शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रीनगरमध्ये जप्त केलेल्या स्फोटकांचा स्फोट, ९ जणांचा मृत्यू; दिल्ली कनेक्शनच्या चौकशीदरम्यान ब्लास्ट
2
IPL 2026 Player Trade Updates : जड्डू घाट्यात! संजू ना नफा ना तोटा तत्वावर CSK च्या ताफ्यात
3
जप्त केलेली ३५० किलो स्फोटके कशी फुटली? स्टेशन बाहेरच्या 'त्या' कारवर संशय, अवयव ३०० फूटांवर फेकले गेले
4
"मी कट्टर BJP आहे, त्यामुळे..."; निवेदिता सराफ यांचं वक्तव्य चर्चेत; बिहार निवडणुकीबद्दल काय म्हणाल्या?
5
SIM Swap Fraud: तुमचा मोबाईल नंबर, त्यांचा कंट्रोल; OTP फ्रॉडनं वाढलीये डोकेदुखी, कसं वाचाल?
6
ऐन निवडणुकीत अश्लील व्हिडिओ व्हायरल, मात्र जनतेने दिली साथ; भाजपा उमेदवार किती मतांनी जिंकले?
7
“बिहारच्या निकालाचे श्रेय निवडणूक आयोग अन् मतचोरी, SIR मुळे NDAचा विजय”: हर्षवर्धन सपकाळ
8
आयसीएल फिनकॉर्पचा नवीन एनसीडी इश्यू १७ नोव्हेंबर २०२५ रोजी खुला होणार, १२.६२% पर्यंत परताव्याचा दावा
9
अहिल्यानगर, तुळजापूरमध्ये शिवसेनेची ताकद वाढली; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत मोठे पक्षप्रवेश
10
वाईट घडलं! नवले पूल अपघातात ३० वर्षीय मराठी अभिनेत्याचा दुर्देवी मृत्यू, ३ महिन्याचा मुलगा पोरका
11
भाजप बनला सर्वांत मोठा पक्ष, तरी नितीश कुमार दहाव्यांदा मुख्यमंत्री? डावलणे अशक्य, हे आहे कारण
12
पैसा दुप्पट करण्याची मशीन बनली पोस्टाची ‘ही’ स्कीम; केवळ ₹१००० पासून सुरू करू शकता गुंतवणूक
13
एनडीएच्याच गळ्यात पुन्हा विजयाचा (बि)हार; अब की बार... २०० पार; महाआघाडीचा फ्लाॅप शो; भाजप प्रथमच नंबर १
14
लग्नाच्या वाढदिवशीच घरी लक्ष्मी आली! राजकुमार राव आणि पत्रलेखा झाले आईबाबा
15
'फर्स्ट पास्ट द पोस्ट'चा धक्का; राजदच्या मतांची टक्केवारी भाजपपेक्षा अधिक; पण पराभूत
16
आजचे राशीभविष्य,१५ नोव्हेंबर २०२५: मित्रांसाठी खर्च करावा लागण्याची शक्यता; शक्यतो आज बौद्धिक चर्चा टाळा
17
पाच मुद्द्यांमधून जाणून घ्या एनडीएचा विजय आणि महाआघाडीच्या पराजयाची कारणे...
18
मेगाब्लॉक, जम्बोब्लॉकमुळे रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर उद्या होणार प्रवास खोळंबा
19
बीबीसीने मागितली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची माफी
20
बिहारच्या विजयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत सत्ताधारी महायुतीला बळ ! मतचोरीचे आरोप चालले नाहीत
Daily Top 2Weekly Top 5

यंदा होळीत २८ हजार क्विंटल लाकडे स्वाहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2019 22:01 IST

मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे ग्लोबल वार्मिंगचे संकट उभे आहे. या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने पर्यावरण ग्राम संतुलीत योजना अंमलात आणली. या योजनेतून प्रत्येक गावाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावून शंभर कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केले. तर दुसरीकडे जुन्या वृक्षांची कत्तल करून ते होळीत स्वाहा केले जात आहेत.

