पांगोलीच्या संवर्धनासाठी कोण घेणार पुढाकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 15, 2022 05:00 AM2022-05-15T05:00:00+5:302022-05-15T05:00:07+5:30

गोरेगाव तालुक्यातील तेढा तलावातून या नदीचा उगम झाला आहे. गोंदिया तालुक्यातील कामठा नजिक छिपीया या गावाजवळ देवरी- आमगाव तालुक्याकडून येणारी वाघ नदी व पांगोली नदीचा पवित्र संगम होतो. पुढे जाऊन ही नदी मध्यप्रदेश सीमा क्षेत्रात वाहते. गोरेगाव तालुक्यात २५ कि.मी.,गोंदिया तालुक्यात ३० कि. मी. व आमगाव तालुक्यात १५ कि. मी. असा जवळपास एकूण ७० कि. मी. या नदीचे प्रवाह क्षेत्र आहे. 

Who will take the initiative for the conservation of Pangoli? | पांगोलीच्या संवर्धनासाठी कोण घेणार पुढाकार

पांगोलीच्या संवर्धनासाठी कोण घेणार पुढाकार

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : कित्येक वर्षांपासून गोंदिया जिल्ह्यासाठी वरदान ठरलेली पांगोली नदी सद्या परिस्थीतीत शेवटच्या घटका मोजत आहे. तिचे अस्तित्व नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. नदीचे पात्र कोरडे पडल्याने पाण्याअभावी शेतकरी,नागरिक,पशु-पक्षींचे हाल होत आहेत. जीवनदायीनी पांगोली नदीच्या संरक्षण व संवर्धनासाठी अनेकदा निवेदन दिले. पण याची अद्यापही दखल घेण्यात आली नाही. 
भविष्यात उद्भवणाऱ्या जलसंकटाची चाहुल लागली नाही,ही मोठी शोकांतिका आहे. मात्र या नदीचे सरंक्षण,संवर्धन व विकास व्हावा, यासाठी जिल्ह्यात हळूहळू जनजागृती होऊन जनमत तयार होत आहे,ही आनंदाची बाब आहे.         
गोरेगाव तालुक्यातील तेढा तलावातून या नदीचा उगम झाला आहे. गोंदिया तालुक्यातील कामठा नजिक छिपीया या गावाजवळ देवरी- आमगाव तालुक्याकडून येणारी वाघ नदी व पांगोली नदीचा पवित्र संगम होतो. पुढे जाऊन ही नदी मध्यप्रदेश सीमा क्षेत्रात वाहते. 
गोरेगाव तालुक्यात २५ कि.मी.,गोंदिया तालुक्यात ३० कि. मी. व आमगाव तालुक्यात १५ कि. मी. असा जवळपास एकूण ७० कि. मी. या नदीचे प्रवाह क्षेत्र आहे. 
एकेकाळी   नदीच्या पाण्यावर नदी क्षेत्रातील शेतकरी शेती पिकवायचे नदीच्या पाण्यावर दुबार पीक घेऊन प्रसंगी  बागायती शेती करायचे. नदीच्या पाण्यात नदीकाठी असलेल्या राईस मिल, लाख कारखाने, औद्योगिक उपक्रमांमधून सोडले जाणाऱ्या दूषित पाण्यामुळे प्रदूषण वाढले आहे.

नदीची सिंचन क्षमता संपुष्टात 
nमानवी हस्तक्षेपांमुळे नदीत पसरत असलेल्या प्रदूषणामुळे,नदी काठची झाडे-झुडपांची नागरिकांनी अवैधपणे केलेल्या कटाईमुळे जलप्रदूषणासह,नदीच्या पाण्यावर  अवलंबून असलेल्या शेतजमिनीच्या मातीचे ही प्रदूषण झाले. नदी परिसरातील पाण्याची पातळी ही खोलवर गेली आहे.  मार्च-एप्रिल महिन्यातच विहिरी कोरड्या पडू लागल्यात. बोअरवेल खोदल्यावरही पाणी २५० फुटावरच लागते. नदीची सिंचन क्षमता संपुष्टात आल्यामुळे शेती व शेतकरी ही संकटात सापडला आहे.  
   पांगोली नदीवर बंधारे बांधा
nउन्हाळ्यात शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी, जनावरांना पिण्याचे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी नदीपात्रातून गाळ उपसा करून नदीचे खोलीकरण करणे,नदी प्रवाह क्षेत्रात जागोजागी ३ ते ५ कि. मी. अंतरावर कोल्हापुरी धर्तीचे बंधारे बांधणे,नदीच्या दोन्ही बाजूच्या काठांची दुरुस्ती करणे, नदीच्या दोन्ही काठांवर पर्यावरणास पोषक झाडे लावणे,नदीकाठावरील राईस मिल्स, लाख कारखाने आदी औद्योगिक क्षेत्रातील सांडपाणी नदी पात्रात येण्यापासून मज्जाव करणे गरजेचे असल्याचे समाजोन्नती बहु. ग्रामीण व शहरी विकास संस्था, गोंदिया सचिव तिर्थराज उके यांनी सांगितले.

 

Web Title: Who will take the initiative for the conservation of Pangoli?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.