण राणे, हर्षवर्धन पाटील उपस्थित होते.
यापुर्वी गायधने यांना कृषिमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या हस्ते गौरविण्यात आले. नाशिकच्या युवा प्रगतिशील तरूण शेतकर्याच्या मेळाव्यात गौरविण्यात आले. गोंदिया जि.प.ने त्यांचा सडक/ अर्जुनी येथील जिल्हास्तरीय मेळाव्यात सत्कार केला आहे.(शहर प्रतिनिधी)