पत्नीच्या प्रेमापोटी शौचालय बांधा-अग्रवाल
By Admin | Updated: January 27, 2015 23:36 IST2015-01-27T23:36:24+5:302015-01-27T23:36:24+5:30
जगभरात प्रेमाचे प्रतिक म्हणून गणल्या जाणाऱ्या शहाजहाने आपल्या पत्नीच्या प्रेमाखातर ताजमहाल बांधला. त्याचप्रमाणे गिधाडी येथील सर्व बांधवांनी आपल्या पत्नीच्या प्रेमाला शौचालयाची भेट द्यावी,

पत्नीच्या प्रेमापोटी शौचालय बांधा-अग्रवाल
गोंदिया : जगभरात प्रेमाचे प्रतिक म्हणून गणल्या जाणाऱ्या शहाजहाने आपल्या पत्नीच्या प्रेमाखातर ताजमहाल बांधला. त्याचप्रमाणे गिधाडी येथील सर्व बांधवांनी आपल्या पत्नीच्या प्रेमाला शौचालयाची भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा परिषद सदस्य विनोद अग्रवाल यांनी केले.
ते स्वच्छ भारत मिशन, जिल्हा पाणी व स्वच्छता मिशन, जिल्हा परिषद गोंदिया, पंचायत समिती गोेरेगावच्या वतीने ग्रामपंचायत गिधाडी येथील जि.प. शाळेच्या पंटागणावर आयोजित मेळाव्यात अध्यक्षस्थानावरुन ते बोलत होते.
मेळाव्याचे उद्घाटक म्हणून पंचायत समितीच्या सभापती चित्रलेखा चौधरी, पं.स. सदस्य धर्मशिला शहारे, माजी पंचायत समिती उपसभापती दिलीप चौधरी, झुम्मक बिसेन, डॉ. लक्ष्मण भगत, खंडविकास अधिकारी एस.के. चव्हाण,जयंत शुक्ला, माजी पं.स. सदस्य नितीन कटरे, सरपंच निता पटले, विकास पटले, उपसरपंच संतोष नेवारे, पंचायत विस्तार अधिकारी जाधव, एस.पांडे, जिल्हा कक्षातील समाजशास्त्रज्ञ दिशा मेश्राम, गणेश हरिणखेडे, विजय पारधी, धमेंद्र चव्हाण, क्षेत्रातील सर्व ग्रामपंचायतीचे सरपंच, सदस्य, ग्रामसेवक, विविध समितीचे अध्यक्ष, सचिव उपस्थित होते.
पं.स. सभापती चित्रलेखा चौधरी यांनी पंचायत समिती अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या सर्व योजनांचा लाभ या माध्यमातुन ग्रामस्थांना देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. दिलीप चौधरी यांनी स्वच्छतेची सुरुवात ही स्वत: पासून करणे आवश्यक असल्याचे सांगितले. यावेळी दिशा मेश्राम यांनी स्वच्छ ग्राम मेळाव्याचा उद्देश स्पष्ट करुन स्वच्छता व आरोग्य यांचा संबंध कसा आहे, याविषयी मार्गदर्शन केले. प्रास्ताविक सरपंच निता पटले यांनी केले. दरम्यान जि.प. सदस्य अग्रवाल यांनी सर्व उपस्थितांसह स्वच्छतेची शपथ दिली. सांगता राष्ट्रगीताने झाली.
संचालन शिक्षक मेश्राम यांनी तर आभार माणिक भगत यांनी मानले. यशस्वीतेसाठी गटसमन्वय एम.बोहरे, समूह समन्वयक कै लास कोरे, निलकमल डहाट, ग्रामसेवक सोनकनवरे, शाळेतील शिक्षक यांनी सहकार्य केले.