ठळक मुद्देमौल्यवान वृक्षांचा ऱ्हास : २८०७ ठिकाणी होळी दहन, पर्यावरणाला धोका

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : मोठ्या प्रमाणात झालेल्या वृक्षतोडीमुळे ग्लोबल वार्मिंगचे संकट उभे आहे. या समस्येवर मात करण्यासाठी शासनाने पर्यावरण ग्राम संतुलीत योजना अंमलात आणली. या योजनेतून प्रत्येक गावाने रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावून शंभर कोटी वृक्ष लागवडीचे उद्दिष्ट पूर्ण केले. तर दुसरीकडे जुन्या वृक्षांची कत्तल करून ते होळीत स्वाहा केले जात आहेत. यंदा होळीला जिल्ह्यात १३८७ सार्वजनिक व तर १४२० ठिकाणी खासगी होळ्या जाळल्या जात आहेत. यातील २८०७ होळींमध्ये २८ हजार ७० क्विंटल लाकडे जाळले गेली आहेत. या लाकडांची किंमत कोट्यवधी रुपयांच्या जवळपास आहे.जिल्ह्यात बुधवारी (दि.२०) होलीका दहन तर गुरूवारी (दि.२१) धुळवड साजरी होत आहे. होळीचा सण उत्साहात व शांततेत पार पडावा यासाठी बुधवार व गुरूवारी (दि.२१) पोलिसांचा चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. यंदा शहर पोलीस ठाण्यांतर्गत शहर हद्दीत १३० सार्वजनिक व २४० खाजगी होळी, रामनगर पोलीस ठाणे हद्दीत ५५ सार्वजनिक होळी, गोंदिया ग्रामीण पोलीस ठाण्यांतर्गत ५० सार्वजनिक होळी व १६० खाजगी होळी, रावणवाडी पोलीस ठाण्यांतर्गत ७२ सार्वजनिक व १०८ खाजगी होळी, तिरोडा पोलीस ठाण्यांतर्गत १० सार्वजनिक व ७० खाजगी होळी, गंगाझरी पोलीस ठाण्यांतर्गत ४८ सार्वजनिक व ६० खाजगी होळी, दवनीवाडा पोलीस ठाण्यांतर्गत ३५ सार्वजनिक होळी व २५ खाजगी होळी, आमगाव पोलीस ठाण्यांतर्गत ७२ सार्वजनिक होळी व ८८ खाजगी होळी, गोरेगाव पोलीस ठाण्यांतर्गत १७० सार्वजनिक व ७० खाजगी होळींचे दहन होणार अहे. सालेकसा पोलीस ठाण्यांतर्गत १९० सार्वजनिक व ३० खाजगी होळी, देवरी पोलीस ठाण्यांतर्गत २३५ सार्वजनिक व २७ खाजगी होळी, चिचगड पोलीस ठाण्यांतर्गत ५० सार्वजनिक व २० खाजगी होळी, केशोरी पोलीस ठाण्यांतर्गत ३० सार्वजनिक व ३२५ खाजगी होळी, अर्जुनी-मोरगाव पोलीस ठाण्यांतर्गत ९० सार्वजनिक व ५२ खाजगी होळी, नवेगावबांध पोलीस ठाण्यांतर्गत ४५ सार्वजनिक व १० खाजगी होळी, डुग्गीपार पोलीस ठाण्यांतर्गत २५ सार्वजनिक व ५० खाजगी होळी अशा प्रकारे जिल्ह्यात एकूण १३८७ सार्वजनिक तर १४२० खाजगी होलीका दहन करण्यात आले. होळीचा सण शांततेत आणि निर्भय व मोकळ्या वातावरणात पार पाडण्याकरिता पोलीस दलातर्फे सर्व पोलीस ठाण्यांच्या हद्दीत चोख बंदोबस्त लावण्यात आला आहे. अवैध दारु व्यवसायावर कारवाई करण्यासाठी पोलीस ठाणे स्तरावर तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे पथक स्थापन करण्यात आले आहेत. एकीकडे पर्यावरण संतुलनासाठी वनविभागाबरोबर प्रत्येक ग्रामपंचायती सरसावल्या आहेत. मात्र त्याच गावातील नागरिक जंगलातील, शेतातील लाकडे तोडून कोट्यवधीची वनसंपदा होळीसाठी नष्ट केली जाते. आज घडीला एक क्विंटल लाकडाची किमत ८०० रुपये सांगितली जाते. या २८ हजार क्विंटल लाकडाची किंमत कोट्यवधी रुपयांच्या घरात आहे. वनाधिकारी व वनकर्मचाऱ्यांच्या उदासिनतेमुळे नागरिक जंगलातील लाकडे कापून होळीत जाळून आनंदोत्सव करतात. यामुळे पर्यावरणाचा मोठ्या प्रमाणात ºहास होतो.तंटामुक्त समित्या लक्ष ठेवणारहोळीला धार्मिक भावना दुखावल्या जातील असे पोस्टर्स, देखावे, चित्र, नाटके किंवा प्रक्षोभक घोषणा देणाऱ्यांवर लक्ष ठेवण्याचे आवाहन पोलिसांबरोबर महात्मा गांधी तंटामुक्त गाव समित्यांना देखील करण्यात आले आहे. होळीचा सण शांततेत पार पडावा यासाठी पोलिसांनी मोहल्ला कमिटी, ग्राम सुरक्षा दल व तंटामुक्त गाव समिती, पोलीस मित्र यांच्या बैठका घेतल्या आहेत. तंटामुक्त गाव समिती गावातील अवैध दारू बरोबर वाद घडवू नये यासाठी प्रयत्न केले जातील.ट्रायकिंग फोर्सचा बंदोबस्त करणारहोळीच्या सणाला समाज कंटक, समाज विघातक, मुलतत्ववादी व गुंड प्रवृत्तीचे इसम मद्यप्राशन करून अश्लिल वक्तव्य करणाऱ्यांवर नजर ठेवण्यासाठी जिल्ह्यात ट्रायकिंग फोर्सचा बंदोबस्त लावला आहे. धार्मिक स्थळावर गुलाल उधळणे, मुलींची छेडखानी करणे, होळी प्रथम कुणी पेटवावे,एकमेकांच्या अंगावर गुलाल रंग, फुग्यांमध्ये पाणी भरुन मारणे, चिखल अंगावर टाकणे, ढोल-ताशे वाजवून नाचत गाजत फगवा काढणे, जुन्या वैनमस्यातून वाद निर्माण करणे, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न उद्भवणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर राहणार आहे. यासाठी तंटामुक्त समितीची मदत घेणार आहेत.‘‘सण आनंदात साजरा करण्यासाठी ‘इको फ्रेन्डली होळी’ अशा उपक्रम प्रत्येक गावात राबविला जाणे पर्यावरण संतुलनाच्या दृष्टीने महत्त्वाचा आहे. वनांचे संरक्षण करून मानवाच्या उत्थानासाठी नैसर्गिक रंग खेळावा. लाकडे जाळणे टाळावे.- एल.एस. भुतेक्षेत्र सहाय्यक, आमगाव.

टॅग्स :Holiहोळी