शहरं
Join us  
Trending Stories
1
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
2
Latest Marathi News LIVE Updates: सम्राट चौधरी बनले बिहारचे नवे मुख्यमंत्री; राज्यपालांनी दिली पद आणि गोपनीयतेची शपथ
3
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
4
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
5
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
6
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
7
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
8
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
9
सुपर डुपर हिट... ‘वंदे भारत’ची कमाल कामगिरी, ९ कोटी प्रवाशांचा प्रवास; २७४ जिल्हे, १६४ सेवा!
10
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
11
"मी थकलेय, सकाळी नाश्ता मिळणार नाही"; नैराश्यातून आईने लेकीची केली हत्या, स्वतःलाही संपवले
12
देशात पेट्रोल १८, तर डिझेल ३५ रुपयांनी महाग होणार? तेल कंपन्यांना दररोज १,६०० कोटींचा फटका; निवडणुकीनंतर दरवाढीचे दणके
13
लहानग्यांसाठी 'या' देशात येतंय 'चाइल्ड सिम कार्ड'; इंटरनेटवर देणार सुरक्षा, भारतातही का गरजेचे?
14
IPL 2026: आधीच KKRची एक सामना जिंकायची मारामार, त्यात अजिंक्य रहाणेला BCCIचा मोठा दणका
15
कैसे बोगस दाखला बनाया? एमआयएम नगरसेविका सहर शेखकडून शासकीय यंत्रणांची दिशाभूल
16
नाशिकच्या तरुणींना मलेशियात विकण्याचा कट? आयटी कंपनीतील 'त्या' प्रकरणाला मानवी तस्करीचे भयानक वळण
17
Mumbai Traffic Update: बीकेसीत मेट्रोचा बीम कोसळला! क्रेन उलटल्याने मोठा अपघात; कुर्ला-वेस्टर्न एक्सप्रेस हायवेवरील वाहतूक विस्कळीत
18
जुलैपासून पुन्हा वाढणार जगाचं टेन्शन! भारतावरही होणार परिणाम, अमेरिकेनं स्पष्ट शब्दांत दिले संकेत
19
Share Market: शेअर बाजारात तुफान तेजी! सेंसेक्समध्ये १२०० अंकांची उसळी; निफ्टी २४,२०० च्या वर; 'या' शेअर्समध्ये जोरदार रॅली
20
शेतकऱ्यांच्या घामाच्या पैशांवर पीक विमा कंपन्या मालामाल, नऊ वर्षांत कमावले ७३,६३० काेटी
Daily Top 2Weekly Top 5

योग शारीरिक व आध्यात्मिक उन्नतीचे साधन- बडोले

By admin | Updated: October 6, 2015 02:31 IST

योग फक्त व्यायाम प्रकार नसून आध्यात्मिक उन्नतीचे साधन आहे. आमगावला राज्यातून आलेल्या सर्व खेळाडूंनी व

आमगाव : योग फक्त व्यायाम प्रकार नसून आध्यात्मिक उन्नतीचे साधन आहे. आमगावला राज्यातून आलेल्या सर्व खेळाडूंनी व प्रेक्षकांनी यादृष्टीने योगासनाकडे बघावे. आंतरराष्ट्रीय योग दिनामुळे १७७ देशांमध्ये योगाचा प्रचार व प्रसार झाल्यामुळे भारताची प्रतिमा विश्वात पुन्हा चांगली होण्यास मदत झाली. या कार्यात माझे आपणास पूर्ण सहकार्य राहील, असे उद्गार सामाजिक न्यायमंत्री व पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले. ३४ व्या राज्यस्तरीय योगासन स्पर्धेचा उद्घाटन स्थानिक विजयालक्ष्मी सभागृहात झाले. या वेळी ते बोलत होते.अध्यक्षस्थानी डॉ. केशवराव क्षिरसागर होते. मंचावर सविता पुराम, डॉ. अरूण खोडस्कर, प्रमोद संगीडवार, सतिश मोहगावकर व स्वागताध्यक्ष प्राचार्य डॉ. दिलीप संघी उपस्थित होते. प्रारंभी अतिथींना महर्षी पतंजली राष्ट्रपिता महात्मा गांधी, लक्ष्मणराव मानकर गुरूजी यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. याप्रसंगी पालकमंत्र्यांचा डॉ. दिलीप संघी, डॉ. खोडस्कर व सुरेश कोसरकर यांनी सत्कार केला. स्पर्धेत राज्याच्या आठ विभागातून ८०० खेळाडू, पंच, अधिकारी उपस्थित होते. तीन दिवस चालणाऱ्या स्पर्धेत खेळांडूचा निवास व भोजन व्यवस्था लक्ष्मणराव मानकर गुरूजी शैक्षणिक संकुलात करण्यात आली. संचालन विभागीय उपाध्यक्ष विनायक अंजनकर यांनी केले. स्पर्धेसाठी अध्यक्ष सुरेश कोसरकर, सचिव शशांक कोसरकर, प्रा. रंजीत कुमार डे, बेनीमाधन कावळे, भरत चुटे, डी.आर. मेश्राम, झनक बघेले, सुभाष मेश्राम, नरेंद्र कावळे, के.टी. बिसेन, हेमंत चावके, नितेश चुटे, अशोक मोदी, बालाप्रसाद दुबे, निखिल कोसरकर, योगेश कावळे, रवी आचार्य, जगदिश बडगे, खेमचंद शहारे आदींनी सहकार्य केले.