आपले मित्र व शत्रू कोण? याचा विचार करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 10, 2020 05:00 IST2020-03-10T05:00:00+5:302020-03-10T05:00:28+5:30
पोवार समाजाच्यावतीने शास्त्री वॉर्डातील यशोधरा सभागृहात आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्र मात मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. उदघाटन अॅड. भगवती तुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य सीता रंहागडाले होत्या.

आपले मित्र व शत्रू कोण? याचा विचार करा
लोकमत न्यूज नेटवर्क
गोंदिया : संस्कृतीच्या नावावर महिलांना चारभितींच्या आत राहावे अशी परंपरा या देशातील काही विशिष्ट लोकांनी तयार करून समाज घडविण्याची क्षमता असलेल्या महिलांनाच अबला बनविण्याचेही काम केले आहे. आता मात्र आपण सावित्रीबाई, जिजाऊ, रमाईच्या विचारांनी आपल्यात बदल घडवून स्वत:चे अस्तित्व निर्माण करण्याची गरज आहे. आपले शत्रू कोण व मित्र कोण याचा विचार करणे काळाची गरज असल्याचे प्रतिपादन सालेकसा तालुका महिला दक्षता समितीच्या अध्यक्ष विमल कटरे यांनी केले.
येथील पोवार समाजाच्यावतीने शास्त्री वॉर्डातील यशोधरा सभागृहात आयोजित जागतिक महिला दिन कार्यक्र मात मार्गदर्शक म्हणून त्या बोलत होत्या. उदघाटन अॅड. भगवती तुरकर यांच्या हस्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी माजी जिल्हा परिषद सदस्य सीता रंहागडाले होत्या.
प्रमुख पाहुणे म्हणून एक्वायर पब्लिक एज्युकेशन सोसायटीच्या कोषाध्यक्ष मिनाक्षी कटरे व दिव्या भगत (पारधी) उपस्थित होत्या. पुढे बोलताना कटरे यांनी, मुलींची पहिली शाळा सुरु करुन सावित्रीबाई फुले यांनी महिलांना शिक्षणाचा अधिकार मिळवून देण्याचा प्रयत्न केला. त्यांच्यामुळेच आम्ही शिक्षित होऊन समाजात वावरण्या योग्य झालो असलो तरी सावित्रीबाईंच्या विचारांचा अंगीकार मात्र न केल्यानेच पुन्हा महिलांवर या दशकात गुलामिगरीत जाण्याची वेळ येऊ घातली असल्याचे सांगीतले. आमच्या अधिकारासाठी आमच्या ओबीसी समाजाची जनगणना होणे गरजेचे आहे.
यासाठी जो लढा सुरू आहे, त्या लढ्यात प्रत्येक महिलेने कुटुंबप्रमुख म्हणून सहभागी होऊन आमची जनगणना नाही तर आमचा जनगणनेवर बहिष्कार हा ब्रिद मनात ठासून घ्यायचा असल्याचे विचार व्यक्त केले.
तुरकर यांनी, आम्हा महिलांना पुरुषांच्या बरोबर जगण्याचे अधिकार, वारसाहक्क, पतीच्या सपंत्तीत अधिकार हे भारतीय संविधानाने दिले असल्याचे मत व्यक्त केले. या वेळी उपस्थित अन्य मान्यवरांनी महिलांना मार्गदर्शन केले. संचालन आशू रहागंडाले, स्नेहा गौतम व नूतन बिसेन यांनी केले. आभार आशू रहांगडाले यांनी मानले. कार्यक्रमासाठी पोवार समाज महिला समिती अध्यक्ष संगिता रंहागडाले, संयोजिका गीता चौधरी, सचिव आशा रंहागडाले, माधुरी कटरे, भूमिका राणे, अंजू चौधरी, शितल बिसेन, रेखा पारधी, कविता ठाकरे, सुनिता रहागंडाले, गायत्री कटरे, भूमेश्वरी बिसेन, नीता तुरकर, रीता कटरे, पुष्पा अंबुले, ओमलता कटरे, भूमेश्वरी पारधी, कविता रहागंडाले, रीता चौधरी, माधवी गौतम व शांता पारधी यांनी सहकार्य केले.