त्या बेवारस जनावरांचे खरे मालक कोण !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2020 05:00 IST2020-08-01T05:00:00+5:302020-08-01T05:00:22+5:30

राष्ट्रीय महामार्ग क्र मांक सहावर मोकाट जनावरांचा अपघात होणे ही बाब आता नित्याचीच झाली आहे. मागील दहा दिवसांपूर्वी सुध्दा अज्ञात वाहनानाच्या धडकेत दोन जनावरे मृत्यूमुखी पडली होती. पाळीव जनावरे अपघातात मृत्यू पावतात. मात्र कोणताही विभाग याकडे लक्ष देत नसल्याचे दिसत आहे. कोहमारा चौकात हाकेच्या अंतरावर वाहतूक पोलीस विभागाचे मोठे कार्यालय आहे.

Who is the real owner of that helpless animal! | त्या बेवारस जनावरांचे खरे मालक कोण !

त्या बेवारस जनावरांचे खरे मालक कोण !

ठळक मुद्देमहामार्गावरील अपघातात वाढ : कोहमारा चौकात उड्डाणपुलाची गरज

लोकमत न्यूज नेटवर्क
सडक अर्जुनी : मागील काही दिवसांपासून राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा वरील अपघातांच्या संख्येत वाढ झाली आहे. या महामार्गावर मोकाट जनावरांचा सुध्दा मोठ्या प्रमाणात वावर असतो. दोन दिवसांपूर्वीच या महामार्गावर सहा मोकाट जनावरांचा अज्ञात वाहनाच्या धडकेत मृत्यू झाला. ही जनावरे मृत्यूमुखी पडल्यानंतर त्यांचे पशुपालक पुढे आले नाही. त्यामुळे या मोकाट जनावरांचा मालक कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.
राष्ट्रीय महामार्ग क्र मांक सहावर मोकाट जनावरांचा अपघात होणे ही बाब आता नित्याचीच झाली आहे. मागील दहा दिवसांपूर्वी सुध्दा अज्ञात वाहनानाच्या धडकेत दोन जनावरे मृत्यूमुखी पडली होती. पाळीव जनावरे अपघातात मृत्यू पावतात. मात्र कोणताही विभाग याकडे लक्ष देत नसल्याचे दिसत आहे. कोहमारा चौकात हाकेच्या अंतरावर वाहतूक पोलीस विभागाचे मोठे कार्यालय आहे. पण कोणताही अधिकारी वेळीच पोहचला नाही. अशोका कंपनीचे काही अधिकारी हे अकरा वाजता जेसीपी घेऊन दाखल झाले होते. हे काम आपले नसल्याचे कारण पुढे करून जबाबदारी झटकण्याचे काम होत असल्याचे चित्र येथे नेहमीच पाहावयास मिळत आहे.कोहमारा ग्राम प्रशासनाने याकडे थोेडे लक्ष देण्याची गरज आहे.
पण मोकाट जनावरांना पकडून ठेवाचे कुठे हाही प्रश्न त्यांच्यासमोर उभा येऊन ठाकला आहे. पूर्वी कोंडवाडे गावात राहत होते. बेवारस जनावरांना पकडून त्यात ठेवले जात होते. मात्र आता ते नसल्याने पकडलेल्या जनावरांना ठेवायचे कुठे असा प्रश्न निर्माण होतो. कोहमारा येथील चौकात नेहमीच मोकाट जनावरांचा वावर असतो. तर मागील काही दिवसांपासून या मार्गावर मोकाट जनावरे अपघात मृत्यूमुखी पडण्याचे सत्रच सुरू झाले आहे. त्यामुळे याची दखल घेत यावर उपाययोजना करण्याची गरज आहे.

राष्ट्रीय महामार्ग क्र मांक सहावर असलेल्या कोहमारा हे मुख्य ठिकाण आहे. या चौकात नवेगाव फाटा ते नैनपुर गावापर्यंत उड्डाण पुलाची नितांत गरज आहे. उड्डाणपूल तयार झाल्यास अपघात होणार नाही. यासाठी वरिष्ठांनी लक्ष देण्याची गरज आहे. राष्ट्रीय महामार्ग क्र मांक सहावर अपघात झाल्यास त्याची विल्हेवाट लवकर लावली जात नसल्याचे दिसत आहे. त्यासाठी संबंधित प्रशासनाने लक्ष देण्याची गरज आहे.
- वंदना थोटे, सरपंच कोहमारा

Web Title: Who is the real owner of that helpless animal!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.