गळा आवळून पत्नीचा खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 06:00 IST2020-03-07T06:00:00+5:302020-03-07T06:00:19+5:30
सुमनच्या चारित्र्यावर तिचा पती संशय करायचा.यामुळे त्या दोघांमध्ये शाब्दीक चकमक व्हायची. ५ मार्चच्या सायंकाळी पती-पत्नीमध्ये वाद झाला.दरम्यान मनोजने सुमनचा गळा दाबून खून केला.मृतकचा भाऊ विकास वैद्य यांनी या संदर्भात हुड्यांसाठी माझ्या बहिणीचा सासरच्यांनी छळ करुन तिचा खून केल्याची तक्रार रामनगर पोलिसांकडे केली आहे.

गळा आवळून पत्नीचा खून
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : शहरालगत असलेल्या कुडवाच्या वार्ड क्रमांक २ येथील सुमन मनोज सावनकर (२८)या विवाहितेचा पतीने गळा दाबून खून केल्याची घटना ५ मार्चच्या सायंकाळी ६ वाजता घडली. या संदर्भात रामनगर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करुन आरोपी पतीला अटक केली आहे.
सुमनच्या चारित्र्यावर तिचा पती संशय करायचा.यामुळे त्या दोघांमध्ये शाब्दीक चकमक व्हायची. ५ मार्चच्या सायंकाळी पती-पत्नीमध्ये वाद झाला.दरम्यान मनोजने सुमनचा गळा दाबून खून केला.मृतकचा भाऊ विकास वैद्य यांनी या संदर्भात हुड्यांसाठी माझ्या बहिणीचा सासरच्यांनी छळ करुन तिचा खून केल्याची तक्रार रामनगर पोलिसांकडे केली आहे. रामनगर पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी गोंदियाच्या वैद्यकीय महाविद्यालयात पाठविला. मृतकच्या डोक्यावर गंभीर जखमा होत्या. गळा दाबून तिचा खून करण्यात आला. रामनगर पोलिसांनी सदर घटनेसंदर्भात भादंविच्या कलम ३०२ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. तपास ठाणेदार घुगे करीत आहेत.