महिलांच्या निर्भयतेसाठी रात्री धावल्या महिला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 06:00 IST2020-02-06T06:00:00+5:302020-02-06T06:00:24+5:30
सदर स्पर्धेत जिल्हा पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांची पत्नी रिध्दी मंगेश शिंदे यांनी गोंदिया जिल्ह्यातील महिला, प्रतिष्ठीत, समाजसेविका, महिला, विद्यार्थिनी व गोंदिया जिल्हा पोलीस दलातील महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी अशा एकूण ११५ ते १२० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. सदर स्पर्धेत प्रथम विजेता ज्ञानेश्वरी भागवत मेंढे, द्वितीय विजेता शुभांगी युवराज बनकर व तृतीय विजेता दिव्या राजकुमार तुरकर ठरल्या.

महिलांच्या निर्भयतेसाठी रात्री धावल्या महिला
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कामाच्या निमित्ताने मध्यरात्री शहरातील रस्त्यावर निर्भयपणे वावरण्याची व महिलांमध्ये सुरक्षतेती भावना निर्माण व्हावी व महाराष्ट्र पोलिसांबद्दलमहिलांच्या मनात दृढ विश्वास निर्माण व्हावा या उद्देशाने गोंदिया जिल्ह्यातील १५ वर्षावरील वयोगटातील महिला सदस्यांकरीता ४ फेब्रुवारीच्या रात्री ११ ते १२ वाजता महाराष्ट्र पोलीस मिडनाईट या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमात रन हे धावून किंवा चालून गोंदिया शहरातील इंदिरा गांधी स्टेडियम ते बस स्टॉप मरारटोली व परत बस स्टॉप मरारटोली ते इंदिरा गांधी स्टेडियम पर्यंत आयोजित करण्यात आली होती.
सदर स्पर्धेत जिल्हा पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे यांची पत्नी रिध्दी मंगेश शिंदे यांनी गोंदिया जिल्ह्यातील महिला, प्रतिष्ठीत, समाजसेविका, महिला, विद्यार्थिनी व गोंदिया जिल्हा पोलीस दलातील महिला पोलीस अधिकारी, कर्मचारी अशा एकूण ११५ ते १२० स्पर्धकांनी सहभाग घेतला होता.
सदर स्पर्धेत प्रथम विजेता ज्ञानेश्वरी भागवत मेंढे, द्वितीय विजेता शुभांगी युवराज बनकर व तृतीय विजेता दिव्या राजकुमार तुरकर ठरल्या. त्यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानचिन्ह देऊन गौरविन्यात आले.
सदर कार्यक्रमात पोलीस अधीक्षक मंगेश शिंदे व राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हा महिला अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर, नगरसेविका भावना कदम, आशा पाटील, सुशिला भालेराव, उपविभागीय पोलीस अधिकारी जगदिश पांडे, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, बबन आव्हाड, प्रमोद घोंगे, प्रदीप अतुलकर, पोलीस अधिकारी, कर्मचारी तसेच गोंदिया जिल्ह्यातील प्रतिष्ठीत व्यक्ती, स्पर्धक सदस्य उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी राखीव पोलीस निरीक्षक कमलाकर घोटेकर, पोलीस निरीक्षक रंगनाथ धारबळे, पोलीस निरीक्षक बबन आव्हाड, पोलीस हवालदार सेवक राऊत, सुनील मेश्राम, अलकेश, महिला नायक पोलीस शिपाई मंगला प्रधान, नायक पोलीस शिपाई राज वैद्य, राजू डोंगरे, महिला पोलीस शिपाई दर्शना राणे तसेच पोलीस मुख्यालय गोंदिया व पोलीस गोंदिया शहर येथील कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले.