शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
2
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! खुद्द स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
3
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
4
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
5
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
6
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
7
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
8
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
9
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
10
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
11
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
12
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
13
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
14
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
15
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
16
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
18
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
19
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
20
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
Daily Top 2Weekly Top 5

कोण सेफ, कोण अनसेफ होणार उद्या स्पष्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 12, 2020 06:00 IST

जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हटले जाते. याच मिनी मंत्रालयातून जिल्ह्यातील ग्रामविकासाच्या योजनांचा आरखडा तयार केला जातो.तसेच विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी जिल्हा परिषदेची निवडणूक ही महत्त्वपूर्ण मानली जाते. तर जिल्हा परिषद सदस्य, सभापतीपदांपासून ते आमदारकीपर्यंतचा प्रवास करणारे अनेक उदाहरणे जिल्ह्यात आहेत.

ठळक मुद्देवारे जि.प.निवडणुकीचे : आरक्षण सोडतीनंतर येणार गती

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गोंदिया जिल्हा परिषदेचा विद्यमान पदाधिकारी व सदस्यांचा पाच वर्षांचा कार्यकाळ येत्या २० जुलै रोजी पूर्ण होत आहे. त्यापूर्वी जिल्हा परिषदेच्या निवडणुका होणार असून त्यासाठी निवडणूक विभाग सुध्दा कामाला लागला आहे. एकूण ५३ सदस्यीय जिल्हा परिषदेच्या सर्कल निहाय आरक्षणाची सोडत १३ मार्च रोजी काढण्यात येणार आहे. या सोडतीकडे संपूर्ण विद्यमान सदस्य तसेच निवडणूक लढवू इच्छिणाऱ्या उमेदवारांचे लक्ष लागले आहे. आरक्षण सोडतीत कोणते सर्कल राखीव होते अथवा कोणत्या सर्कलमधील आरक्षण हटते. यावर निवडणुकीचे चित्र स्पष्ट होणार आहे. आरक्षण सोडतीत कोण सेफ आणि कोण अनसेफ राहतो हे देखील स्पष्ट होणार आहे. त्यामुळे याकडे राजकीय पक्षासह जिल्हावासीयांचे लक्ष लागले आहे.जिल्हा परिषदेला मिनी मंत्रालय म्हटले जाते. याच मिनी मंत्रालयातून जिल्ह्यातील ग्रामविकासाच्या योजनांचा आरखडा तयार केला जातो.तसेच विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्यासाठी जिल्हा परिषदेची निवडणूक ही महत्त्वपूर्ण मानली जाते. तर जिल्हा परिषद सदस्य, सभापतीपदांपासून ते आमदारकीपर्यंतचा प्रवास करणारे अनेक उदाहरणे जिल्ह्यात आहेत. त्यामुळे जिल्हा परिषदेकडे सर्वच राजकीय पक्षांचे लागले असते. एकूण ५३ सदस्य असलेल्या गोंदिया जिल्हा परिषदेवर सध्या भाजप-काँग्रेस अभद्र युतीची सत्ता आहे. पक्षीय बलाबल पाहले असता राष्ट्रवादी काँग्रेस २०, काँग्रेस १६ आणि भाजपचे १७ सदस्य आहे.स्थानिक राजकारणामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला बहुमतासह जि.प.वर सत्ता स्थापन करणे शक्य असताना सुध्दा काँग्रेसने भाजपसोबत जात सत्ता स्थापन केली. त्यामुळे मागील पाच वर्षांपासून जि.प.वर काँग्रेस भाजप अभद्र युतीची सत्ता आहे.तर जि.प.च्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वी जिल्ह्यातील काही काँग्रेस नेत्यांनी जि.प. निवडणुका स्वबळावर लढविण्याचा सूर आवळला आहे. त्यामुळे याबाबतचा अंतिम निर्णय या दोन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते घेतील. मात्र काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आपआपल्या परिने निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. तर अपक्ष म्हणून निवडून आलेले आ. विनोद अग्रवाल यांनी सुध्दा दोन दिवसांपूर्वीच पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन जि.प.निवडणुकीचे रणशिंग फुकले. तर तिसरी आघाडी सुध्दा जि.प.निवडणूक लढविण्याच्या दृष्टीने कामाला लागली आहे.त्यामुळे जि.प. निवडणुकीला यंदा रंगत येणार असल्याचे चित्र आहे. निवडणूक विभागाने जि.प.आरक्षण सोडतीचा कार्यक्रम जाहीर केला असून १३ मार्चला ५३ जि.प.सर्कल आणि आठही पंचायत समिती क्षेत्राचा सर्कलनिहाय आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.या सोडतीनंतर कोणत्या विद्यमान सदस्याला याचा फटका बसतो, कोणाला दुसरा सुरक्षित मतदारसंघ शोधण्याची वेळ येते, कोणता मतदारसंघ राखीव होतो हे ठरणार आहे. त्यामुळे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

टॅग्स :zpजिल्हा परिषद