यंदा जलाशय तहानलेलेच
By Admin | Updated: August 14, 2015 02:04 IST2015-08-14T02:04:10+5:302015-08-14T02:04:10+5:30
मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे गेल्या वर्षापेक्षा यंदा जिल्ह्यातील धरणांमध्ये पाण्याचा साठासुद्धा अत्यल्प आहे.

यंदा जलाशय तहानलेलेच
गोंदिया : मागील वर्षाच्या तुलनेत यंदा पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे गेल्या वर्षापेक्षा यंदा जिल्ह्यातील धरणांमध्ये पाण्याचा साठासुद्धा अत्यल्प आहे. त्यामुळे यंदा जलाशय तहानलेलेच असल्याचे वास्तव दिसून येत आहे.
सध्या इटियाडोह धरणात ११५.४६ दलघमी पाण्याचा साठा असून याची टक्केवारी १६.२३ आहे. तर मागील वर्षी सन २०१४ मध्ये आजच्या स्थितीत इटियाडोह धरणात २३६.९० दलघमी पाणी साठा होता व त्याची टक्केवारी ७४.३० एवढी होती. शिरपूर जलाशयात आज ४२.५६ दलघमी साठा असून याची टक्केवारी १९.५५ आहे. तर मागील वर्षी आजच्या स्थितीत १२९.६९ दलघमी पाणी साठा होता व याची टक्केवारी ६७.३६ एवढी होती. पूजारीटोला धरणात सध्या ३५.२३ दलघमी पाणी साठा असून याची टक्केवारी ५०.४८ आहे. तर मागील वर्षी ६३.२६ टक्के पाणी साठा होता.
कालीसराड जलाशयात आज केवळ ८.३८ दलघमी पाणी असून याची टक्केवारी २०.४७ आहे. तर मागील वर्षी १५.९६ दलघमी साठा होता व त्याची टक्केवारी ५७.५१ होती. संजय सरोवरमध्ये सद्यस्थितीत ३७४.७४ दलघमी पाणी असून त्याची टक्केवारी ६७.७४ आहे. तर मागील वर्षी आजच्या स्थितीत २८६.१८ दलघमी पाणी होते व त्याची टक्केवारी ६९.८० एवढी होती. गोसे खुर्दमध्ये सध्या ८९२.१२ दलघमी उपलब्ध साठा असून याची टक्केवारी ३६.९१ आहे. तर मागील वर्षी साठा २८७.९० दलघमी होते व त्याची टक्केवारी २५.१२ एवढी होती. सध्या गोसे खुर्दचे १४ गेट ०.५० मीटरने सुरू करण्यात आले असून १३८३ क्युमेक्स/४८८४१ क्युसेक्स पाण्याचा विसर्ग होत आहे. (प्रतिनिधी)