..अन् बहिण-भावाची ती भेट ठरली अखेरची; शहारे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 7, 2022 15:25 IST2022-04-07T15:01:02+5:302022-04-07T15:25:02+5:30

रात्रीची वेळ असल्याने व रस्ता सुध्दा सामसूम असल्याने त्या वाहन चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

young man died after unknown vehicle hit him near akola dongargaon road | ..अन् बहिण-भावाची ती भेट ठरली अखेरची; शहारे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

..अन् बहिण-भावाची ती भेट ठरली अखेरची; शहारे कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर

ठळक मुद्देघरी परतत असताना वाटेतच घडलं भयंकर

देवरी (गोंदिया) : बहिणीची भेट घेऊन आनंदाने घराकडे निघालेल्या भावावर काळाने घाला घातला. अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत पादचारी तरुणाचा जागीच मृत्यू झाला. ही घटना देवरीवरून १५ किलोमीटर अंतरावरील सावली-डोंगरगावदरम्यान असलेल्या नाल्याजवळ बुधवारी (दि. ६) रात्री १० वाजताच्या सुमारास घडली. देवेंद्र तुकाराम शहारे (२७, रा. मुल्ला, ता. देवरी) असे अपघातात ठार झालेल्या भावाचे नाव आहे.

प्राप्त माहितीनुसार, देवेंद्र हा बुधवारी आमगाव तालुक्यातील मोहनटोला येथे आपल्या बहिणीला भेटण्यासाठी गेला होता. दरम्यान, रात्री बहिणीच्या घरून तो वाहनाने गावाकडे डोंगरगावपर्यंत परत आला. मात्र त्याला मु्ुल्ला येथे जाण्यासाठी वाहन न मिळाल्याने तो डोंगरगाववरून चालतच आपल्या गावाकडे निघाला. सावली-डोंगरगावदरम्यान असलेल्या नाल्यावर त्याला एका अज्ञात वाहनाने धडक दिल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. रात्रीची वेळ असल्याने व रस्ता सुध्दा सामसूम असल्याने त्या वाहन चालकाने घटनास्थळावरून पळ काढला.

दरम्यान, परिसरातील गावकऱ्यांच्या लक्षात ही बाब आल्यानंतर त्यांनी याची माहिती देवरी पोलीस स्टेशनला दिली. देवेंद्रचा अपघातात मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबीयांवर संकट कोसळले आहे. देवरी पोलीस या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

Web Title: young man died after unknown vehicle hit him near akola dongargaon road