शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमध्ये निवडणूक निकालापूर्वीच 'हायव्होल्टेज ड्रामा'! स्ट्राँग रूम बाहेर पोहोचल्या CM ममता, EVM सोबत छेडछाडीचा आरोप
2
शिवाजीराव, तुमचे शिक्षण किती, पूर्वायुष्य काय..? मंत्री मुश्रीफ यांचे प्रत्युत्तर
3
'प्रिन्स'च्या विकेटनंतर 'किंग'चा जल्लोष; पण शेवटी RCB ला पराभवाचा धक्का देत GT नं मारली बाजी!
4
जबलपूर हादरले! वादळामुळे बर्गी धरणात क्रूझ उलटली; ४० पैकी ५ जणांचे मृतदेह सापडले
5
तो, ती आणि खळबळजनक पोस्ट! IPL मधील स्टार क्रिकेटर मैदानाबाहेरील गोष्टीमुळे चर्चेत, काय आहे प्रकरण?
6
धिरेंद्र कृष्ण शास्त्रीचा खरात होऊ शकतो! त्यांनी दिव्यशक्ती सिद्ध करावी, १० व्यक्ती अन् १०...; शाम मानव यांचं आव्हान
7
Exit Poll 2026: टुडेज चाणक्यचा एक्झिटपोल आला...! भाजपचं वादळ, ममतांसोबत 'खेला'; धक्कादायक आहे आकडेवारी
8
GT vs RCB : रजत पाटीदारच्या विकेटवरुन वाद; विराट कोहलीनं पंचांसोबत घातली हुज्जत! नेमकं काय घडलं?
9
म्हाडाने लॉटरीतील १२२१ घरांच्या किंमती ७.५ टक्क्यांनी कमी केल्या
10
जर कच्चे तेल नाही मिळाले तर चीन होर्मुझ ताब्यात घेणार? अमेरिकेच्या हातातून बाजी निसटणार, इराण अन्...
11
आता आरपारची लढाई! मोज्तबा खामेनेईंचा ट्रम्प यांना सज्जड इशारा; म्हणाले "समुद्रात गाडून टाकू..."
12
GT vs RCB : किंग कोहलीनं ५ चेंडूत केली गेलच्या विक्रमाशी बरोबरी; रबाडानं असा घेतला बदला (VIDEO)
13
रील स्टार पाटलाचा कारनामा, १२ वर्षांपूर्वीच्या अपहरण-खून प्रकरणाचा गुन्हे शाखेने केला उलगडा
14
“शिंदेंकडून मलाही ऑफर, पण मी फडणवीसांचा निष्ठावान कार्यकर्ता”; रवी राणांचा मोठा खुलासा
15
बुद्ध पौर्णिमा-पुष्टिपती विनायक जयंती २०२६: ९ राशींची इच्छा पूर्ण अन् धनलाभ; काळजी दूर होईल!
16
"उद्धव ठाकरेंनी स्वतःचा राजकीय बळी न देता.."; विधानपरिषद निवडणुकीवरून भाजपची घणाघाती टीका
17
‘मिसिंग लिंक’ नाव कसे पडले? ‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ची विशेष मार्गिका, वैशिष्ट्ये आहेत खास!
18
डाव उलटा पडलाय! प्रतिष्ठा जपायची असेल तर हार्दिक पांड्याला संघाबाहेर काढा; दिग्गजाचा MI ला सल्ला
19
पश्चिम बंगालच्या एक्झिट पोलवर CM ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया; TMC ला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
20
“पवारांविरुद्ध लढणार नाही”; सुप्रिया सुळेंच्या विधानावर सुनेत्रा पवारांचे एका वाक्यात भाष्य
Daily Top 2Weekly Top 5

जलयुक्त शिवाराने दुष्काळावर मात

By admin | Updated: January 29, 2015 23:10 IST

राज्यातील वेगवेगळ्या भागात दरवर्षी दुष्काळ पडतो. लोकसहभागातून दुष्काळावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान उपयुक्त आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.

गोंदिया : राज्यातील वेगवेगळ्या भागात दरवर्षी दुष्काळ पडतो. लोकसहभागातून दुष्काळावर मात करण्यासाठी जलयुक्त शिवार अभियान उपयुक्त आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी केले.गोंदिया तालुक्यातील खर्रा येथे जलयुक्त शिवार अभियानाचा शुभारंभ पालकमंत्री बडोले यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला जिल्हाधिकारी डॉ. अमित सैनी, उपवनसंरक्षक जितेंद्र रामगावकर, जि.प. चे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी जयवंत पाडवी, उपविभागीय अधिकारी के.एन.के. राव, भाजपाचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल, खर्रा सरपंच सुषमा पंधरे यांची प्रमुख उपस्थिती होती.पालकमंत्री बडोले पुढे म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानाच्या माध्यमातून जलसंधारणाच्या विविध योजना हाती घेण्यात येत आहे पाणीटंचाईच्या भागात हे अभियान प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. भूगर्भात पाण्याची साठवणूक होण्यासाठी सिमेंट नाल्याची साखळी बांधण्यात येईल. त्यामुळे सिंचनाची व्यवस्था निर्माण होण्यास मदत होईल.जलयुक्त शिवार अभियान हे अत्यंत चांगले अभियान असल्याचे सांगुन पालकमंत्री बडोले म्हणाले, याचे यश प्रशासकीय यंत्रणेवर अवलंबून आहे. असे ते म्हणाले.जिल्हाधिकारी डॉ. सैनी म्हणाले, जलयुक्त शिवार अभियानांतर्गत जी कामे करण्याची आवश्यकता आहे त्या कामांची निवड ग्रामसभांनी करावी. त्यासाठी उपलब्ध करुन देण्यात येईल, असे त्यांनी यावेळी सांगितले.यावेळी जलसंधारणाच्या विविध योजना राबविणाऱ्या यंत्रणांचे अधिकारी, कर्मचारी तसेच खर्रा ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. तलावांच्या या जिल्ह्यात हे अभियान लोकसहभागातून यशस्वी होईल असा विश्वास अनेकांनी व्यक्त केला.कार्यक्रमाचे प्रास्ताविक व उपस्थितांचे आभार जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अशोक कुरील यांनी मानले.