शहरं
Join us  
Trending Stories
1
“आमच्यावरील सगळे आरोप खोटे, दोन दिवसांत सगळं बाहेर काढणार”; सहर शेखच्या वडिलांचा इशारा
2
भोंदू अशोक खरातचा निकटवर्तीय जितेंद्र शेळके यांचं अपघाती निधन; घातपाताचा संशय, काय घडलं?
3
अमेरिकेच्या निर्बंधांना भारताचा 'खो'! रशियाकडून तेल खरेदी सुरूच राहणार; मोदी सरकारचा कडक पवित्रा
4
Top Marathi News LIVE Updates: "TCS प्रकरण हा एका मोठ्या कटाचा भाग"; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक खुलासा
5
...तर देश कायमचा दुभंगेल, भाजपा आगीशी खेळतंय; डिलिमिटेशन विधेयकावरून राज ठाकरेंचा घणाघात
6
Iran US: दोन युद्ध भूमी, दोनदा शस्त्रसंधी तरीही युद्धाची तयारी; अमेरिका-इराणच्या मनात काय?
7
“उद्धव ठाकरे उमेदवार असतील तर विधान परिषद निवडणूक बिनविरोध होऊ शकेल”; संजय राऊत थेट बोलले
8
"तू बाहेर बस अन् रोहितला MIचा कॅप्टन कर..."; Hardik Pandya ला माजी क्रिकेटरने सुनावलं
9
T20 World Cup 2026: टी२० वर्ल्डकप २०२६ मध्ये मॅच फिक्सिंग? आयसीसीच्या अँटी करप्शन ब्युरोनं सुरू केली चौकशी
10
‘८५० जागांमागचं लॉजिक काय? त्यावरून संसदेत होतोय गदारोळ, आता अमित शाहांनी सांगितलं गणित   
11
धक्कादायक! मोबाइल खरेदीतून वाद; दारूच्या नशेत मित्रानेच घातला मित्राच्या डोक्यात दगड
12
गुजरातमध्ये निवडणुकीपूर्वीच भाजपानं बनवला 'बिनविरोध पॅटर्न'चा नवा रेकॉर्ड; काँग्रेस-AAP ला झटका
13
सावधान! कारचा AC वारंवार बंद करताय? मायलेज वाढवण्याच्या नादात होऊ शकतं मोठं नुकसान; कसं? जाणून घ्या
14
"धर्म बदल, तुझे वडील बरे होतील!"; नाशिक TCS प्रकरणात पीडित तरुणाने तौसीफ आणि दानिशच्या क्रूरतेचा पाढाच वाचला
15
Helicopter Crash In Indonesia : आकाशातून अचानक गायब झालेलं हेलिकॉप्टर अखेर सापडलं! पण... इंडोनेशियातून आली सर्वात वाईट बातमी
16
संसदेत लोकशाहीवरून जुंपली! "कुणी इंदिरा गांधींप्रमाणे पंतप्रधान मोदींची खुर्ची...!"; प्रियंकांच्या 'त्या' विधानावर कंगना रणौत यांचा पलटवार
17
क्रूरतेचा कळस! पत्नीचा पाय कुऱ्हाडीने छाटला, मग तोच पाय घेऊन नराधम पती पोलीस ठाण्यात पोहोचला
18
Wipro चं ₹१५,००० कोटींचं बायबॅक, प्रमोटर ग्रुपही सहभागी होणार; किरकोळ गुंतवणूकदारांसाठी याचा काय अर्थ?
19
TCS प्रकरणातील मास्टरमाइंड HR निदा खान महाराष्ट्रातून पसार?; 'या' ३ राज्यांत पोलीस पथके रवाना
20
Akshaya Tritiya 2026: दोष निवारण्यापेक्षा दोष टाळलेला बरा! नवीन घर घेताना 'या' गोष्टींकडे दुर्लक्ष करू नका!
Daily Top 2Weekly Top 5

आता तरी धान उत्पादकांना चांगले दिवस येतील का?

By admin | Updated: November 1, 2014 01:57 IST

पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, या चार जिल्ह्यात धानपिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते.

लाखनी : पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, या चार जिल्ह्यात धानपिकांची मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. मागील १५ वर्षात केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्याच्या हिताकडे दुर्लक्ष केल्यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती डबघाईस आली आहे. ही बाब केंद्रातील व राज्यात सत्तारूढ होणाऱ्या भाजपाने प्रचारादरम्यान उचलून धरली होती. त्याला धान उत्पादक शेतकऱ्यांनी चांगला प्रतिसाद दिला. केंद्र व राज्यात आता शेतकऱ्याच्या हिताचे शासन आल्याने पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना आता दिवस चांगले येणार अशी प्रतिक्षा लागली आहे. कारण खरीप हंगामातील धानपिक हातात आले असताना पूर्व विदर्भातील शासकीय आधारभूत धान खरेदी केंद्र व हमी भावाचा तिढा न सुटल्यामुळे नव्या शासनाकडे बळीराजाचे लक्ष लागलेले आहे.पूर्व विदर्भातील हे चार जिल्हे राज्याच्या शेवटच्या टोकावर असल्याने तत्कालीन केंद्रासह राज्य शासनाचेही या जिल्ह्याकडे दुर्लक्ष झाले होते. या जिल्ह्यात धानाचे उत्पादन घेतले जाते. धान उत्पादक शेतकऱ्याच्या मालाला योग्य भाव मिळावा यासाठी मागील दोन दशकापासून आंदोलने, मोर्चे काढण्यात येत होते. केंद्र व राज्य शासन प्रत्येक खरीप हंगामात ५० ते १०० रूपये समर्थन मूल्य वाढवून शेतकऱ्याची बोळवण घालत होते. शेतकऱ्यांच्या संयमाचा उद्रेक झाल्यास बोनसचे बोळवण देऊन बळीराजाचा आवाज दडपण्यात येत होता. त्यतच शेतकऱ्याने पिकविलेल्या धानपिकावर व्यापारी मालामाल होत आले. एवढे कष्ट सोसूनही केंद्र व राज्य शासनाने शेतकऱ्यांची उपेक्षाच केली. त्यानंतर आता पार पडलेल्या विधानसभेच्या निवडणुकीत भाजपाने पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्यांना उचलून धरले. या शेतकऱ्यांनीही भाजपाच्या कार्यकाळात आपल्याला न्याय मिळेल या आशेने त्यांना सत्तास्थानी बसण्याइतपत कौल दिला. त्यामुळे पूर्व विदर्भातील धान उत्पादक शेतकऱ्यांना चांगले दिवस येणार, याची प्ररीक्षा लागली आहे.सध्या खरिपाचे पीक हाती यायला सुरुवात झाली आहे. आजघडीला पूर्व विदर्भातील या चारही जिल्ह्यात शासकीय आधारभूत केंद्र व शासकीय हमी भावाचा अंदाज नसला तरी येत्या पंधरवाड्यात केंद्र व राज्य शासनाकडून ठोस निर्णय होण्याची शक्यता आहे. पुर्वीच्याच शासनाप्रमाणे आता शासनाने शेतकऱ्यांची बोळबण केली तर येणाऱ्या काळात हेच शेतकरी आश्वासने देणाऱ्या सत्ता पक्षाला धडा शिकविल्याशिवाय राहणार नाहीत. (शहर प्रतिनिधी)